हिवाळ्यात करा ‘या’ सूपचे सेवन, शरीर उबदार राहण्यास होईल मदत
हिवाळ्यात सूप पिणे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. हे शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते आणि उर्जा प्रदान करते. हिवाळ्यात हे सूप शरीराला उष्णता आणि ऊर्जा देण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
हिवाळा येताच शरीराला उबदार ठेवण्यास मदत करणारे पदार्थ आहारात आपण घेत असतो. यामध्ये तुम्ही सुपांचा देखील समावेश करू शकता. कारण सूपदेखील शरीर उबदार ठेवण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. सूप पिण्याचे असे अनेक फायदे आहेत जे केवळ शरीर उबदार ठेवण्यास मदत करत नाहीत तर संपूर्ण आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. सूप अनेक प्रकारच्या भाज्या मिसळून बनवले जाते, त्यामुळे त्यात अनेक पोषक घटक असतात जे शरीराला ऊर्जावान ठेवण्यास देखील मदत करतात.
हिवाळ्यात तहान कमी लागल्याने लोक पाणी कमी पितात. पण यात तुम्ही सूप पिणे शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते. हायड्रेशनमुळे शरीराला ताजेपणा मिळतो आणि त्वचेला ओलावा टिकून राहण्यास मदत होते. हिवाळ्यात सर्वसाधारणपणे फ्लू आणि सर्दी-खोकल्यासारख्या समस्या वाढतात. सूपमध्ये असलेले व्हिटॅमिन सी, झिंक आणि अँटीऑक्सिडंट्स सारखे पोषक घटक तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. हलके आणि पौष्टिक सूप देखील वजन कमी करण्यास मदत करतात. यासोबतच यामध्ये असलेले पोषक घटक तुमची त्वचा निरोगी ठेवण्यासही उपयुक्त ठरते.
मूग डाळीचे सूप
मूग डाळ प्रथिनांचा चांगला स्रोत आहे, तसेच व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. अशावेळी तुम्ही हिवाळ्यात मूग डाळीच्या सूपचे ही सेवन करू शकता. त्यात तुम्ही इतर तुमच्या आवडीच्या भाज्याही घालू शकता.
चिकन आणि व्हेजिटेबल सूप
चिकन आणि अनेक प्रकारच्या भाज्यांचा समावेश असलेला सूप हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्याबरोबरच आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. रोगप्रतिकारशक्ती वाढविणे, सर्दीपासून संरक्षण करणे, स्नायू बळकट करणे आणि ऊर्जा प्रदान करणे यासाठी हे फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे चिकन यासोबत तुमच्या आवडीच्या फळभाज्या यात टाकून त्याचे सूप बनवून त्याचे सेवन करू शकतात.
टोमॅटो सूप
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के आणि अनेक पोषक घटक असतात. अशावेळी याचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. याच्या सेवनाने तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. त्याचबरोबर यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. तसेच वजन कमी करण्यास मदत करू शकतो.
व्हेजिटेबल सूप
विविध भाज्यांपासून बनवलेले हे सूप हिवाळ्यात पिण्यासाठी परफेक्ट आहे. ते बनवण्यासाठी अनेक भाज्यांचा वापर केला जातो, त्यामुळे त्यात अनेक पोषक घटक आढळतात. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी, पचनसंस्था मजबूत करण्यासाठी, शरीराला उष्णता आणि ऊर्जा देण्यासाठी भाज्यांचे सूप फायदेशीर ठरू शकते.