Dieting side Effects | वजन कमी करण्यासाठी ‘डाएटिंग’ करताय? सावधान! आधी हे दुष्परिणाम वाचाच…

| Updated on: Jan 27, 2021 | 2:36 PM

वजन कमी करण्यासाठी डाएटिंग करणे, किंवा तासान् तास उपाशी राहणे हा चांगला पर्याय नाही.

Dieting side Effects | वजन कमी करण्यासाठी ‘डाएटिंग’ करताय? सावधान! आधी हे दुष्परिणाम वाचाच...
वाढलेले वजन
Follow us on

मुंबई : वजन कमी करण्यासाठी डाएटिंग करणे, किंवा तासान् तास उपाशी राहणे हा चांगला पर्याय नाही. तर, आपल्या शरीराला लागणारे कॅलरीचे सेवन मर्यादित करण्याचा हा सर्वात वाईट मार्ग आहे. तज्ज्ञांचा असा दावा आहे की, यामुळे केवळ शरीराला पोषक घटक मिळणे अवघड होते. तसेच यामुळे बरेच दुष्परिणाम देखील होऊ शकतात. मग, हा किटो डाएट असो वा उपवास किंवा शरीरावरील चरबी कमी करण्यासाठीचा एखादा विशेष आहार, या सगळ्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो (Dieting side effects on human body).

चयापचयवर परिणाम

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार, जे लोक डाएटिंग करत आहेत, त्यांनी त्यांच्या चयापचय प्रणालीचे तीव्र नुकसान करून घेतले आहे. ते यातून कधीच पूर्णपणे बरे होऊ शकत नाहीत. हे सर्व शरीराच्या लेप्टिन संप्रेरकामुळे होते, जे मानवी भूकेशी संबंधित आहे. यावेळी तज्ज्ञांनी शरीरातील घ्रेलीनची पातळी देखील तपासली. हा एक असा हार्मोन आहे, जो आपल्याला भुकेबद्दल माहिती देतो. डाएटिंग केल्याने शरीरात या हार्मोनची पातळी वाढते.

कमकुवत स्नायू

डाएटिंग केल्याने आपल्या स्नायूंवरही खूप वाईट परिणाम होतो. द अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, कील विद्यापीठातील संशोधकांनी 32 निरोगी स्वयंसेवकांची निवड केली आणि तीन आठवड्यांसाठी त्यांचा आहार सरासरी 1300 कॅलरीने कमी केला. यावेळी तज्ज्ञांच्या लक्षात आले की, त्यांचे स्नायू कमकुवत होऊन वजन वाढू लागले आहे (Dieting side effects on human body).

मुतखड्याची समस्या

वजन कमी करण्यासाठी डाएटिंग केल्यामुळे शरीरात पौष्टिक घटकांचा अभावा निर्माण होतो. याचा शरीराच्या सर्व भागांवरही परिणाम होतो. हेल्थ अँड वेलनेस कोच व्हॅन बास्कर्क म्हणतात की, काही खाद्यपदार्थांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. जेव्हा आपण अशा गोष्टींना आहारातून वगळतो, तेव्हा शरीर निर्जलीकरण होण्याचा धोका वाढू शकतो. डिहायड्रेशननंतर एखाद्या व्यक्तीस मूत्रपिंडातील दगड म्हणजे किडनी स्टोनची समस्या उद्भवू शकते.

कमकुवत हाडे

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, वृद्धावस्थेतील लोक नियमितपणे उपवास करत असतील तर त्यांचे वजन त्वरित कमी होऊ शकते. मात्र, आपले वजन आधीपासूनच कमी असल्यास ही समस्या आणखी वाढू शकते. ब्रिघममधील वेलनेस विभागाचे प्रादेशिक संचालक कॅथी मॅकनस म्हणतात की, डाएटिंग करणे तुमच्या रोगप्रतिकारक शक्ती आणि हाडे दोन्हीसाठी धोकादायक ठरू शकते.

केस गळती

‘डर्मटालॉजी प्रॅक्टिल अँड कॉन्सेप्चुअल’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार कमी कॅलरीयुक्त आहार देखील आपल्या केस गळतीच्या समस्येशी संबंधित आहे. शरीरात योग्य पोषण नसल्यामुळे ही समस्या निर्माण होते. पौष्टिकतेचा अभाव केसांची रचना आणि केसांच्या वाढीवर परिणाम करतो.

(टीप : सदर माहिती ही संशोधनावर आधारित असून, कुठल्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Dieting side effects on human body)

हेही वाचा :