AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Travel | पुण्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? मग ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या!

‘वाड्यांचे शहर’ असणाऱ्या पुण्याला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर तिथल्या ‘या’ प्रसिद्ध ठिकाणांना नक्की भेट दिली पाहिजे...

Travel | पुण्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? मग ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या!
पर्वती, पुणे
| Updated on: Feb 17, 2021 | 5:13 PM
Share

पुणे : विद्येचं माहेर घर असणारं पुणे, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. पुणे शहरात अनेक पर्यटन स्थळं आहेत. ज्यामुळे अनेक पर्यटक वीकेंडला पुण्याला फिरायला जाण्याचा बेत आखतात. पुणे शहर मुंबई शहरापासून अगदीच जवळ असल्याने केवळ पुण्यातीलच नव्हे तर, मुंबईतील लोकही शनिवार आणि रविवार पुण्यातील पर्यटन स्थळांना भेट देण्याच्या योजना करतात. पुणे शहराला स्वतःची एक ओळख, संस्कृती आणि इतिहास आहे. ‘वाड्यांचे शहर’ असणाऱ्या पुण्याला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर तिथल्या ‘या’ प्रसिद्ध ठिकाणांना नक्की भेट दिली पाहिजे (Best Tourist places in pune must visit).

शनिवार वाडा

शनिवार वाडा म्हणजे पुणे शहरातील जगप्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू. शनिवार वाडा हा पेशवेकाळात बांधण्यात आला होता. याच ठिकाणी पेशव्यांचे निवासस्थान होते. पहिले बाजीराव पेशवा यांनी सन 1736मध्ये या जागी लाकडी राजवाडा बांधला होता. मात्र, इंग्रजांनी या वाडा नष्ट केला. आता केवळ वाद्याचा पाया येथे शिल्लक आहे. हा वाडा पाहताना एक ऐतिहासिक वास्तू पाहण्याचा आनंद तुम्हाला नक्कीच मिळू शकतो. नाममात्र शुल्क देऊन शनिवार वाडा बघता येतो.

आगा खान पॅलेस

गांधी मेमोरिअल सोसायटीचा हा आगा खान पॅलेस हा खास इटालियन बनावटीचा आहे. ब्रिटीश राजवटीमध्ये या पॅलेसचा उपयोग भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या महात्मा गांधी, कस्तूरबा गांधी, महादेव भाई यांच्यासाठी तुरूंग म्हणून करण्यात आला होता. महादेव भाई आणि कस्तूरबा गांधी यांनी याच पॅलेसमध्ये अखेरचा श्वास घेतला होता, असे म्हटले जाते. या पॅलेसमध्ये त्यांचे स्मारकदेखील आहे.

ओशो आश्रम

पुण्यातील ओशो आश्रम एखाद्या रिसॉर्टपेक्षा कमी नाही. शहरातील कोरेगाव पार्क भागात 28 एकरांवर पसरलेला आश्रम 1974 मध्ये ओशोंनी बांधला होता. येथे निसर्ग आणि आधुनिकतेचा एक अनोखा संगम पाहायला मिळतो. बांबूच्या कॉटेजेस, आश्रमातील संगमरवरी मंडप, कृत्रिम पाण्याचे झरे, सर्वत्र हिरवळ, थंड हवेचे झोत, मोठा जलतरण तलाव या गोष्टी प्रमुख आकर्षण आहेत.

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर

प्लेगच्या साथीने आपला एकुलता एक मुलगा गमावल्यानंतर श्रीगणेशाचे ‘दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर’ श्री दगडूशेठ हलवाई आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांनी बांधले. नंतरच्या काळात लोकमान्य टिळकांनी लोकांना स्वातंत्र्यलढ्यात एकत्र आणण्यासाठी गणपती उत्सव सार्वजनिक उत्सव म्हणून साजरा केला. दरवर्षी लाखो पर्यटक या मंदिराला भेट देतात (Best Tourist places in pune must visit).

लाल महल

पुणे शहराच्या मध्यभागी असलेला लाल महल पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंपैकी एक आहे. लाल महलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते. पुण्यात आल्यावर शिवाजी महाराजांचे बालपण याच वास्तूत गेले. याच वास्तूत त्यांनी स्वराज्याचे धडे गिरवले. त्यानंतर स्वराज्य हिसकावू पाहणाऱ्या शाहिस्तेखानाची बोटेदेखील शिवाजी महाराजांनी याच महलात छाटली होती. आता पुणे महानगरपालिकेने लाल महलची पुर्नबांधणी केली आहे. त्यामुळे आताची वास्तू एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून नक्कीच पाहण्यासारखी आहे.

ओकायामा फ्रेंडशिप गार्डन

पुण्यातील पु.ल.देशपांडे या सुप्रसिद्ध गार्डनचे पूर्वीचे नाव ‘ओकायामा फ्रेंडशिप गार्डन’ असे होते. पुण्यातील सिंहगड रोडवर हे उद्यान वसलेले आहे. याची रचना जपानी उद्यानपद्धतीची आहे. जपान मधील ओकोयामा शहरातील 300 वर्षापूर्वीच्या प्रसिद्ध कोराक्वेन उद्यानाच्या धर्तीवर विकसित केलेले भारतातील एक उद्यान आहे.

विश्रामबाग वाडा

विश्रामबाग वाडा हा पेशवा दुसरा बाजीराव यांचे निवासस्थान होते. वडिलोपार्जित शनिवारवाड्यात राहण्यापेक्षा दुसरे बाजीराव यांना विश्रामबागेत राहणं पसंत होते. आता पुणे महानगरपालिकेने या ठिकाणी एक सांस्कृतिक केंद्र सुरू केले आहे.

पर्वती

पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय दिशेस उभी असलेली टेकडी आहे. पर्वताई देवीच्या नावावरुन टेकडीस पर्वती हे नाव पडले, पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे 640 मीटर आहे. सुमारे 103 पायर्‍या चढून येथे पोहोचता येते. या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात. या टेकडीच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत.

भिगवण

पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असणारे भिगवण पक्षी अभयारण्य म्हणजे पक्षीनिरिक्षकांसाठी स्वर्गच जणू. महाराष्ट्राचे भारतपूर म्हणून ओळखले जाणारे भिगवण हे फ्लेमिंगोंसाठी प्रसिद्ध आहे.

(Best Tourist places in pune must visit)

हेही वाचा :

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.