लवंगमुळे केस लांब, दाट आणि चमकदार होतात, फक्त त्याचा असा वापर करा

| Updated on: Jun 04, 2023 | 5:02 PM

लवंगमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील आढळतात, जे घाण, कोंडा आणि बॅक्टेरिया दूर करण्यास उपयुक्त आहेत. इतकंच नाही तर लवंगमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात जे तुमच्या अकाली पांढऱ्या केसांना रोखतात, तर चला जाणून घेऊया केसांच्या वाढीसाठी लवंगाचे पाणी कसे बनवावे.

लवंगमुळे केस लांब, दाट आणि चमकदार होतात, फक्त त्याचा असा वापर करा
Clove
Follow us on

मुंबई: लवंग हा एक मसाला आहे जो अन्नाची चव आणि गंध वाढविण्यासाठी वापरला जातो. त्याचबरोबर ते खाल्ल्याने आपल्या आरोग्यालाही बरेच फायदे होतात. पण तुम्हाला माहित आहे का की लवंग तुमच्या केसांना निरोगी बनवण्यास देखील मदत करू शकते. तसे नसेल तर आज आम्ही तुमच्यासाठी केस वाढवण्यासाठी लवंगाचे पाणी बनवण्याची पद्धत घेऊन आलो आहोत. लवंगमध्ये व्हिटॅमिन-के आणि बीटा-कॅरोटीन असते जे केसांच्या टाळूला पोषण देते आणि केसांच्या वाढीस मदत करते. याशिवाय तुमचे केसांचं प्री-रॅडिकल्सपासूनही संरक्षण होतं आणि ते केसांना मजबूत बनवतात. त्याचबरोबर लवंगमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील आढळतात, जे घाण, कोंडा आणि बॅक्टेरिया दूर करण्यास उपयुक्त आहेत. इतकंच नाही तर लवंगमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात जे तुमच्या अकाली पांढऱ्या केसांना रोखतात, तर चला जाणून घेऊया केसांच्या वाढीसाठी लवंगाचे पाणी कसे बनवावे.

केसांच्या वाढीसाठी लवंगाचे पाणी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य-

  • लवंग १०-१२
  • कढीपत्ता ८-१०
  • पाणी २ कप

केसांच्या वाढीसाठी लवंगाचे पाणी कसे बनवावे?

  • केस वाढवण्यासाठी लवंगाचे पाणी बनवण्यासाठी कढई घ्या.
  • नंतर त्यात २ कप पाणी घालून उकळावे.
  • त्यानंतर त्यात १०-१२ लवंगा आणि ८-१० कढीपत्ता घाला.
  • मग हे पाणी नीट उकळून घ्या.
  • यानंतर गॅस बंद करून थंड होण्यासाठी सोडावे.
  • मग ते थंड झाल्यावर तुम्ही ते एका भांड्यात फिल्टर करा.
  • आपण हे पाणी सुमारे 2 आठवडा रेफ्रिजरेटरमध्ये देखील ठेवू शकता.

लवंगाच्या पाण्याचा वापर कसा करावा?

पहिला मार्ग

शॅम्पू आणि कंडिशनरने केस चांगले धुवावेत आणि नंतर लवंगाचे पाणी केसांना लावावे. नंतर केसांमध्ये घालून थोडा वेळ सोडा. त्यानंतर पुन्हा एकदा केस स्वच्छ पाण्याने धुवून स्वच्छ करा. यामुळे तुमचे केस गळणे थांबेल, केसांची लांबी वाढेल आणि केसांमध्ये चमक येईल.

दुसरा मार्ग

यासाठी तुम्ही तुमच्या केसांच्या टाळूमध्ये लवंगाचे पाणी चांगले लावू शकता आणि हलक्या हातांनी मसाज करू शकता. नंतर सुमारे 1-2 तास केसांमध्ये ठेवा. यानंतर माइल्ड शॅम्पूच्या मदतीने केस धुवावेत. चांगल्या परिणामांसाठी, आपण आठवड्यातून एकदा ही रेसिपी वापरुन पहा.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)