AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Propose Day : प्रपोज करताना कुणी नाकारलं का?; जाणून घ्या यामागची कारणं

आत्मविश्वास असल्यास अशी मुलं जास्त पसंत करतात. सकारात्मक विचार असणाऱ्या मुलांना मुली जास्त पसंत करतात. नकारात्मक विचार करणारी मुलं मुलींना पसंत नसतात.

Happy Propose Day : प्रपोज करताना कुणी नाकारलं का?; जाणून घ्या यामागची कारणं
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Feb 07, 2023 | 6:59 PM
Share

एका गृपमध्ये (Group) एक मुलगी आणि दोन मुलं होती. तिघेही चांगले मित्र (Friends) होते. दोन्ही मुलांना तिच्यावर प्रेम झाले. दोघांनीही एकाचवेळी तिला प्रपोज (Propose ) केले. परंतु, मुलीनं एका मुलाला त्याच्या चांगल्या सवयींमुळं निवडलं. कोणत्या अशा सवयी आहेत ज्यामुळं मुली इम्प्रेस होतात. हा लेख याचं संदर्भातला आहे. कोणत्या अशा सवयी आहेत ज्या मुलींना पसंत असतात. मुलांनी फक्त देखावा करू नये. वर्तमानात जगत असताना भविष्याचा वेध घ्यावा. अति विनम्रता काही कामची नाही. सकारात्मक दृष्टिकोन हवा. अशा सवयी असल्यास मुलींना मुलं पसंत येतात. हे जाणून घेऊया.

देखाव्यापासून दूर राहा

जे मुलं जसे आहेत तसेच राहतात. कोणत्याही प्रकारचा देखावा करत नाहीत. अशा मुलांवर मुली लवकर इम्प्रेस होतात. त्यामुळं तुम्ही तुमच्या पार्टनरला खरं काय ते सांगा. दिखाव्यापासून दूर राहा. दोन वेगवेगळ्या भूमिकांमध्ये राहू नका.

वर्तमानातून घ्या भविष्याचा वेध

जे मुलं वर्तमानात जगत असताना भविष्याचा वेध घेतात, अशा मुलांना मुली पसंत करतात. जे मुलं जुन्या गोष्टी वारंवार उगारत असतात. अशा मुलांपासून मुली दूर राहणं पसंत करतात.

अती विनम्रता नको

काही मुलं गरजेपेक्षा जास्त पार्टनरसमोर लाचार होतात, अशी मुलं मुलींना फारसे पसंत नसतात. अती विनम्रता काही कामाची नसते. जास्त झुकल्यास मुलींना इम्प्रेस करणे कठीण होते.

सकारात्मक दृष्टिकोण हवा

मुलांमध्ये आत्मविश्वास असल्यास अशी मुलं जास्त पसंत करतात. सकारात्मक विचार असणाऱ्या मुलांना मुली जास्त पसंत करतात. नकारात्मक विचार करणारी मुलं मुलींना पसंत नसतात. त्यामुळं तुमचे विचार नेहमी सकारात्मक असले पाहिजे. नकारात्मक विचार असल्यास मुली मुलांना पसंत करत नाही.

अशा सवयी हव्यात

कोणत्याही मुलीला प्रपोज करताना विचार करून करावा. आपला स्वभाव चांगल्या प्रकारचा हवा. त्यावर बरेच काही अवलंबून आहे. सारख्या विचारांच्या लोकांची पार्टनरशीप लवकर होते. त्यामुळं समोरच्याचा विचार करून मैत्री करावी. त्यानंतर पुढचं सारं सोप जातं.

Follow Us