चिकन आणि अंडी खाल्ल्याने बर्ड फ्लू होतो का? पाहा काय आहे तज्ज्ञांचं मत

देशभरात अनेक ठिकाणी बर्ड फ्लू झाल्यामुळे कावळे, कोंबड्या आणि अनेक पक्षी मरून पडल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

  • दत्ता कानवटे, टीव्ही 9 मराठी, औरंगाबाद
  • Published On - 18:00 PM, 11 Jan 2021

परभणी : कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गानंतर आता कुठे सगळं सावरत असताना आता बर्ड फ्लूमुळे लोकांची चिंता पुन्हा वाढली आहे. देशभरात अनेक ठिकाणी बर्ड फ्लू झाल्यामुळे कावळे, कोंबड्या आणि अनेक पक्षी मरून पडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशात आता चिकन किंवा अंडी खाल्यामुळे माणसांमध्येही हा रोग पसरले अशा बातम्या समोर येत आहेत. पण यासंबंधी एक महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे. (Does eating chicken and eggs cause bird flu See what the experts think)

चिकन किंवा अंडी खाल्ल्यामुळे बर्ड फ्लू हा माणसांना अजिबातच होत नाही. भारतात बर्ड फ्लू माणसांना झाल्याची आजपर्यंत एकही घटना घडलेली नाही. असं स्पष्टीकरण परभणीच्या पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता नितीन मार्कंडेय यांनी दिली आहे. टीव्ही 9 मराठीला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे चिकन किंवा अंडी खाल्याने बर्ड फ्लू माणसांना होत नाही हे उघड झालं आहे.

खरंतर, कोणताही आहार घेताना तो स्वच्छ धुतला गेला पाहिजे. त्याला उकळून खाल्ल पाहिजे. त्यामुळे तुम्हीही जर चिकन आणि अंडी खात असाल ती पूर्ण उकळून खाल्ली पाहिजेत. ज्याभागामध्ये मोठ्या प्रमाणात घटना समोर आल्या असतील तिथे फक्त अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचंही नितीन मार्कंडेय यांनी सांगितलं.

नितीन मार्कंडेय यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 20 वर्षांचा इतिहास पाहिला तर पक्षांमधील रोग हा माणसाला झाल्याच्या घटना नाहीत. पण हा रोग पक्षांमधून प्राण्यांमध्ये आणि त्यानंतर माणसांमध्ये पसरण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे रोगाच्या घटना फार कमी प्रमाणात आहे. अवघ्या 1 हजार लोकांना हा रोग आतापर्यंत झाला असावा. पण भारतामध्ये याचं एकही प्रकरण नाही

कोरोनाच्या बाबतीत जशी आपण काळजी घेतो. त्याच पद्धतीने स्वच्छता आणि निर्जंतूकीकरण करणं महत्त्वाचं आहे. मांस किंवा अंडी खाताना स्वच्छ धुणे, उकळून खाणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शास्त्र आणि विज्ञान आपल्या सोबत असताना आपण काळजी करण्याची गरज नाही असंही यावेळी नितीन मार्कंडेय यांनी सांगितलं.

मांस हे नेहमी आपण उकळून भाजून गरम करून आणि त्यावर प्रक्रिया करून खातो. त्यामुळे अशा तापमानात कोणताही धोका होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. म्हणजे काय तर काळजी घेतल्याने रोगाचा धोका कमी आहे. (Does eating chicken and eggs cause bird flu See what the experts think)

संबंधित बातम्या – 

ठाण्यात बर्ड फ्लूचा शिरकाव, 3 पाणबगळे आणि 1 पोपट बर्ड फ्लू पॉझिटिव्ह, प्रशासन सतर्क

मुंबईतील ‘मुच्छड़ पानवाला’ला ड्रग्ज प्रकरणी NCB चे समन्स

(Does eating chicken and eggs cause bird flu See what the experts think)