Beauty Tips : कारलं कडू, पण केस आणि त्वचेसाठी गुणकारी; कसे ते वाचा!

| Updated on: May 15, 2021 | 12:24 PM

कारल्याची भाजी ही बहुतेक लोकांना खायला आवडत नाही. जरी कारली खायला कडू असतील तरी देखील ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.

Beauty Tips : कारलं कडू, पण केस आणि त्वचेसाठी गुणकारी; कसे ते वाचा!
कारल्याचा रस
Follow us on

मुंबई : कारल्याची भाजी ही बहुतेक लोकांना खायला आवडत नाही. जरी कारली खायला कडू असतील तरी देखील ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. विशेष म्हणजे कारल्याचा रस आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. कारल्यामध्ये भरपूर प्रमाणात अ, ए, सी, ई, के जीवनसत्वे असतात. (Bitter guard juice is beneficial for hair and skin)

याव्यतिरिक्त, यात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. जे आपले नैसर्गिक सौंदर्य वाढविण्यात मदत करतात. यामुळे कारल्याचा रस केसांसाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. कारल्याच्या रसामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. चला त्याचे फायदे जाणून घेऊया.

1. जर तुम्हाला तरूण दिसायचे असेल तर दिवसातून एक वेळातरी कारल्याचा रस पिल्ला पाहिजे. यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते. जे वृद्धत्वाची समस्या टाळण्यास मदत करते.

2. कारल्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडेंट असतात. जे त्वचा स्वच्छ करण्याचे काम करते. यामुळे चेहऱ्यावरील मुरूम जाण्यास मदत होते.

3. चमकदार केसांसाठी पाच चमचे दह्यामध्ये अर्धा कप कारल्याचा रस घाला. हे मिश्रण केसांवर लावा आणि कोरडे झाल्यानंतर ते पाण्याने धुवा. आठवड्यातून दोन दिवस हा उपाय केल्यास केसांचा कोरडेपणा दूर होतो आणि केस चमकदार होतात.

4. जर आपल्याला कोंड्याचा त्रास असेल तर आठवड्यातून एकदा कारल्याच्या रसाने आपले केस धुवा. हा उपाय केल्यास परिणाम लवकरच दिसून येतील. कारल्याचा रस आणि खोबरेल तेल केसांना लावले पाहिजे.

5. कारली एक क्लीन्सर म्हणून वापरता येतात. यासाठी एक चमचे कारल्याच्या रसात दोन चमचे संत्राचा रस मिसळा. या दोन गोष्टी एकत्र करा आणि त्या कापसाच्या साहाय्याने चेहऱ्यावर लावा. मिश्रण कोरडे झाल्यावर ते पाण्याने धुवा. यामुळे त्वचेवर येणारी पुरळ जाते. आपण त्वचेसाठी दररोज कारल्याचा रस वापरू शकता. त्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म आहेत. जे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!

(Bitter guard juice is beneficial for hair and skin)