Health Care : संतुलित आहार घेण्यावर भर द्या, निरोगी आयुष्य जगा!

आपण आहारात काय खातो काय पितो हे सर्वात महत्वाचे आहे. फास्ट फूडपेक्षा आपण नेहमी संतुलित आणि पाैष्टीक आहार घेतला पाहिजे. आहारात पुरेशी फळे आणि भाज्यांचा समावेश करा.

Health Care : संतुलित आहार घेण्यावर भर द्या, निरोगी आयुष्य जगा!
हेल्दी आहार
Follow us
| Updated on: Jul 04, 2021 | 5:11 PM

मुंबई : आपण आहारात काय खातो काय पितो हे सर्वात महत्वाचे आहे. फास्ट फूडपेक्षा आपण नेहमी संतुलित आणि पाैष्टीक आहार घेतला पाहिजे. आहारात पुरेशी फळे आणि भाज्यांचा समावेश करा. जेवणासोबत सलाड किंवा सूप घ्या. त्यामुळे ग्लूकोजची पातळी कंट्रोलमध्ये राहील तसेच इंसुलिन रेसिस्टेंस रोखण्यास मदत होईल. दिवसातून जर तुम्ही 5 वेळ जेवण करत असाल, तर कमीत कमी एकदा सलाड आणि फळे खा. (Follow a balanced diet and live a healthy life)

ताजी फळे अँटीऑक्सिडेंट, व्हिटॅमिन आणि मिनरल्सने भरलेली असतात. त्यामुळे पुरेशी ताजी फळे खा. सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास सुरुवातीच्या डिनरचा पर्याय ठेवा.तसेच खूप पाणी पिऊन हायड्रेटेड राहण्याचा प्रयत्न करा. तसेच मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी ग्रीन टी, काळी चहा किंवा काळी कॉफी घ्या. राजमामध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. राजमाची भाजी तयार करून आपण खाऊ शकतो. तसेच सूपमध्ये देखील राजमा मिक्स करू शकतो.

राजमा खाल्ल्याने तुमच्या शरीरातील प्रथिन्यांची पातळी चांगली राहते. रात्री राजमा पाण्यात भिजवून सकाळी आपण खाऊ शकतो. दूध हे बर्‍याच पोषक तत्वांचे भांडार आहे आणि भारतात दूध हा रोजच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. दुधात आढळणारे कार्ब, प्रथिने आणि चरबी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, म्हणून प्रत्येकाचाच दूध पिण्यावर भर दिला पाहिजे.

गहू, सोया, बाजरी, ज्वारी, नाचणी, मुग, आणि ब्राऊड राईसचा आहारात समावेश केला पाहिजे. या कडधान्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. विशेष म्हणजे याचा समावेश आपल्या आहारात केल्यानंतर बराच काळ आपले पोट भरल्या सारखे वाटते. प्रथिने समृध्द असलेल्या खाद्यपदार्थामध्ये कॅलरी कमी प्रमाणात असते आणि पोट बर्‍याच काळ भरल्यासारखे वाटते. याशिवाय प्रथिने स्नायू बनविण्यातही मदत करतात. पोहे, ओट्स, सोया, हरभरा, मूग, मसूर, अंडी इ आहारात घ्या.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Health | मधुमेहाची चिंता सतावतेय? या 5 पदार्थांचा आहारात समावेश करा आणि टेन्शन मुक्त व्हा!

(Follow a balanced diet and live a healthy life)

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.