AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चेहऱ्यावरील टॅनिंग काढण्यासाठी कॉफी फेसपॅक फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !

बदलेल्या जीवनशैलीमुळे त्वचेची आणि केसांची समस्या सामान्य झाली आहे. चेहऱ्यावर मुरुम आणि पिगमेंटेशनसारख्या अनेक समस्या उद्भवतात.

चेहऱ्यावरील टॅनिंग काढण्यासाठी कॉफी फेसपॅक फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !
फेसपॅक
| Updated on: Apr 15, 2021 | 11:07 AM
Share

मुंबई : बदलेल्या जीवनशैलीमुळे त्वचेची आणि केसांची समस्या सामान्य झाली आहे. चेहऱ्यावर मुरुम आणि पिगमेंटेशनसारख्या अनेक समस्या उद्भवतात. ज्याचा तुमच्या सौंदर्यावर परिणाम होतो. जर अशी काही समस्या तुम्हालाही असेल आणि अनेक उपाय करूनही उपयोग झाला असेल तर कॉफीने बनविलेले फेसपॅक वापरुन पहा. हे चेहरा निरोगी आणि चांगले ठेवण्यासाठी मदत करते. कॉफीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात ज्यामुळे त्वचेच्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत होते. (Coffee facepack beneficial for removing facial tanning)

कॉफी त्वचेमध्ये एक्फोलीएटर म्हणून कार्य करते जे टॅन काढून टाकण्यास मदत करते. तसेच चेहऱ्यावरील डाग दूर करण्यास मदत करते. यासाठी, आपल्याला एका भांड्यात एक चमचा कॉफी, दही आणि एक चिमूटभर हळद घालून पेस्ट तयार करावी लागेल. नंतर ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि सुमारे 20 मिनिटांनंतर पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा ही पेस्ट चेहऱ्याला लावा.

लिंबूमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असते, जे त्वचा चमकदार बनविण्यासाठी कार्य करते. हे फेसपॅक बनविण्यासाठी तुम्हाला एका भांड्यात एक चमचा कॉफी आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळावा लागेल. ते चांगले मिसळावे जेणेकरुन ते एकसारखे मिक्स व्हायला पाहिजे. ही पेस्ट सुमारे 15 मिनिटे चेहर्‍यावर लावा आणि नंतर ते पाण्याने धुवा.

एक चमचा मध आणि कॉफी पावडर घ्या आणि ते ऑलिव्ह ऑईलमध्ये चांगले मिसळा आणि ते आपल्या केसांच्या मुळांना लावा आणि कमीत कमी अर्धा तास ठेवा. यानंतर केस शॅम्पूने धुवा. हे पॅक आपले केस हायड्रेटेड ठेवते, तसेच केसांची वाढ सुधारण्यास मदत करते.

फेस पॅक बनविण्यासाठी कॉफी पावडर एक चमचा मधात व्यवस्थित मिसळा आणि हातांनी हलक्या हाताने मसाज करा. यानंतर 15 ते 20 मिनिटांसाठी पॅक चेहऱ्यावर ठेवा. मग आपले तोंड धुवा. खरं तर, कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात, तसेच यामध्ये अँटी एजिंग गुणधर्म देखील असतात. ज्यामुळे आपली त्वचा चमकदार बनते आणि चेहर्‍यावरील सुरकुत्याची समस्या दूर होते.

हे ही लक्षात ठेवा

1. कॉफी फेसपॅक वापरल्यानंतर काही वेळ घरातून बाहेर पडू नका अन्यथा धूळ आणि मातीचे कण आपल्या पॅकचा परिणाम कमी करतील.

2. फेसपॅक लावण्यापूर्वी तोंड पूर्णपणे स्वच्छ करा. जर तुमचा मेकअप असेल तर तो पूर्णपणे काढा.

3. कॉफी फेसपॅक वापरवल्यानंतर उरले असेल तर ते वापरु नका. कारण यामुळे बॅक्टेरिया होऊ शकतात.

संबंधित बातम्या : 

Apple Cider Vinegar | सफरचंदाचे व्हिनेगर पिणे आरोग्यवर्धक? पाहा तज्ज्ञ काय म्हणतायत…

हंगामी सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय ‘काळीमिरी’, जाणून घ्या याचे महत्त्वाचे फायदे…

(Coffee facepack beneficial for removing facial tanning)

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.