पुरुषांना त्यांच्यापेक्षा वयानं मोठ्या महिला, पार्टनर, पत्नी म्हणून का आवडतात? वाचा ही 9 कारणं!

| Updated on: Jun 01, 2021 | 9:15 AM

नवरा तरुण असतो तर पत्नी किंवा पार्टनर ही वयानं त्याच्यापेक्षा काहीशी मोठी, अशी उदाहरणं हल्ली सर्रास पाहायला मिळतात, काय आहेत त्यामागील कारणं (Younger men prefer older women)

पुरुषांना त्यांच्यापेक्षा वयानं मोठ्या महिला, पार्टनर, पत्नी म्हणून का आवडतात? वाचा ही 9 कारणं!
Couple
Follow us on

मुंबई : हॉलीवुड असो की बॉलीवुड किंवा उद्योग जगत, अनेक कपल्समध्ये एक गोष्ट पहायला मिळते. नवरा तरुण असतो तर पत्नी किंवा पार्टनर ही वयानं त्याच्यापेक्षा काहीशी मोठी. काही वर्षानं वयस्कर. खरं तर अनेक पुरुष हे ह्या कन्सेप्टच्याच प्रेमात पडलेले दिसतात. काही सेलिब्रिटी बघा. प्रियंका चोप्रा ही निक जोनसपेक्षा मोठी आहे तर सैफ अली खान आणि अमृता सिंगमध्ये केवढं अंतर आहे. ऐश्वर्या राय बच्चन ही अभिषेकपेक्षा वयानं मोठी आहे. सचिन तेंडुलकर आणि पत्नी अंजली यांच्याबाबतही वयाचं अंतर ठळक दिसतं. (Couple and Relationships Reasons why Younger men prefer older women as life partner)

हे खरं तर आता काही नवीन नाही. जी गोष्ट सेलिब्रिटीमध्ये दिसते तीच आता सामान्य लोकांमध्येही दिसतेय. अनेक जणांनी हे मान्य केलंय की वयानं त्यांच्यापेक्षा मोठ्या बायका त्यांना आवडतात. त्याला काही विशिष्ट कारणेही आहेत. ती नेमकी काय आहेत? खाली दिलेली 9 कारणं तुम्ही वाचायलाच हवीत.

1.अशा महिला ह्या मॅच्युअर(प्रगल्भ) असतात. अनुभवी असतात. त्या चांगला संवाद करु शकतात, समतोल साधण्यात वाकबगार असतात.

2. वयानं मोठ्या महिला ह्या पूर्ण वेळ काही गॉसिप करत नाहीत. त्या अनुभवी असल्यामुळे एखाद्या व्यक्तीशी कसं वागायचं, प्रश्न कसा सोडवायचा हे त्यांना नक्की माहित असतं. स्वत:चं फस्ट्रेशन काढण्यासाठी त्यांना नेहमी पार्टनरसोबत गॉसिप नाही करावं लागत. त्या प्रगल्भपणे ती गोष्ट हाताळतात.

3. अशा महिला ह्या आत्मविश्वासू असतात. त्यांचं स्वत:बद्दलचं मत हे प्रचंड सकारात्मक असतं. उगीच आपण कसे बरोबर आहोत हे दाखवण्याचा त्या प्रयत्न करत नाहीत. त्यांना कठिण वेळेशी कसा सामना करायचा हे माहिती असतं.

4. लैंगिक प्रगल्भता (Sexual maturity) हे आणखी एक मुख्य कारण आहे वयानं अधिकच्या महिला आवडीचं. अनेक तरुण पुरुषांनी हे मान्य केलंय की अशा बायका पार्टनर म्हणून बेडमध्ये बेटर असतात.

5. अशा महिला पुरुषांना हवा असलेला व्यक्तीगत स्पेस देतात. प्रगल्भतेमुळे त्या रिलेशनशिपमध्ये कोणत्याही किरकिऱ्या करत नाहीत. नातेसंबंधाचा आदर ठेवतात.

6. वयानं मोठ्या असलेल्या बायका ह्या भावनिकदृष्ट्या प्रगल्भ असतात. त्यामुळे चुकून कधी संबंध धोक्यात आले तर बिन कामाचा ड्रामा करत नाहीत. पुरुषांना असा तमाशा सहसा आवडत नाही. वयस्कर महिला त्या प्रगल्भपणे हाताळतात.

7. अशा महिलांना डेट करणं म्हणजे दरदिवशी नवीन काही तरी शिकणं असतं, ज्ञानात भर टाकणारं असतं. वयस्कर महिलांसोबतचा प्रत्येक क्षण नवं काही तरी शिकवणारा असतो.

8. पुरुषांना आपल्यापेक्षा जास्त वयाच्या महिला आवडण्याचं आणखी एक कारण म्हणजे पैसा. वयानं मोठ्या असलेल्या महिला ह्या आर्थिक जबाबदारीही घेतात ज्यामुळे पुरुषाच्या खांद्यावरचं ओझं कमी होतं.

9. दोघेही जण ज्यावेळेस प्रगल्भ असतात तेव्हा नात्यांमध्ये आदर असतो. एकमेकांना समजून घ्यायची तयारी असते. त्यामुळे ते नातेही फुलते.

संबंधित बातम्या :

Relationship Tips | कामाच्या ताणामुळे जोडीदाराला वेळ देता येत नाहीय? मग, ‘असा’ करा टाईम मॅनेज!

प्रियंकाने शेअर केलं निकसोबतच्या ‘यशस्वी’ लग्नाचं गुपित, अशा प्रकारे ठेवतात एकमेकांना आनंदी!

(Couple and Relationships Reasons why Younger men prefer older women as life partner)