AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care | ‘हे’ घटक तांदळाच्या पिठात मिक्स करून स्क्रब बनवा आणि त्वचेच्या सर्व समस्या दूर करा!

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, बटाटा हा आपल्या त्वचेसाठी किती जास्त फायदेशीर आहे. बटाट्याच्या रसात तांदळाचे पीठ टाकून त्वचेला लावल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. एक वाटी घेऊन त्यात दोन चमचे तांदळाचे पीठ टाका, त्यात तीन चमचे बटाट्याचा रस घाला. स्क्रबिंग करा आणि हवे तितक्या वेळ आपल्या त्वचेवर राहूद्या.

Skin Care | 'हे' घटक तांदळाच्या पिठात मिक्स करून स्क्रब बनवा आणि त्वचेच्या सर्व समस्या दूर करा!
Image Credit source: stock.adobe.com
| Edited By: | Updated on: Apr 25, 2022 | 10:57 AM
Share

मुंबई : त्वचेची काळजी घेणे खूप जास्त महत्वाचे आहे. त्वचेची (Skin) काळजी घेण्यासाठी एक्सफोलिएशन खूप जास्त महत्वाचे आहे. स्क्रब केल्याने त्वचेच्या मृत पेशी निघून जातात आणि ती अधिक चांगली चमकते. यासोबतच स्क्रब (Scrub) केल्याने त्वचा आतून निरोगी होते. कारण ही पद्धत साचलेली घाण बाहेर काढण्याचे काम करते. बरेचदा लोक कित्येक महिने स्क्रब करत नाहीत. यामुळे त्वचेवर खाण साचते. स्क्रब केल्याने त्वचा निर्जीव (Skin lifeless) होते. तज्ज्ञांच्या मते, स्क्रब न केल्यामुळे त्वचेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. विशेष म्हणजे स्क्रब करण्यासाठी आपल्याला काही पार्लरमध्ये जाण्याची गरज नाहीये. आपण काही घरगुती साहित्याच्या मदतीने स्क्रब घरचे-घरी तयार करू शकतो.

तांदळाचे पीठ आणि मध

कंबरेवरील पुरळ घालवण्यासाठी तांदळाचे पीठ घ्या आणि त्यात थोडा मध टाका. हे दोन्ही चांगले मिक्स करून कंबर आणि हात-पाय घासून घ्या. तांदळाच्या पिठाने घाण निघून जाईल, तर मध त्वचेला मुलायम बनवेल. मधामध्ये असणारे पोषक तत्व त्वचेचे पोषण देखील करतात. तज्ञांच्या मते, तुम्ही आठवड्यातून किमान दोनदा बॉडी स्क्रब करावा. यामुळे त्वचा तजेलदार होण्यास मदत होते.

बटाटे आणि तांदळाचे पीठ

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, बटाटा हा आपल्या त्वचेसाठी किती जास्त फायदेशीर आहे. बटाट्याच्या रसात तांदळाचे पीठ टाकून त्वचेला लावल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. एक वाटी घेऊन त्यात दोन चमचे तांदळाचे पीठ टाका, त्यात तीन चमचे बटाट्याचा रस घाला. स्क्रबिंग करा आणि हवे तितक्या वेळ आपल्या त्वचेवर राहूद्या. यामुळे त्वचेवरी पुरळ जाण्यास मदत होईल.

कोरफड आणि तांदळाचे पीठ

कोरफड जेलमध्ये असलेले अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. तांदूळ आणि कोरफडीपासून बनवलेले स्क्रब त्वचेला निरोगी आणि चमकदार बनवतो. तांदळाच्या पिठात दोन चमचे कोरफड जेल मिसळा आणि शरीरावर स्क्रब करा. स्क्रब केल्यानंतर काही वेळ त्वचेवर ठेवा आणि नंतर थंड पाण्याने अंघोळ करा.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

संबंधित बातम्या : 

Heatstroke | उष्माघातापासून स्वतःला वाचवण्यासाठी या खास टिप्स फॉलो करा!

Hair | केस गळतीची समस्या झटपट दूर करण्यासाठी आहारात या गोष्टींचा समावेश करा!

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!