फोनचा अतिवापर करताय? सोशल मीडियापासून निवांतपणा हवा असेल तर त्यासाठी खास 10 टीप्स

कधी तुम्ही असा विचार केला आहे का की,आपला स्मार्टफोन तुम्हाला कंट्रोल करत आहे की त्याला तुम्ही कंट्रोल करत आहात. बाहेरून तुम्हाला वाटेल की, तुम्हीच तुमच्या स्मार्टफोनला कंट्रोल करता. जसे तुम्हाला वाटते, जेव्हा वाटते तसेच तुम्ही स्मार्टफोनला कंट्रोल करता. पण वास्तव वेगळे असते.

फोनचा अतिवापर करताय? सोशल मीडियापासून निवांतपणा हवा असेल तर त्यासाठी खास 10 टीप्स
Digital detox
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 6:06 PM

मुंबईः कधी तुम्ही असा विचार केला आहे का की, आपला स्मार्टफोन तुम्हाला कंट्रोल करत आहे की त्याला तुम्ही कंट्रोल करत आहात. बाहेरून तुम्हाला वाटेल की, तुम्हीच तुमच्या स्मार्टफोनला कंट्रोल करता. जसे तुम्हाला वाटते, जेव्हा वाटते तसेच तुम्ही स्मार्टफोनला कंट्रोल करता. असं तुम्हाला वाटत असले तरीही त्यामागचे वास्तव हे असते की, स्मार्टफोनने तुम्हाला कंट्रोल केले आहे. एकादे उदाहरणच बघायचे झाले तर तुम्ही (WhatsApp) ग्रुपवर विनाकारण कितीवेळ बोलत बसता. (Instagram) वर बघता बघता कितीतरी वेळ निघून जातो हे तुम्हाला कळत नाही. (twitter) वर काय ट्रेंड होत आहे ही गोष्ट तुमच्या जीवनाशी घट्ट होते याचा तुम्हाला अंदाजच नसतो.

ज्यावेळी तुम्हाला याची जाणीव होते की, स्मार्टफोनने तुम्हाला कंट्रोल केले त्यावेळी तुम्ही त्यापासून दूर जाण्यासाठी उपाय शोधता. याबद्दल तुम्हाला निराशही वाटत नाही कारण त्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात. सोशल मीडियावरील स्क्रीन टाईम कंट्रोल होऊ शकतो, फोकस मोडचा वापरही केला जाऊ शकतो तर त्यापुढे जाऊन तुम्ही नेटवर्कच बंद करू शकता. किंवा अॅप डिलीट करू शकता. पर्याय तर खूप आहेत मात्र कटूसत्य हे आहे की, या सगळ्यांपासून त्या अॅपपासून तुम्ही दूर जाऊ शकता पण तेही फक्त काही क्षणासाठी.

आपल्याला वाटेल की हे आम्ही तुम्हाला का सांगत आहे. कारण आम्ही ते उपाय सांगणार आहोत ज्यामुळे आपण स्मार्टफोनपासून दूरही जाणार नाही आणि त्याच्या वापरावर तुम्ही कंट्रोलही करू शकणार आहात.

whatsApp वरील Read Recipts बंद करा

सध्याच्या जगात संवाद साधण्याचे सगळ्यात महत्वाच साधन व्हाटस्अॅप झाले आहे. मात्र हेच व्हाटस्अॅप कधी कधी समस्या आणि ताणतणावाचे कारण बनत आहे. आपण चर्चा करत आहोत ती Read Recipts ची. आपण कुणाचा मेसेज वाचला असाल किंवा कुणाल मेसेज पाठवला असाल तर दोन्हीमध्ये निळ्या रंगाच्या खुणा तुम्हाला दिसतात. त्यानंतर तुम्हाल समजते की, समोरच्याने तुमचा मेसेज वाचला आहे. तसे हे खूप मोठे फीचर आहे. मात्र ज्यावेळी तुम्हाला असे वाटेल की मेसेज वाचूनही मी प्रतिसाद दिला नाही किंवा तुमचा मेसेज वाचून तुम्हाला कुणी प्रतिसाद दिला नाही तर दोन्ही गोष्टीबाबत तुम्हाला वाईट वाटते, त्यामुळे Read Recipts बंद करा.त्यासाठी व्हाटस्अॅपच्या सेटिंगमधून Account-Privacy मध्ये Read Recipts बंद करण्याचा पर्याय तुम्हाला मिळू शकतो. सतत ऑनलाईन दिसणे किंवा लास्ट सिन चालू ठेवणेही गरजेचे नाही. त्यामुळे तेही तुम्ही बंद करू शकता.

Instagram लाईक्स बंद करा

इन्स्टाग्रामची लोकप्रियता कुणापासून लपून राहिली नाही. इन्स्टाग्रामची लोकप्रियताही त्याच्या त्याच्या जागी शाबूत आहे, तुम्हाला या गोष्टीची काळजी आहे की, इन्स्टाग्रामवर तुम्ही किती लोकप्रिय आहे. इन्साग्रामवर तुम्ही एखादी पोस्ट केली आणि त्याला कमी जास्त लाईक्स मिळाले की ती पोस्ट तुमच्या जीवनमरणाची होऊन जाते. हजारोंनी लाईक्स मिळणे म्हणजे चांगले आणि कमी लाईक्स मिळणे म्हणजे वाईट याचा तणाव येतो.याबाबत अशा अनेक घटना घडल्या आहेत . त्यावर सगळ्यात चांगला उपाय म्हणजे ते फीचर बंद करणे. मग तुम्ही पोस्ट केला काय किंवा नाही केला काय लाईक्सची चिंता तुम्हाला सतावणार नाही. इन्स्टाग्रामच्या तुम्ही कोणत्याही पोस्टवर गेला की तम्हाला तिथे तीन बिंदू दिसतील. त्यातील मेन्यू ओपन करून Hide Like Count बंद करा. तुम्ही स्वतःला शांत ठेऊ इच्छित असाल तर Turn off Commeting ही बंद करा.

