AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

​Roti with Ghee Benefits | तूप-रोटी खा अन् भरपूर फायदे मिळवा, वेट लॉससाठीही ठरते फायदेशीर !

पोळीवर तूप लावून खाण्याचे जबरदस्त फायदे मिळतात. आरोग्यतज्ज्ञही तूप खाण्याचा सल्ला देतात. रोज एक चमचा खाल्ल्याने वजन कमी करण्यासही फायदा होऊ शकतो.

​Roti with Ghee Benefits |  तूप-रोटी खा अन् भरपूर फायदे मिळवा, वेट लॉससाठीही ठरते फायदेशीर !
Image Credit source: freepik
| Updated on: Jul 14, 2023 | 3:38 PM
Share

​Roti with Ghee Benefits : आपल्या घरात अनेक वर्षांपासून तुपाशिवाय (Roti) पोळी किंवा भात खाल्ला जात नाही. तव्यावरून पानात वाढलेली गरमागरम पोळी आणि तूप खाण्याचा आनंद काही औरच असतो. तुपाच्या नुसत्या वासानेही भूक चालवली जाते, आणि अन्नाची चवही वाढते. पण आजकाल घरांमध्ये तुपाचा वापर कमी केला जातो. पराठ्यांवरसुद्धा तुपाऐवजी ऑलिव्ह ऑईल लावले जाते. पण हेल्थ आणि फिटनेससाठी ते घातक असते.

पोळीवर तूप लावून खाल्ल्याने एनर्जी आणि जबरदस्त ताकद मिळते. तूप-पोळी खाण्याचे सर्व फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?

आहारतज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, तूप एका ठराविक प्रमाणात खाल्ले तर फायदेशीर ठरते. वजन कमी करणारे अनेक लोक त्यांच्या आहारातून तूप काढून टाकतात, पण ते योग्य नाही. उलट वजन घटवण्यासाठी तूपाची खूप मदत होते, असे म्हटले जाते. तूप हे पोळीचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी करण्याचे काम करते. GI इंडेक्स हे कार्बोहायड्रेट-समृद्ध अन्नाचे रेटिंग असते, जे आपण खात असलेल्या अन्नाचा ग्लुकोजच्या पातळीवर किती लवकर परिणाम होतो हे दर्शवते.

वजन कमी करण्यात किती फायदेशीर ?

तूप खाल्ल्याने पोट भरलेलं राहतं. तूपामध्ये फॅट सॉल्यूबल व्हिटॅमिन्सही असतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात. तसेच हार्मोन्स संतुलित ठेवून हेल्दी कॉलेस्ट्रॉल कायम राखतात. तूप जास्त आचेवर गरम केल्यास पेशींच्या कार्याला हानी पोहोचवणाऱ्या कणांची निर्मितीही थांबते.

किती तूप खावे ?

पण पोळीवर जास्त तूप लावणे योग्य नाही. ते थोड्याच प्रमाणात घेऊन नीट पसरवावे. आहारतज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात खाल्ल्यास त्यामुळे नुकसानच होऊ शकते.

काही रिपोर्ट्सनुसार, मलायका अरोरा आणि कतरिना कैफ या अभिनेत्रींसह अनेक बी-टाउन सेलिब्रिटी त्यांच्या दिवसाची सुरुवात तुपाने करतात. सकाळी उठल्यावर ते रिकाम्या पोटी एक चमचा तूप खातात. यामुळे बद्धकोष्ठता दूर राहते आणि वजन कमी होण्यासही मदत होते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.