AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : चमकदार आणि सुंदर त्वचेसाठी लिंबापासून बनवलेले ‘हे’ फेसपॅक वापरा!

दररोजच्या धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. अशा स्थितीत अनेक वेळा त्वचा निस्तेज, उग्र, कोरडी होते. या व्यतिरिक्त आपल्या त्वचेवर सुरकुत्या होण्याची समस्या देखील निर्माण होते. त्वचेच्या या समस्या टाळण्यासाठी आपण नेहमी घरगुती उपाय केले पाहिजेत. ज्यामुळे सुंदर आणि तजेलदार त्वचा आपल्याला मिळेल.

Skin Care : चमकदार आणि सुंदर त्वचेसाठी लिंबापासून बनवलेले 'हे' फेसपॅक वापरा!
फेसपॅक
| Edited By: | Updated on: Oct 22, 2021 | 10:26 AM
Share

मुंबई : दररोजच्या धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. अशा स्थितीत अनेक वेळा त्वचा निस्तेज, उग्र, कोरडी होते. या व्यतिरिक्त आपल्या त्वचेवर सुरकुत्या होण्याची समस्या देखील निर्माण होते. त्वचेच्या या समस्या टाळण्यासाठी आपण नेहमी घरगुती उपाय केले पाहिजेत. ज्यामुळे सुंदर आणि तजेलदार त्वचा आपल्याला मिळेल. होममेड फेसपॅक आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असतात.

लिंबू आणि कोरफड फेसपॅक

अर्ध्या ताज्या लिंबाच्या रसात 1-2 चमचे कोरफड जेल मिसळा. मिश्रण चेहऱ्यावर लावा. ते 15-20 मिनिटे सोडा. स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवा. आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा लिंबू आणि कोरफड फेसपॅक आपल्या चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

लिंबू आणि मध फेसपॅक

एक चमचा ताज्या लिंबाचा रस आणि दोन चमचे मध घ्या. एकत्र मिसळा आणि चेहऱ्यावर तसेच मानेवर मिश्रण लावा. 15-20 मिनिटे सोडा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून 1 ते 2 वेळा वापरू शकता.

लिंबू आणि ग्लिसरीन फेसपॅक

ग्लिसरीन, लिंबाचा रस आणि पाणी समान प्रमाणात घ्या. ते एकत्र मिसळा आणि चेहऱ्यावर तसेच मानेवर मिश्रण लावा. तुम्ही मिश्रण तुमच्या कोरड्या त्वचेवर लावा. काही मिनिटांसाठी हळूवारपणे मालिश करा आणि नंतर 10-15 मिनिटे सोडा. स्वच्छ पाण्याने ते धुवा. हा फेसपॅक त्वचा मऊ ठेवण्यासाठी मदत करतो.

चमकदार त्वचेसाठी लिंबू आणि पपई फेसपॅक

पपईचा लगदा तयार करण्यासाठी त्यात एक चमचा ताज्या लिंबाचा रस घालून त्याची चांगली पेस्ट तयार करा. आपल्या चेहऱ्यावर ही पेस्ट लावा. त्यानंतर काही वेळ ठेवा आणि चेहऱ्याचा मसाज करा. 15-20 मिनिटांसाठी त्वचेवर सोडा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा हा फेसपॅक तुम्ही चेहऱ्यावर लावला पाहिजे.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(This face pack made from lemon is beneficial for beautiful skin)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली