Relationship Tips | कामाच्या ताणामुळे जोडीदाराला वेळ देता येत नाहीय? मग, ‘असा’ करा टाईम मॅनेज!

बहुतेक लोकांवर कार्यालयीन कामाचा बोजा  वाढला आहे आणि त्यामुळे कुटुंबाला पुरेसा वेळ देणे कठीण झाले आहे. त्यामुळे घरात आणि नात्यांमध्येही तणाव वाढतो, तसेच घरात नवरा-बायकोमधील वादही वाढतात.

Relationship Tips | कामाच्या ताणामुळे जोडीदाराला वेळ देता येत नाहीय? मग, ‘असा’ करा टाईम मॅनेज!
आजकाल प्रत्येकजण पैसे मिळवण्याच्या स्पर्धेत टिकून राहण्याचा प्रयत्न करत आहे.
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 3:23 PM

मुंबई : आजकाल प्रत्येकजण पैसे मिळवण्याच्या स्पर्धेत टिकून राहण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे, बहुतेक लोकांवर कार्यालयीन कामाचा बोजा  वाढला आहे आणि त्यामुळे कुटुंबाला पुरेसा वेळ देणे कठीण झाले आहे. त्यामुळे घरात आणि नात्यांमध्येही तणाव वाढतो, तसेच घरात नवरा-बायकोमधील वादही वाढतात. ज्यामुळे परस्पर संबंधांमध्ये काहीसा दुरावा येत आहे (Relationship tips for balancing personal and professional life).

आपल्या बाबतीतही असेच काही घडत असेल, तर यामुळे अस्वस्थ होण्याची गरज नाही. आपण आज अशा काही टिप्स जाणून घेणार आहोत, ज्याद्वारे आपण आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन साधू शकाल. तसेच पुन्हा एकदा आपल्या जोडीदाराशीही अधिक चांगले संबंध निर्माण करू शकाल आणि नात्यांमध्ये गोडपणा पुन्हा परतून येईल…

परस्पर संवादात दरी निर्माण होऊ देऊ नका.

कोणत्याही नात्यात, संवादातील पोकळीमुळे गैरसमज होऊ शकतात. म्हणून आपल्या जोडीदाराबरोबर गोष्टी शेअर करण्याची सवय लावा. जर कामाच्या ठिकाणी अतिरिक्त कामाचा भार असेल, तर त्याबद्दल त्यांना समजावून सांगा. यामुळे त्यांच्या मनात चालू असलेल्या निरुपयोगी गोष्टींचा अंत होईल आणि ते आपल्या परिस्थितीस समजून घेतील, तसेच समर्थन देखील देतील.

इतरांशी स्वतःची तुलना करण्याची सवय सोडून द्या.

काही लोकांना अशी सवय असते की, ते अप्रत्यक्षपणे प्रत्येक गोष्टीवर कोणाचीतरी उदाहरणे देऊन आपल्या जोडीदाराची तुलना करतात. परंतु, असे करू नये. प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळे दोष व सामर्थ्य असतात. एक जोडीदार म्हणून, आपल्या जोडीदाराच्या गुणवत्तेचे कौतुक करा आणि त्याच्यातील उणीवा दूर करण्याचा प्रयत्न करा (Relationship tips for balancing personal and professional life).

आठवड्यातून एक दिवस बाहेर जा.

नक्कीच आपण खूप कामात व्यस्त आहात. परंतु, आठवड्यातून किमान एक दिवस कुटुंबासाठी वेळ काढला जाऊ शकतो. अशा वेळी आपल्या जोडीदारासह फिरायला जा आणि त्यांच्या आवडत्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. यामुळे आपणास आणि आपल्या जोडीदारास छान वाटते आणि आपले नाते अधिक घट्ट होते.

कामाच्या ठिकाणचा राग घरी आणू नका.

बर्‍याच वेळा कामाच्या ठिकाणी कोणाशी वाद किंवा भांडण होत असेल, तर लोक घरी येतात आणि संतापून आपल्या कुटुंबावर रागावतात. आपली ही वाईट सवय केवळ आपल्या नात्यांमधील संबंध खराब करेल. राग येण्याऐवजी, जर तुम्ही तुमचे मन आपल्या जोडीदारासमोर हलके केले, तर तुमचे मनही शांत होईल आणि कदाचित त्यावर तोडगा देखील मिळेल.

एकत्र निर्णय घ्या.

नवरा-बायकोचे नाते एक समान नाते असते. म्हणून आपले कोणतेही निर्णय आपल्या जोडीदारावर जबरदस्तीने लादू नका. जीवनाशी संबंधित कोणताही निर्णय एकत्रितपणे घ्या. कारण लग्नानंतर पती-पत्नीचे आयुष्य फक्त एकच नसते, तर त्याचे हित दोघांशीही संबंधित असते.

(Relationship tips for balancing personal and professional life)

हेही वाचा :

Beauty Tips | लग्नकार्यात सुंदर दिसायचंय? मग, आहारात सामील करा ‘हे’ घटक!

Apple Peel | सफरचंदाच्या सालीने नाहीशा होतील त्वचेच्या अनेक समस्या, नक्की वापरून पाहा!

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.