AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुदिना, लिंबू घालून ग्रीन टी प्या; झटपट वेगाने वजन कमी करा!

वाढलेले वजन कमी करण्यासाठी जवळपास सर्वचजन प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, व्यायाम आणि हेल्दी आहार घेऊन सुध्दा म्हणावे तसे वजन कमी होत नाही.

पुदिना, लिंबू घालून ग्रीन टी प्या; झटपट वेगाने वजन कमी करा!
तीळाचे खास पेय
| Edited By: | Updated on: Jun 11, 2021 | 7:24 AM
Share

मुंबई : वाढलेले वजन कमी करण्यासाठी जवळपास सर्वजन प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, व्यायाम आणि हेल्दी आहार घेऊन सुध्दा म्हणावे तसे वजन कमी होत नाही. यामुळे वजन नेमके कसे कमी करावे असा अनेकांसमोर प्रश्न आहे. आज आम्ही तुम्हाला एक खास पेय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे वजन झटपट कमी होण्यास मदत होते. पुदिना आणि लिंबूसह ग्रीन टी पिणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. (Drink green tea with mint and lemon and lose weight)

वजन वाढल्यानंतर आपल्याला अनेकांकडून ग्रीन टी पिण्याचा सल्ला दिला जातो. विशेष म्हणजे ग्रीन टी हे पाण्यानंतर जगभरातील सर्वात प्रसिद्ध पेय पदार्थ बनलं आहे. ग्रीन टीमध्ये न्यूट्रिशन आणि अँटीऑक्सिडेंट घटक असतात. ज्यामुळे शरीरातील वाढलेले वजन आटोक्यात येते आणि लठ्ठपणा कमी होतो. तसेच ग्रीन टी ही तुमच्या त्वचेसाठीही उत्तम मानली जाते. पुदीन्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. ही पाने आपल्या अन्नाचे पचन करण्यासाठी प्रभावी आहे. यासह, हे पोटात होणार्‍या बर्‍याच समस्यांवर उपचार करण्यासाठी देखील उपयुक्त ठरते.

आपण जर ग्रीन टीमध्ये लिंबाचा रस आणि पुदिनाची पाने मिक्स करून पिले तर आपले वजन कमी होण्यास मदत होते. लिंबाचा रस ग्रीन टीच्या कडू चवीचा प्रतिकार करतो. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, लिंबूवर्गीय फळामचा रस ग्रीन-टीमध्ये मिसळल्यास त्यातील अँटीऑक्सिडेंट्स वाढतात, जे आपल्या शरीरासाठी अधिक फायदेशीर आहेत. परंतु, आपल्या ग्रीन-टीला आधी थंड होऊ द्या आणि नंतरच त्यात थोडे लिंबू पिळून मग त्याचे सेवन करा. ग्रीन टी तयार करण्यासाठी पाण्याला खूप जास्त गरम करु नका. त्यामुळे त्यात आवश्यक जीवनसत्त्व नष्ट होतात.

चांगल्या परिणामांसाठी तुम्ही पाणी गरम करुन 10 मिनीटे तसेच ठेवा. त्यानंतर ग्रीन टीचे पॅकेट कपात घेऊन त्यावर गरम पाणी टाका आणि 1 मिनीटे तसेच ठेवा. ग्रीन टी आणि पाणी एकत्रित झाल्यानंतर प्या. तुम्हाला असे वाटत असेल की, जेवणानंतर ग्रीन टी पिण्यामुळे तुमची लठ्ठपणा कमी होईल, तर तुम्ही चुकीचे आहात. जेवणा बरोबर किंवा नंतर लगेचच ग्रीन टीचे सेवन केल्याने जेवणात उपस्थित पोषकद्रव्ये शोषण्यात अडथळा येऊ शकतो. ज्यामुळे शरीरात पोषक तत्वांचा अभाव भासू शकतो. ग्रीन टी सेवन केल्यानंतर किमान 1 तासानंतरच काहीतरी खायला हवे, हे लक्षात ठेवा.

संबंधित बातम्या : 

पोटाचा घेर कमी करण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा

दररोज नारळ पाणी प्या, व्यायाम न करता 10 किलो वजन घटणार, पाहा कसं?

(Drink green tea with mint and lemon and lose weight)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.