Apple Cider Vinegar | सफरचंदाचे व्हिनेगर पिणे आरोग्यवर्धक? पाहा तज्ज्ञ काय म्हणतायत…

Apple Cider Vinegar | सफरचंदाचे व्हिनेगर पिणे आरोग्यवर्धक? पाहा तज्ज्ञ काय म्हणतायत...
Apple Cider Vinegar

अॅपल सायडर व्हिनेगर सकाळपेक्षा रात्रीच्या वेळी सेवन केल्याने अधिक फायदा होतो. तथापि, ते कोणत्या वेळेत पिणे अधिक फायदेशीर आहे, याबाबत कोणतेही ठोस पुरावे नाहीत

Harshada Bhirvandekar

|

Dec 29, 2020 | 12:12 PM

मुंबई : अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये औषधी गुणधर्म असतात, ज्यामुळे बरेच रोग दूर राहतात. अॅपल सायडर व्हिनेगर, सफरचंद आणि यीस्ट बॅक्टेरिया यांचे मिश्रण करून बनवले जातात. हे केवळ एक पेयच नाही तर, त्यात अनेक खनिजे, जीवनसत्त्वे आणि बरेच अ‍ॅसिड असतात (Health benefits of Apple Cider Vinegar).

अॅपल साइडर व्हिनेगर विशेषतः वजन कमी करण्यासाठी वापरले जाते. हे पेय सेवन केल्याने मधुमेह टाईप 2, उच्च कोलेस्ट्रॉलसारखे आजार बरे होतात. अॅपल सायडर व्हिनेगरच्या फायद्यांविषयी बहुतेक लोकांना माहित आहे. परंतु, अॅपल साइडर व्हिनेगर पिण्याचे नेमके प्रमाण आणि नेमका वेळ याबद्दल फारच कमी लोकांना माहिती असते किंबहुना याबाबत संभ्रम असतो. चला तर या सर्व गोष्टींबद्दल जाणून घेऊया…

अॅपल सायडर व्हिनेगर सकाळपेक्षा रात्रीच्या वेळी सेवन केल्याने अधिक फायदा होतो. तथापि, ते कोणत्या वेळेत पिणे अधिक फायदेशीर आहे, याबाबत कोणतेही ठोस पुरावे नाहीत

सकाळच्या वेळी सेवन

जर, आपल्याला बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या असेल, तर सकाळच्या वेळी अॅपल सायडर व्हिनेगर सेवन करा. सकाळी एका ग्लास पाण्यात, एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर मिसळून सेवन केल्याने ही समस्या कमी होईल.

रात्रीच्या वेळी सेवन

त्याचबरोबर काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, रात्रीच्या वेळी अॅपल सायडर व्हिनेगरचे सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहते. याशिवाय तुम्हाला शांत झोप लागते, ज्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहते. अॅपल सायडर व्हिनेगर, मध आणि कोमट पाण्यात मिसळून प्या.

2016च्या अहवालानुसार दररोज एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर पिणे आरोग्यासाठी चांगले आहे. तथापि, आपण ते किती प्रमाणात सेवन करावे यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा (Health benefits of Apple Cider Vinegar).

अॅपल सायडर व्हिनेगरचे फायदे :

– अॅपल साइडर व्हिनेगरमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात. जे आपले वजन कमी करण्यात मदत करतात. याशिवाय, रक्तातील साखर देखील कमी करते, ज्यामुळे मधुमेह होण्याचा धोका कमी होतो.

– हे व्हिनेगर आपल्या शरीरास कर्करोगापासून वाचवते आणि कर्करोगाच्या पेशी वाढण्यास प्रतिबंध करते. कर्करोगासारख्या गंभीर आजारापासून बचाव करण्याबरोबरच तुमची रोगप्रतिकारशक्तीही वाढते.

– शरीरातील आम्ल पातळी नियंत्रित करते, त्यामुळे पचनशक्ती देखील वाढते.

– कोणत्याही प्रकारच्या जखमेच्या बऱ्या करण्यासाठी अॅपल साइडर व्हिनेगर खूप फायदेशीर आहे. हे विविध जीवाणू आणि बुरशीजन्य संसर्ग रोखण्यास मदत करते.

(Health benefits of Apple Cider Vinegar)

हेही वाचा :

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें