AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Benefits Of Coconut Milk : कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नारळाचे दूध अत्यंत फायदेशीर, वाचा !

उन्हाळ्यात नारळाचे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण तुम्हाला माहित आहे का? नारळाचे दूध आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे?

Benefits Of Coconut Milk : कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नारळाचे दूध अत्यंत फायदेशीर, वाचा !
नारळाचे दूध
| Updated on: May 11, 2021 | 4:40 PM
Share

मुंबई : उन्हाळ्यात नारळाचे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण तुम्हाला माहित आहे का? नारळाचे दूध आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे? नारळाचे दूध पिल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. त्यात अनेक पौष्टिक पदार्थ असतात. चला आपण जाणून घेऊया नारळाचे दूध पिण्याचे काय फायदे आहेत. (Coconut milk is beneficial for boosting the immune system)

नारळ दुधातील पोषक बहुतेक लोकांना असे वाटते की, नारळाच्या आतल्या पाण्याला नारळ दुध असे म्हणतात. पण असे नाही नारळाची पेस्ट तयार करून नारळाचे दूध काढले जाते. नारळाच्या दुधात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी 1, 3, 5, 6, लोह, सेलेनियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असतात. या दूधाचा उपयोग मिठाई आणि इतर अनेक पदार्थांमध्ये केला जातो.

नारळाच्या दुधाचे फायदे

हाडे मजबूत करण्यासाठी – हाडे मजबूत करण्यासाठी आपण नारळाचे दूध घेऊ शकता. त्यात कॅल्शियम आणि फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते. हाडे मजबूत करण्यास मदत करते.

कोलेस्ट्रॉल नियंत्रण – नारळाच्या दुधात संतृप्त चरबी असते. हे कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यास मदत करते. त्यात लॅरिक अॅसिड असते. हे चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते. म्हणूनच, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी आपण आपल्या आहारात नारळाच्या दुधाचा समावेश करू शकता.

रोगप्रतिकारक शक्तीसाठी – नारळाच्या दुधात अँटीफंगल आणि अँटीवायरल गुणधर्म असतात. ते शरीरातील विषाणू आणि बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करतात. ते रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करतात.

वजन कमी करण्यासाठी – नारळाचे दूध फॅटी एजंटसाठी देखील ओळखले जाते. त्यात फायबर असते. नारळाचे दूध आहारात घेतल्याने बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. हे वजन नियंत्रित करण्यास मदत करते. म्हणून वजन कमी करण्यासाठी याचे सेवन केले जाऊ शकते.

केसांसाठी – 5 मिनिटांसाठी नारळाच्या दुधाने मालिश करा आणि 15 ते 20 मिनिटे तसेच ठेवा. हे केस मजबूत करते. तसेच केसांच्या वाढीस मदत करते. जर तुमचे केस कमकुवत असतील तर आपण दररोज नारळाचे दूध आपल्या केसांवर लावू शकतो.

संधिवात उपचार – नारळाच्या दुधात सेलेनियम नावाचा अँटीऑक्सिडंट असतो. हे सांध्यातील वेदना आणि पुर: स्थांच्या समस्यांस आराम देते. प्रोस्टेस्टचा धोका कमी करण्यासाठी आपण याचा वापर देखील करू शकता.

संबंधित बातम्या : 

(Coconut milk is beneficial for boosting the immune system)

Follow Us
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती.....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू....
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर.
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले.....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.