Skin Care Tips : ​तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ 3 होममेड फेसपॅक वापरुन पाहा!

| Updated on: Jul 15, 2021 | 10:12 AM

तेलकट त्वचेमुळे चेहऱ्याचे मोठे नुकसान होते. यामुळे पिंपल्स, मुरूम आणि सुरकुत्या चेहऱ्यावर येतात. चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी करण्यासाठी आपण काही घरगुती फेसपॅक वापरले पाहिजेत.

Skin Care Tips : ​तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी हे 3 होममेड फेसपॅक वापरुन पाहा!
फेसपॅक
Follow us on

मुंबई : तेलकट त्वचेमुळे चेहऱ्याचे मोठे नुकसान होते. यामुळे पिंपल्स, मुरूम आणि सुरकुत्या चेहऱ्यावर येतात. चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी करण्यासाठी आपण काही घरगुती फेसपॅक वापरले पाहिजेत. ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होण्यास मदत होते. विशेष म्हणजे हे फेसपॅक आपण घरी असलेल्या साहित्याच्या आधारे तयार करू शकता.  (These 3 homemade face packs are beneficial for oily skin problems)

लिंबू आणि दही फेसपॅक – लिंबूमध्ये साइट्रिक अॅसिड असते. हे त्वचेचे तेल नियंत्रित करण्यास मदत करते. दहीमध्ये लॅक्टिक अॅसिड असते. हे एक नैसर्गिक क्लीन्झर म्हणून कार्य करते. मुरुमांचे मुख्य कारण असलेल्या तेल आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करू शकते. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी 2 चमचे दही 2 चमचे लिंबाचा रस मिक्स करा. त्यानंतर त्याची चांगली पेस्ट तयार करा आणि संपूर्ण चेहऱ्याला लावा. ही पेस्ट साधारण वीस मिनिटे आपल्या चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा.

मुलतानी माती आणि काकडीचा फेसपॅक – मुलतानी माती चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. त्वचेवरील अतिरिक्त तेल काढण्यासाठी मुलतानी माती काम करते. काकडीमध्ये व्हिटॅमिन सी असते. काकडी त्वचेचे छिद्र घट्ट करण्यात मदत करू शकते. हे त्वचेच्या मृत पेशी देखील काढून टाकू शकते. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी काकडीची बारीक पेस्ट तयार करून घ्या आणि त्यामध्ये मुलतानी माती मिक्स करा. त्यानंतर ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. दहा मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा.

ओट्स आणि कोरफडचा फेसपॅक – कोरफड आपल्या त्वचेच्या विविध समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. ओट्स आणि कोरफडचा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपण तीन चमचे ओट्स आणि दोन चमचे कोरफड घ्या. हे सर्व मिक्स करून त्याची चांगली पेस्ट तयार करा आणि आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. 10-15 मिनिटांसाठी हा फेसपॅक आपल्या चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.

तेलकट त्वचा – काही लोकांना वाटते की त्यांची त्वचा तेलकट आहे, म्हणून त्यांना मॉइश्चरायझरची आवश्यकता नाही. जर तुम्हाला असे वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. तज्ज्ञांचे मत आहे की, मॉइश्चरायझर लावणे तुम्ही त्वचेला बंद केले असेल तर आपली समस्या कमी करण्याऐवजी वाढवते. मॉइश्चरायझर आपल्या त्वचेची चिकटपणा कमी करण्यास मदत करते म्हणून तेलकट त्वचा असेल तरी देखील मॉइश्चरायझरचा वापरल केला पाहिजे.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(These 3 homemade face packs are beneficial for oily skin problems)