Gestational Diabetes | गर्भावस्थेदरम्यान मधुमेहाची समस्या? मग ‘या’ डाएट टिप्स नक्की फॉलो करा!

‘जेस्टेशनल डायबिटीस’ दरम्यान, बर्‍याच वेळा आईच्या रक्तामध्ये वाढलेला ग्लूकोज प्लेसेंटामधून बाळाच्या रक्तात जातो, ज्यामुळे बाळाच्या रक्तातील साखर देखील वाढते.

Gestational Diabetes | गर्भावस्थेदरम्यान मधुमेहाची समस्या? मग ‘या’ डाएट टिप्स नक्की फॉलो करा!
गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या या मधुमेहाला 'जेस्टेशनल डायबिटीस' असे म्हणतात.
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 7:01 PM

मुंबई : गर्भधारणेदरम्यान शरीरात होणार्‍या सर्व बदलांच्या दरम्यान स्त्रियांना बर्‍याच समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत काही स्त्रिया गर्भधारणेदरम्यान मधुमेहाच्या शिकार ठरतात. गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या या मधुमेहाला ‘जेस्टेशनल डायबिटीस’ असे म्हणतात. यामध्ये, स्त्रियांच्या रक्तातील साखरेची पातळी लक्षणीय वाढते. तथापि, ही समस्या तात्पुरत्या स्वरुपाची असते आणि बाळाच्या जन्मानंतर त्याचे निराकरण होते. परंतु, यामुळे प्रसूतीमध्ये बर्‍याच अडचणी येऊ शकतात (Diet meal plan for Gestational Diabetes women).

खरं तर, ‘जेस्टेशनल डायबिटीस’ दरम्यान, बर्‍याच वेळा आईच्या रक्तामध्ये वाढलेला ग्लूकोज प्लेसेंटामधून बाळाच्या रक्तात जातो, ज्यामुळे बाळाच्या रक्तातील साखर देखील वाढते आणि त्याच्या मज्जासंस्थेमध्ये बिघाड होतो. यासह स्पाइना बिफिडिया, गाऊट, मूत्राशय किंवा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीत रोगाचा धोका वाढतो. म्हणूनच, या समस्येचा योग्य प्रकारे उपचार केला गेला पाहिजे. याशिवाय डॉक्टरांच्या सूचनांचे अनुसरण केले पाहिजे. याचबरोबर आपल्या आहाराची देखील विशेष काळजी घ्यावी, जेणेकरून प्रसूतीच्या वेळी स्त्रीला कोणतीही अडचण येऊ नये, आणि त्यामुळे बाळाला काही त्रास होऊ नये.

असा असावा आहार

– मधुमेहाच्या दरम्यान व्हिटामिन सी समृध्द फळे खावीत. अशा परिस्थितीत आवळा, लिंबू, संत्रे, मोसंबी, टोमॅटो इत्यादी खाणे खूप फायदेशीर आहे. याशिवाय बेरी, खरबूज, कलिंगड, नाशपाती, सिंघाडा, पेरू, किवी आणि स्ट्रॉबेरी खाणे देखील फायदेशीर आहे.

– मोड आलेले मूग व हरभरा यांचा आहारात समावेश करा. याशिवाय चणे, दुधी, दोडका, सलगम, पालक, बाथुआ, गाजर, सोया, मेथी इत्यादी भाज्या खा. यामुळे हिमोग्लोबिन देखील वाढेल.

– उपाशी राहू नका, थोड्या-थोड्या वेळात काहीतरी खाणे चालू ठेवा. फळ आणि सलाड या व्यतिरिक्त आपण ओट्स, दलिया, ब्राऊन ब्रेड, उपमा इत्यादी पदार्थ देखील खाऊ शकता. जे पचायला हलके आणि पौष्टिक देखील आहेत. घरी बनवलेले सूप प्या (Diet meal plan for Gestational Diabetes women).

हे खाऊ नका!

– आंबा, केळी, चिकू, बटाटा, जिमीकंद आणि रताळे यासारख्या गोष्टी खाणे टाळा. वैद्यकीय सल्ल्याशिवाय त्यांचे अजिबात सेवन करू नका.

– चटणी, लोणचे, तयार पदार्थ आणि बाटली बंद ज्यूस टाळा. याशिवाय केक, पेस्ट्री, आईस्क्रीम किंवा कोल्ड ड्रिंकसुद्धा घेऊ नका.

या गोष्टींचीही काळजी घ्या!

– वेळोवेळी लघवीमधील केटोन अॅसिडची तपासणी करा.

– रक्तातील साखरेची पातळी सतत तपासून घ्या.

– वजन नियंत्रित करा आणि आहाराची काळजी घ्या. शक्य असल्यास, डॉक्टरांकडून आहार योजना बनवून घ्या.

– कोल्ड ड्रिंक्स, पेस्ट्री आणि मिठाईसारख्या गोड पदार्थांपासून दूर रहा.

– तज्ज्ञांच्या सल्ल्याने व्यायाम करा अथवा चाला.

– आपल्या आहारात कृत्रिम साखर सामील करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Diet meal plan for Gestational Diabetes women)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.