AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाशिवरात्रीनिमित्त उपास करताना चुकूनही ‘या’केळ्याचे सेवन करू नका, फायद्या ऐवजी होईल नुकसान

महाशिवरात्रीनिमित्त अनेक भाविक भक्त उपवास करतात. अशावेळी अनेकजण उपवासाच्या दिवशी फळांचा आहार घेत असतात. पण तुम्ही सुद्धा उपवासाच्या दिवशी फळांचा आहार घेताना जर केळीचे सेवन करत असाल तर जरा थांबा ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण उपवासाच्या दिवशी केळीचे सेवन केल्यास फायद्याऐवजी तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे.

महाशिवरात्रीनिमित्त उपास करताना चुकूनही 'या'केळ्याचे सेवन करू नका, फायद्या ऐवजी होईल नुकसान
| Edited By: | Updated on: Feb 25, 2025 | 2:51 PM
Share

महाशिवरात्र हा सण मोठ्या उत्साहात संपूर्ण देशभरात साजरा केला जाणार आहे. महाशिवरात्री निमित्त अनेक लोकं उपवास करतात. तसेच उपवासाचे आहार घेत असतात. तर काही जण फक्त फळांचा आहार घेतात. अशात अनेकांना सवय असते ती म्हणजे उपवासाच्या दिवशी केळीचे सेवन करणे. केळी हे ऊर्जेचा चांगला स्रोत आहे. पण तुम्हाला माहित आहे का की तुम्ही खात असलेली केळी तुम्हाला आजारी पाडू शकतात आणि तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. त्यामुळे केळीचे सेवन केल्यास फायदा होण्याऐवजी शरीराचे नुकसान होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊयात…

तज्ज्ञांच्या मते, बाजारात मिळणाऱ्या केळ्यांमध्ये कार्बेट घालून पिकवलेली केळी अनेक गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकतात. फळविक्रेते केळी लवकर पिकवण्यासाठी कार्बेट घटक वापरतात. पण ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. यावेळी तज्ज्ञांनी सांगितले की कार्बोहायड्रेट्स असलेल्या केळीचे सेवन केल्याने पचनसंस्था, मज्जासंस्था आणि हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. याशिवाय यामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका देखील वाढू शकतो.

या सर्व आजारांना आमंत्रण…

तज्ज्ञांनी यावेळी सांगितले की कार्बेट केळीमध्ये इथिलीन, आर्सेनिक आणि फॉस्फरससारखे विषारी घटक असतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा केळीचे सेवन करतात, तेव्हा विषारी घटक शरीरात गेल्यानंतर धोकादायक प्रक्रिया निर्माण होतात. यामुळे तुम्हाला पोटदुखी, अतिसार, मळमळ, उलट्या, डोकेदुखी, आणि श्वास घेण्यास त्रास होण्याची समस्या उद्भवू शकतात. तसेच तज्ज्ञांनी सांगितले की जास्त काळ त्यांचे सेवन केल्याने किडनी आणि लिव्हरवर वाईट परिणाम होऊ शकतो.

याशिवाय, ते मज्जासंस्था देखील कमकुवत करू शकते, ज्यामुळे स्मरणशक्ती कमी होणे आणि मानसिक अस्थिरता यासारख्या समस्या उद्भवू शकतात. तसेच या केळींचे सेवन गर्भवती महिला आणि लहान मुलांसाठी अत्यंत हानिकारक असू शकते, कारण ही रसायने त्यांच्या शरीरावर लवकर परिणाम करतात.

केळी खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

उपवासाच्या दिवशी तुम्ही फक्त नैसर्गिकरित्या पिकलेली केळी खरेदी करण्याचा प्रयत्न करावा. तसेच तज्ज्ञांनी सांगितले की चमकदार आणि एकसमान पिवळ्या रंगाची केळी सहसा रासायनिक पद्धतीने पिकवली जातात, तर नैसर्गिकरित्या पिकवलेल्या केळीवर काही ठिकाणी हलके हिरवे किंवा तपकिरी डाग असू शकतात. केळी खाल्ल्यानंतर जर एखाद्याला घसा खवखवणे, पोटदुखी किंवा उलट्या होणे यासारख्या समस्या येत असतील तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. अशा परिस्थितीत जर तुम्हीही या महाशिवरात्रीला उपवास करणार असाल आणि फळ आहार म्हणून केळीचे सेवन करणार असाल तर तुम्ही या सर्व गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. असे होऊ शकते की केळी तुम्हाला फायदा होण्याऐवजी नुकसान पोहोचवू शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त.