महागड्या ब्युटी प्रॉडक्ट्सपेक्षा वापरा साय, त्वचेला मिळेल झटपट ग्लो

| Updated on: Sep 30, 2022 | 12:53 PM

साय लावल्यामुळे तुमची त्वचा खूप निरोगी आणि चमकदार होईल त्वचेवरील डाग निघून जातात. साय ही त्वचेसाठी मॉयश्चरायझिंग घटकाप्रमाणे कार्य करते.

महागड्या ब्युटी प्रॉडक्ट्सपेक्षा वापरा साय, त्वचेला मिळेल झटपट ग्लो
महागड्या ब्युटी प्रॉडक्ट्सपेक्षा वापरा साय, त्वचेला मिळेल झटपट ग्लो
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: अनेक लोक आपली त्वचा चमकदार बनवण्यासाठी अनेक सौंदर्य प्रसाधनांचा (beauty products) वापर करतात. बाजारातून विकत घेतलेली ही ब्युटी प्रॉडक्ट्स कधीकधी तुमच्या त्वचेचे नुकसानही करू शकतात. या प्रॉक्ट्समध्ये असलेली केमिकल्स (chemicals) ही आपल्या त्वचेसाठी नुकसानकारक ठरू शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही बाजारातील प्रॉडक्ट्सपेक्षा घरगुती पदार्थांचा त्वचेसाठी वापर करू शकता. तुम्ही दूध आणि सायीचा (cream) उपयोग करून तुमच्या चेहऱ्यावरील पूर्वीची चमक (glowing skin) परत मिळवू शकता. दूध आणि सायीमुळे आपल्या त्वचेला अनेक फायदे (benefits) मिळतात.

सायीचा वापर त्वचेसाठी फायदेशीर

साय किंवा क्रीम लावल्याने आपल्या त्वचेला चमक येते. इतकंच नाही तर यामुळे त्वचेवरील डाग दूर होतात. खरंतर, साय ही त्वचेसाठी मॉयश्चरायझिंग घटकाप्रमाणे कार्य करते. विशेष म्हणजे सायीमध्ये आढळणारे पोषक घटक हे आपली त्वचा हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात. याशिवाय सुरकुत्यांच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठीही आपण सायीचा वापर करू शकतो

डेड स्कीनपासून होते सुटका

सायीचा वापर केल्याने आपल्या त्वचेवरील डेड स्कीन निघून जाण्यास मदत होते. साय आपल्या त्वचेवरील घाण काढून टाकते व त्वचा स्वच्छ करते. त्यासाठी एक चमचा साय घेऊन त्यामध्ये लिंबाच्या रसाचे 3-4 थेंब टाकावेत. नंतर हे मिश्रण नीट एकजीव करावे. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावून 10-15 मिनिटे ठेवावी. वाळल्यानंतर कापसाचा बोळा घेऊन चेहरा पुसून घ्यावा व पाण्याने स्वच्छ धुवावा. नियमित वापराने फरक दिसू लागेल.

हे सुद्धा वाचा

त्वचा मॉयश्चराइज करते

क्रीममध्ये खूप फॅट्स असतात, जे आपल्या त्वचेला मॉयश्चराइज करण्यास मदत करते. चेहऱ्यावरील काळेपणा (टॅनिंग) दूर करण्यासाठीही तुम्ही सायीचा वापर करू शकता. यामुळे तुमच्या त्वचेला थंडावा मिळेल. त्यासाठी थोडी साय घेऊन हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करावा. 5 ते 10 मिनिटांनंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. असे केल्याने तुमची त्वचा अगदी मुलायम होईल.

(टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)