डिस्पोजेबल ग्लास वापरून बनवा परफेक्ट चोकोबार, पाहा शेफ कुणाल कपूर यांचा भन्नाट जुगाड
उन्हाळ्यात चोकोबार आईस्क्रीम खायची आहे ते ही बाजारात मिळतात तसे, तर घरगुती पद्धतीने शेफ कुणार कपूर यांनी शेअर केलेली रेसिपी आज आपण या लेखात जाणून घेऊयात.

उन्हाळा सुरू झाला की आपण सर्वांनी चोकोबार आईस्क्रीम खालेली असेलच. उन्हाळ्याच्या सुट्टीत तर हमखास चोकोबार आईस्क्रीम खातोच. अशातच हीच चोकोबार आईस्क्रीम तुम्हाला घरी बनवून खायची असेल तर याची सर्वात सोपी रेसिपी शेफ कुणाल कपूर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केलेली आहे. ज्यात तुम्हाला चोकोबार आईस्क्रीमचा बाहेरील चॉकलेटचा कोटींग बनवणे कठीण वाटत असेल तर तो बनवणे अगदी सोपा आहे. त
उन्हाळ्यात आईस्क्रीमचा प्रत्येक घास ताजेपणा देतो आणि त्यातही चॉकलेट असेल तर ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच आवडते असते. एकदा तुम्ही घरी चोकोबार आईस्क्रीम बनवले की, तुम्हाला पुन्हा आईस्क्रीम पार्लरमध्ये जावेसे वाटणार नाही. चला तर मग, शेफ कुणाल कपूर यांची ही रेसिपी स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात.
घरी बनवलेले चोकोबार आईस्क्रीम
चोकोबारसाठी लागणारे साहित्य?
हे बनवण्यासाठी तुम्हाला सुमारे 1 कप डार्क चॉकलेट (बारीक केलेले), 1 मोठा चमचा खोबरेल तेल, 1/2 कप व्हिपिंग क्रीम, व्हॅनिला इसेन्सचे काही थेंब आणि 1/4 कप कंडेन्स्ड मिल्क लागेल.
चोकोबार आईस्क्रीम रेसिपी
- प्रथम कापलेले डार्क चॉकलेट डबल बॉयलरमध्ये वितळवा (एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम करा आणि त्यावर एका वाटीत चॉकलेट ठेवून वितळवा).
- तुम्ही चॉकलेटमध्ये खोबरेल तेल देखील मिक्स करू शकता, कारण त्यामुळे त्याला चमक आणि मऊपणा येतो. तसेच आईस्क्रीमच्या बाहेरील चॉकलेटचा थर ब्रेक होत नाही.
- दरम्यान चॉकलेट बार बनवण्यासाठी लहान डिस्पोजेबल ग्लास घ्या आणि त्यांना कात्रीने बाजूने उभे बारीक कापून घ्या.
- ग्लास कापल्यानंतर त्यात वितळलेले चॉकलेट टाका आणि त्याला व्यवस्थित संपूर्ण ग्लासभर पसरवा. याप्रमाणे सर्व ग्लास तयार करा.
- तयार केलेले सर्व ग्लास फ्रीझरमध्ये ठेवा, जेणेकरून चॉकलेट व्यवस्थित घट्ट होऊन त्याचे थर तयार होतील.
- आता तुम्हाला शुगर-फ्री व्हिप्ड क्रीम घेऊन त्यात व्हॅनिला इसेन्स टाकावा लागेल आणि ते हलके व फुलके होईपर्यंत फेटून घ्या.
- आता क्रीममध्ये कंडेन्स्ड मिल्क मिक्स करून पुन्हा थोडे फेटून घ्या, जेणेकरून क्रीम व्यवस्थित तयार होईल.
- सर्व फ्रीझरमध्ये ठेवलेले ग्लास बाहेर काढा आणि आता यात व्हीप्ड क्रीमने काठोकाठ भरा.
- आता संपूर्ण कप सिल्व्हर फॉइलने झाका. चाकूने मध्यभागी एक काप द्या आणि त्यात आईस्क्रीमच्या काड्या टाका.
- हे कप कमीतकमी 4 तास फ्रीझरमध्ये ठेवा. या वेळेत तुमचे चॉकलेट बार व्यवस्थित सेट होतील.
- आता कपातील रिकामी जागा उरलेल्या वितळलेल्या चॉकलेटने भरा. हे लगेच घट्ट होईल.
- आता तुम्ही बनवलेल्या चोकोबार आईस्क्रीम डिस्पोजेबल ग्लास हलक्या हाताने काढून टाका. तुमचा बाजारात मिळणारा चोकोबार घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवून खाण्यास तयार आहे.
टिप्स लक्षात ठेवा
या चॉकलेट बारला कुरकुरीतपणा आणण्यासाठी तुम्ही व्हीप्ड क्रीममध्ये चॉको चिप्स मिक्स करा. अधिक घट्टपणासाठी, तुम्ही त्यावर चॉकलेटचे दुहेरी आवरण लावू शकता. हे फ्रोझन आईस्क्रीम असल्यामुळे ते लवकर घट्ट होईल. थोड्या वेगळ्या चवीसाठी, तुम्ही व्हीप्ड क्रीमऐवजी घट्ट केलेले दूध वापरू शकता. तुम्ही कस्टर्ड पावडर आणि थोडे मिल्क पावडर देखील घालू शकता, ज्यामुळे तुमच्या आईस्क्रीमला कुल्फीसारखी चव येईल.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)