Skin Care : चमकदार त्वचेसाठी बेसन पीठाचे ‘हे’ 5 फेसपॅक घरी तयार करा, होतील अनेक फायदे!

| Updated on: Jun 09, 2021 | 7:43 AM

बेसन पीठ आपल्या आरोग्यासाठीच नाही तर आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर असते. चमकदार त्वचेसाठी बेसन पीठाचा उपयोग केला जातो.

Skin Care : चमकदार त्वचेसाठी बेसन पीठाचे हे 5 फेसपॅक घरी तयार करा, होतील अनेक फायदे!
स्क्रब
Follow us on

मुंबई : बेसन पीठ आपल्या आरोग्यासाठीच नाही तर आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर असते. चमकदार त्वचेसाठी बेसन पीठाचा उपयोग केला जातो. हे टॅनिंग काढून टाकते आणि त्वचेची चमक कायम राखण्यास मदत करते. आज आम्ही तुम्हाला बेसन पीठापासून तयार करण्यात आलेले 5 फेसपॅक सांगणार आहोत. जे आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. (Besan flour is beneficial for glowing skin)

-वाढत्या वयामुळे चेहऱ्यावरील चमकही कमी होते. मात्र, चेहऱ्यावरील चमक कायम ठेवण्यासाठी आपण बेसन पीठाचा हा फेसपॅक वापरू शकतो. अर्धी वाटी बेसन पीठ घ्या आणि त्यामध्ये दोन चमचे लिंबाचा रस मिक्स करा. त्यानंतर ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि साधारण वीस मिनिटे तसेच राहूद्या. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.

-उन्हाळ्याच्या हंगामात चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या वाढते. चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी आपण बेसन पीठामध्ये हळद मिक्स करून पेस्ट तयार करा आणि संपूर्ण चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर होण्यास मदत होईल. हळद दाहक-विरोधी गुणधर्मांकरिता ओळखली जाते.

-मसूरची डाळ रात्री पाण्यात भिजवा आणि सकाळी त्याची पेस्ट तयार करा. त्या पेस्टमध्ये बेसन पीठ आणि मध मिक्स करा आणि संपूर्ण चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्यावरील काळपटपणा दूर होण्यास मदत होते. मात्र, ही पेस्ट तयार केल्यानंतर जास्त वेळ ठेऊ नका. लगेचच चेहऱ्याला लावा.

-एक चमचा हळद आणि दोन चमचे बेसन पीठ घ्या. त्यात एक चमचा मलई आणि थोडे दूध मिसळून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. हा फेस पॅक कोरडा झाल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवा. बेसन पिठात दहीदेखील मिसळू शकता. ही पेस्ट आपण चेहऱ्याला दररोज देखील लावू शकतो.

-दोन चमचे दही, एक चमचा बेसन पीठ, एक चिमूटभर हळद आणि एक चमचा टोमॅटोचा रस एकत्र घाला आणि 15 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा आणि चेहरा थंड पाण्याने धुवा. ही पेस्ट लावल्याने आपल्या चेहऱ्यावरील टॅन निघून जाण्यास मदत होते. आठवड्यातून दोन वेळी ही पेस्ट चेहऱ्यावर लावा.

(टीप : औषध म्हणून वापरण्यासाठी किंवा कोणत्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)

संबंधित बातम्या : 

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Besan flour is beneficial for glowing skin)