Beauty Tips | लग्नकार्यात सुंदर दिसायचंय? मग, आहारात सामील करा ‘हे’ घटक!

लग्नाच्या दिवशी प्रत्येकाची नजर फक्त वधूवर खिळलेली असते. परंतु, लग्नकार्याच्या धावपळीत तणाव येऊ लागतो आणि चेहर्‍यावरची नैसर्गिक चमक कमी होऊ लागते. (Natural face glow tips)

Beauty Tips | लग्नकार्यात सुंदर दिसायचंय? मग, आहारात सामील करा ‘हे’ घटक!
लग्नकार्यात सुंदर दिसायचंय?
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 2:52 PM

मुंबई : सध्या सगळीकडेच लग्नकार्याची धामधूम सुरु आहे. प्रत्येक घरात कोणते ना कोणते कार्य सुरु आहे. अशावेळी आपण या समारंभात जात असाल, किंवा तुम्ही स्वतःच या कार्यक्रमांच्या उत्सव मूर्ती असाल, तर बऱ्याचदा आपल्याला खूप टेन्शन येते. अशा कार्यक्रमांच्या वेळी धावपळीच्या नादात आपण स्वतःकडे लक्ष देणे विसरून जातो (Natural face glow tips for bride to be).

प्रत्येक मुलीला तिच्या लग्नात सुंदर दिसण्याची इच्छा असते. प्रत्येकासाठी आयुष्यातील ही सर्वात खास संधी असते. या दिवशी आपण वेगळे दिसावे, असे प्रत्येकालाच वाटते. कारण, या दिवशी प्रत्येकाची नजर फक्त वधूवर खिळलेली असते. परंतु, लग्नकार्याच्या धावपळीत तणाव येऊ लागतो आणि चेहर्‍यावरची नैसर्गिक चमक कमी होऊ लागते. जर, आपणही या काळात बोहल्यावर चढण्याचा विचार करत असाल, तर आपल्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी आपण या ‘टिप्स’चे अनुसरण करू शकता.

आपल्या आहारात फळे सामील करा.

आपण आपल्या आहारात फळांचा समावेश करणे आवश्यक आहे. जर, आपल्याला फळ खायला आवडत नसेल, तर आपण त्याचा रस देखील पिऊ शकता. फळांचे सेवन करण्याव्यतिरिक्त, आपण आपल्या त्वचेसाठी देखील त्याचा वापर करू शकता. यासाठी तुम्ही पपई मॅश करून फेस पॅकप्रमाणे चेहर्‍यावर लावा, यामुळे चेहरा चमकदार होईल. याच प्रमाणे, केळी मॅश करा आणि त्यात एक चमचा ऑलिव्ह ऑईल मिसळा व आपल्या स्काल्प आणि केसांवर लावा. हा हेअर मास्क आपले केस रेशमी आणि मऊ करेल.

साधे पाणी आणि नारळाचे पाणी वापरा.

दररोज किमान 6 ते 8 ग्लास पाणी प्या. जर आपण पाण्याचे सेवन करण्यास असमर्थ असाल, तर दररोज किमान एक नारळ पाणी प्यावे. तसेच, थंड पाण्याने 5-6 वेळा आपला चेहरा धुवाव. हे केवळ चेहऱ्यावर चमक आणत नाही, तर तुमच्या शरीरात उर्जा देखील निर्माण करेल (Natural face glow tips for bride to be).

भरपूर ड्राय फ्रुट्स खा.

यादरम्यान आपण दररोज ड्राय फ्रुट्सचे सेवन देखील केले पाहिजे. ड्राय फ्रुट्समध्ये बदाम, अक्रोड, पिस्ता आणि अंजीर यासारख्या फळांचा वापर करा. यासह दुधामध्ये बदाम उगाळून हा लेप चेहर्‍यावर मास्क म्हणून वापरा.

भाज्या खाण्यासोबातच चेहऱ्यावर आणि केसांवर लावा.

आपण दररोज हिरव्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत आणि शक्य असल्यास त्यांचे सूप देखील प्यायले पाहिजे. विशेषतः टोमॅटो आणि पालकाचे सेवन करावे. यासह चेहऱ्यावर टोमॅटोचा रस लावून, काही वेळ मसाज करावा.

व्यायामाला प्राधान्य द्या.

दररोज व्यायाम करण्याची आणि योग करण्याची सवय लावा. याशिवाय कमीत कमी 20 मिनिटे चाला. हा व्यायाम प्रकार आपला ताण कमी करण्यासाठी आणि रक्त परिसंचरण वाढवण्यासाठी काम करेल.

(Natural face glow tips for bride to be)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.