AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss | Intermittent Fasting दरम्यान ‘ब्लॅक कॉफी’ पिणे ठरेल फायदेशीर! जाणून घ्या कसे…

स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी बरेच लोक विविध प्रकारचे आहार व व्यायामाचे पालन करतात. वजन कमी करण्यासाठी, लोक आपल्या दिवसाची सुरुवात हेल्दी पेय पिऊन करतात.

Weight Loss | Intermittent Fasting दरम्यान ‘ब्लॅक कॉफी’ पिणे ठरेल फायदेशीर! जाणून घ्या कसे...
कॉफी
| Updated on: Mar 01, 2021 | 3:46 PM
Share

मुंबई : स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी बरेच लोक विविध प्रकारचे आहार व व्यायामाचे पालन करतात. वजन कमी करण्यासाठी, लोक आपल्या दिवसाची सुरुवात हेल्दी पेय पिऊन करतात. काही लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात एका कप गरम गरम कॉफीने करतात. कॉफी प्यायल्याने शरीरात स्फूर्ती येते (Black Coffee is beneficial for weight loss during Intermittent Fasting).

कॉफीमध्ये कॅफिन असते जे, आपल्याला त्वरित ऊर्जा देते. पण जे, Intermittent Fasting  करतात, ब्लॅक हा त्यांच्यासाठी चांगला पर्याय आहे. परंतु, जास्त प्रमाणात कॉफी आपल्यासाठी हानिकारक असू शकते. जर आपण Intermittent Fasting करून, ब्लॅक कॉफी प्यायली, तर ती फारशी हानिकारक ठरणार नाही. परंतु, आपण दिवसभरात किती कप कॉफी पितो यावर ते अवलंबून आहे.

ब्लॅक कॉफी Intermittent Fasting  दरम्यान फायदेशीर!

उपवास करताना कॉफी पिणे आपल्यासाठी चांगले आहे. त्यात कमी कॅलरी असतात. म्हणूनच डाएटिशन्स आपल्याला ब्लॅक कॉफी पिण्याची शिफारस करतात. ब्लॅक कॉफीमध्ये कॅलरीची संख्या अवघी 2 ते 3 असते. त्यात खनिज व प्रथिने कमी प्रमाणात असतात. कॉफी पिण्यामुळे आपल्याला फार काळ भूक लागत नाही.

जर, आपण दिवसभर 2 ते 3 कप कॉफी प्यायलात, तर त्याचा आपल्या चयापचय आणि वजन कमी करण्यावर फारसा परिणाम होणार नाही. म्हणूनच ब्लॅक कॉफी पिणे फायदेशीर मानले जाते.

दररोज किती कप कॉफी प्याल?

कॉफी कमी कॅलरीयुक्त पेय आहे. हे आपली भूक शांत ठेवते. दररोज 2 ते 3 कप ब्लॅक कॉफी पिणे चांगले आहे. परंतु, जर तुम्ही जास्त कॉफी प्यायली, तर ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. कॉफी पिण्यामुळे डोकेदुखी, हृदय गती वाढणे, तणाव आणि झोपेच्या पद्धतींशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. याशिवाय कॉफी पिताना साखर, मलई इत्यादी गोष्टी लक्षात घ्या. आपण साखरेऐवजी मध आणि गूळ वापरू शकता (Black Coffee is beneficial for weight loss during Intermittent Fasting).

कोणी पिऊ नये?

बर्‍याच अभ्यासानुसार असे आढळले आहे की, जे लोक नियमितपणे उपवास करतात आणि ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांनी कॉफी पिऊ नये. कॅफिनमुळे रक्तदाब वाढतो. म्हणून कॉफी पिण्यापूर्वी, आपल्या डॉक्टरांकडून सल्ला नक्कीच घ्या.

काय आहे इंटरमिटेंट फास्टिंग?

वजन कमी करण्यासाठी सध्या इंटरमिटेंट फास्टिंग लोकप्रिय आहे. इंटरमिटेंट फास्टिंग करणे हा कोणत्याही प्रकारचा आहार नाही. ही आहाराची एक पद्धत आहे, ज्यामध्ये आपल्याला किमान 12 ते 16 तास न खाता  राहावे लागते.

(टीप : सेवानापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Black Coffee is beneficial for weight loss during Intermittent Fasting)

हेही वाचा :

Skimmed  Milk | स्किम्ड दुधाचे सेवन करताय? थांबा! आधी जाणून घ्या याचे दुष्परिणाम…

Kidney Stone | मुतखड्याच्या समस्येने त्रस्त आहात? मग, चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ!

वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.