facebook News feed वर ताबा ठेवा

सर्वत्र सोशल मीडियाचा बोलबाल असूनही अनेक जण फेसबूकपासून दूर आहेत.त्यामुळे त्यांच्या आयुष्यात कोणताही फरक पडला नाही. फेसबुक म्हणजे एकाद्या नशेसारखे आहे. मन आणि मेंदू सतत त्याचाच विचार करते. त्यामुळे फेसबुक वापरणे बंद करणे अवघड होईल पण डिलीट करू नका. स्मार्टफोनमधून ते अॅप काढून टाका आणि लॅपटॉप किंवा कॉम्प्यूटरवर त्याचा वापर करा. त्यामुळे नक्कीच तुमचा वापर कमी होईल.क्रोमवर असे खूप पर्याय उपलब्ध आहेत ज्यापासून फेसबूकच्या पोस्टपासून लांब राहू शकता.

YouTube च्या सुचनांवर नियंत्रण

यू ट्यूब हे कृत्रिम असले तरी त्याची बुद्धीमत्ता ही खूप सुंदर आहे. तुमच्या आवडीनुसारच ते तुमच्या समोर येत असते. पहिल्यांदा या गोष्टीचे खूप अप्रूप वाटते मात्र ते तुम्हाला कायमस्वरूपीय व्हिडिओ बघण्यासाठी तयार करत असते. तुम्हाला वाटले तर हे अॅप तुम्ही डिलीट करू शकता किंवा ते फक्त कंम्प्यूटरवरच बघू शकता. यामधील ऑटो प्ले नेहमीच बंद ठेवा.

twitter म्यूट करा

भारतात ट्विटर वापरणाऱ्यांची संख्या थोडी कमी आहे. त्याचे वापरकर्ते कमी असले तरी त्याचा परिणाम कमी नाही. दिवसभर काय ट्रेंड चालू आहे याची कुठे ना कुठे चर्चा नेहमीच ऐकू येते. तुम्हाला ट्विटरवर काहीच बघायचे नसेल तर तुम्ही ते Mute करू शकता.

ई-मेल नोटिफिकेशन

तुम्ही कार्यलयीन काम करत असाल तर तुम्हाला खूप सारे ईमेल येत राहतात. त्यासाठी असणारे नोटिफिकेशन तुमच्यासाठी कामाची असतात. हे ई-मेल कामाचे असतात, मात्र कार्यालयीन कामकाज संपले की, नोटिफिकेशनही काही कामाचे नसतात. अर्धारात्री एकाद्या मेलची नोटिफिकेशन तुम्हाला आली तर फक्त तुमची झोप मोड होऊ शकते. त्यापलिकडे काही होऊ शकणार नाही. त्यासाठी आपल्या स्मार्टफोनवर ई-मेल नोटिफिकेशनची वेळ ठरवा. नोटिफिकेशनच्या त्रासापासून लांब राहायचे असेल तर Manual करा.म्हणजे तुम्ही ज्यावेळी अॅप ओपन कराल त्याचवेळी mail डाऊनलोड होतील.

Linkedin बंद करा

कुणाला प्रमोशन मिळाले, तर कुणाची बदली झाली या गोष्टींनी तुम्हाला काही फरक पडत नाही. देशातील एका कोपऱ्यात तुम्ही आणि एका कोपऱ्यात तुम्ही फॉलो करणारी लिंक्डइनवरील व्यक्ती. ती ना तुमच्या फायद्याची असते ना तोट्याची असते. असा व्यक्तींनी अनफॉलो करा.

Messenger वर नको

मॅसेंजर दिसणाऱ्या खुणा तुम्हाला सोशल मीडिया हाताळण्यासाठी अमंत्रण देत असतात. मॅसेंजर अॅपमुळे तुम्ही सतत कुणाला ना कुणाला ऑनलाईन दिसत असता मग दिसणाऱ्या प्रत्येकाला वाटतं की तुम्ही त्यांच्यासोबत बोलत रहा. हे नको असेल तर प्रोफाईलवर जाऊन active status बंद करा.

गंधाने भारलेलं पुस्तक हातात घ्या

छपाईची शाई आणि त्याचा येणारा गंध अशा गंधाने मोहित झालेल्या एकादे तुमच्या आवडीचे पुस्तक हातात घ्या. किंवा तुमच्या शहरातील कोणत्याही पुस्तकाच्या दुकानात तुम्हा जा. पुस्तकांचे मोठे दुकान नसेल तर रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँडवर जा. किंवा ऑनलाइन मागणी करा, जे पुस्तक तुम्हाला वाचायला आवडेल. तुम्हाला आवडणारे लेखक-नेते-अभिनेते यांची पुस्तके घ्या. ज्या भाषेत सोयीस्कर होतील अशी पुस्तके घ्या. किंडल वगैरे पर्याय असेल तर ती गोष्टच वेगळी आहे.

संबंधित बातम्या

Nagar Panchayat Election Result | सत्ता स्थापन करताना काहीही होऊ शकतं, Nilesh Rane यांचा दावा

भाजपनं उत्पल पर्रीकरांना ऑफर केलेल्या 2 जागा कोणत्या? ऑफर नाकारण्यामागची आतली बातमी

बॉलिवूड अभिनेते अरुण वर्मा यांचं निधन, 62 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.