
पूजा असो वा दारातले तोरण, हे फूल आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. दिसायला साधे दिसणारे हे फूल केवळ शुभ कार्यांसाठीच नाही, तर तुमच्या त्वचेसाठीही अद्भुत औषधी ठरू शकते, हे तुम्हाला माहीत आहे का? या फुलात दडलेले आहेत सौंदर्याचे अनेक गुपित, जे तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक आणि आरोग्य देऊ शकतात. चला, आज आपण झेंडूच्या फुलांपासून घरीच एक खास ‘देसी स्किन ग्लोइंग किट’ (Desi Skin Glowing Kit) कशी बनवायची, ते जाणून घेऊया!
1. झेंडूच्या फुलांमध्ये असलेले ‘अँटीबॅक्टेरियल’, ‘अँटी-इन्फ्लेमेटरी’ आणि ‘अँटीऑक्सिडंट’ गुणधर्म त्वचेला निरोगी आणि निर्दोष बनवतात. हे फूल ‘स्किन ब्रायटनिंग’ साठी उत्तम आहे. त्वचेवरील गडद डाग, टॅनिंग आणि पिगमेंटेशन कमी करण्यास हे मदत करते, ज्यामुळे त्वचेचा रंग एकसमान होतो आणि ती चमकू लागते. यातील ‘अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज’ मुळे मुरुम (Acne) आणि पिंपल्स (Pimples) कमी होतात, ज्यामुळे त्वचा स्वच्छ आणि स्पष्ट होते.
2. झेंडूच्या पाकळ्या त्वचेला ‘सूदिंग प्रॉपर्टीज’ देतात. त्यांच्यापासून बनवलेले ‘सीरम’ त्वचेला खोलवर ‘हायड्रेट’ करते, ज्यामुळे कोरडी आणि खरबरीत त्वचा मऊ, गुळगुळीत आणि निरोगी बनते. त्वचेवर पुरळ, लालसरपणा किंवा जळजळ असेल, तर झेंडूचा लेप थंडावा देऊन आराम देतो. अगदी लहान जखमांवरही हे फायदेशीर ठरते.
3. आजकाल वाढता ताण , प्रदूषण, अपुरी झोप आणि सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे अकाली वृद्धत्व (Premature Aging) येऊ शकते. अशा वेळी, झेंडूचे फूल त्वचेचे नुकसान दुरुस्त करते आणि वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करते. यातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेच्या पेशींना ‘फ्री रॅडिकल्स’पासून वाचवतात, ज्यामुळे चेहऱ्यावर बारीक रेषा आणि सुरकुत्या उशिरा दिसतात. तसेच, झेंडूच्या फुलांमध्ये असलेले ‘फ्लेवोनॉइड्स’ त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवण्याचे काम करतात, जे उन्हात जाणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे.
कृती: झेंडूच्या 9 ते 12 पाकळ्या स्वच्छ धुऊन बारीक वाटून घ्या. त्यात 1 चमचा बेसन, 2 चमचे कच्चे दूध आणि 1 चमचा गुलाबजल मिसळा.
वापर: हा लेप 15 मिनिटांसाठी चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. सुकल्यावर पाण्याने धुऊन घ्या.
कृती: 2 चमचे झेंडूच्या पाकळ्यांचा रस काढा. त्यात 1 चमचा कोरफडीचे जेल, 1 व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि 1 चमचा गुलाबजल मिसळा.
वापर: हे सीरम एका काचेच्या बाटलीत भरून ठेवा आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर काही थेंब लावा.
कृती: 2 चमचे झेंडूच्या पाकळ्यांचा लेप घ्या. त्यात 1 चमचा मुलतानी माती, 1/2 चमचा मध आणि 3 – 4 थेंब लिंबाचा रस मिसळून मास्क तयार करा.
वापर: हा मास्क चेहरा आणि मानेवर 15 मिनिटांसाठी लावून ठेवा. सुकल्यावर ओल्या हातांनी हलके स्क्रब करत पाण्याने धुऊन टाका.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)