पावसाळ्यात ‘ही’ रोपे लावून तुमच्या घरातील बाग करा हिरवीगार
घराचे सौंदर्य वाढवण्यासोबतच आपल्या निरोगी आरोग्यासाठी आपल्या घरातील झाडे तसेच रोपं खूप महत्वाचं काम करतात. कारण आपल्या घरासमोर असलेली हिरवीगार बाग तसेच बाल्कनीत उमलेली सुंदर फुलं आपले मन प्रसन्न करते. तसेच आपल्यापैकी अनेकांना बागकामाची आवड असते. पण बागेत कोणते रोप लावावे हे अनेकांना समजत नाही. तर या लेखात आपण जाणून घेऊया की पावसाळ्यात तुम्ही तुमच्या बागेत किंवा बाल्कनीत कोणती रोपे लावू शकता.

आजकाल प्रत्येकजण आपल्या घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी झाडे लावतात. तसेच झाडांमुळे तुमच्या घरातील हवा सुधारते आणि तुमचा मुडही चांगला राहतो. त्याचबरोबर झाडे लावल्याने बाग तर सुंदर दिसतेच पण या झाडांपासून तुम्हाला सुंदर फुलं, भाज्या आणि फळे देखील मिळतात. बहुतेक लोकांना हिरवगार बाग खूप आवडते, म्हणून बरेच लोकं त्यांच्या घरात भरपूर झाडे लावतात. अशातच आपण जर पावसाळ्याबद्दल बोललो तर बागकामासाठी तसेच झाडांच्या विकासासाठी हा ऋतू सर्वोत्तम आहे, कारण या हंगामात झाडांची फार निगा न राखताही झाडं उत्तम वाढतात. फुलझाडांसाठी तर पावसाळा आधिकच चांगला असतो. जर तुम्हालाही या पावसाळ्यात तुमच्या घरातील बागेत किंवा बाल्कनीत कोणती झाडे व रोपं लावता येतील हे आपण आजच्या या लेखात जाणून घेऊयात…
झाडे तुमच्या घराचे सौंदर्य वाढवतातच पण स्वच्छ हवा देखील देतात. पण खूप कमी लोकांना माहिती आहे की पावसाळ्यात कोणती झाडे लावणे चांगले आहे जेणेकरून तुमची बाग हिरवीगार राहील. तुम्ही पावसाळ्यात तुमच्या घराच्या बाल्कनीत देखील ही रोपं व झाडे लावू शकता.
पावसाळ्यात ही झाडे लावा
ऑलिंडर झाड
जर तुम्हालाही तुमची बाग रंगीबेरंगी फुलांनी भरलेली हवी असेल तर. म्हणून तुम्ही पावसाळ्यात तुमच्या घरातील बागेत ऑलिंडरची झाड लावू शकता. त्यात पिवळे, पांढरे आणि जांभळे अशा अनेक रंगांची फुले येतात जी तुमची बाग आणखी सुंदर बनवू शकतात. या फुलाचा सुगंधही खूप छान आहे.
जाईचे रोप
पावसाळ्यात तुम्ही घरी बाल्कनीत जाईचे रोप लावू शकता. त्यात सहसा पांढऱ्या रंगाची फुले असतात ज्यावर फुलपाखरे अनेकदा येऊन बसतात. जाईच्या झाडाला पिवळ्या आणि क्रीम रंगाची फुले देखील येतात जी वर्षभर उमलतात. तुम्ही ते कुंडीत, टांगलेल्या टोपलीत किंवा तुमच्या बागेत थेट जमिनीवर लावू शकता.
टोमॅटो
भाज्यांची चव वाढवणारे टोमॅटोचे रोप तुम्ही तुमच्या घरी कुंडीत सहजपणे लावू शकता. यासाठी, प्रथम तुम्हाला बिया एका लहान कुंडीत ठेवाव्या लागतील आणि त्यावर हलक्या मातीने झाकून ठेवावे लागेल आणि नंतर पाणी शिंपडा. काही दिवसांनी, तुम्हाला दिसेल की रोप वाढू लागले आहे आणि काही दिवसातच त्यावर टोमॅटो देखील दिसतील.
मान्सून कॅसिया किंवा गोल्डन शॉवर ट्री
मान्सून कॅसियाला गोल्डन शॉवर ट्री फूल म्हणून ओळखले जाते. ते त्याच्या आयुर्वेदिक गुणधर्मांसाठी ओळखले जाते. त्यावर पिवळी फुले येतात जी तुमची बाग आणखी सुंदर बनवतात. हे केरळचे राज्य फूल आहे.
कॉसमॉस प्लांट
कॉसमॉस वनस्पती बागेत अगदी सहजपणे वाढवता येते. पण उन्हाळा आणि पावसाळा हे ऋतू ते वाढवण्यासाठी योग्य असतात. त्याच्या झाडांना लाल, गुलाबी फुले येतात ज्यांच्या मध्यभागी पिवळे रंग असते. यामुळे तुमच्या घरातील बाग अधिकच सुंदर आणि हिरवीगार दिसते.
