उन्हाळ्यात ताक प्यायल्याने पचनास‍ह शरीरातील ‘या’ समस्याही होतात कमी, जाणून घ्या त्याचे फायदे

उन्हाळ्याच्या या दिवसांमध्ये तुमच्या आहारात घरगूती पद्धतीने तयार केलेलं ताकाचा समावेश करा. कारण ताकाच्या सेवनाने पचनाच्या समस्या व शरीरातील इतर समस्यांपासून सुटका मिळते. चला तर मग आजच्या लेखात आपण उन्हाळ्यात ताक का प्यावे आणि त्याचे फायदे याबद्दज जाणून घेऊयात.

उन्हाळ्यात ताक प्यायल्याने पचनास‍ह शरीरातील या समस्याही होतात कमी, जाणून घ्या त्याचे फायदे
buttermilk
| Edited By: | Updated on: Mar 29, 2026 | 3:58 PM

उन्हाळ्याच्या दिवसात कडक ऊन, उष्णतेच्या लाटा आणि दमटपणा यांचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर देशाच्या अनेक भागांमध्ये तापमान सातत्याने वाढत आहे. आजकाल तहान लागल्यामुळे बहुतेक लोकं शीतपेये किंवा पॅकेज केलेल्या ज्यूस पिण्याकडे वळतात, जे की आपल्या शरीराला फायद्याऐवजी हानिकारक ठरू शकतात. मात्र आयुर्वेदानुसार ताक हे उन्हाळ्यासाठी सर्वोत्तम नैसर्गिक आणि थंड पेय आहे, जे थंडावा आणि असंख्य आरोग्यदायी फायदे देतात.

शीतपेये आणि पॅकबंद ज्यूस मध्ये अतिरिक्त साखर आणि केमिकल घटक असतात जे आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. परंतु हे पेय पिण्याऐवजी ताक हा एक उत्तम नैसर्गिक आणि पौष्टिक पर्याय आहे. उन्हाळ्यात दररोज ताक प्यायल्याने शरीर निरोगी आणि उत्साही राहते. ते केवळ तहानच भागवत नाही, तर पोटाला थंडावा देखील देते. चला तर मग आजच्या लेखात ताक प्यायल्याने शरीराला कोणते फायदे होतात आणि ताक बनवण्याची सोपी पद्धत देखील जाणून घेऊयात.

ताक पिण्याचे फायदे-

1. शरीर थंड करते-

ताक हे दह्यापासून बनवलेले एक हलके, थंड आणि चविष्ट पेय आहे. ताक हे त्यातील पाण्याच्या उच्च प्रमाणामुळे शरीराला त्वरित थंडावा देते आणि आर्द्रता टिकवून ठेवते.

2. डिहायड्रेशन-

उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी ताक अत्यंत उपयुक्त आहे.

3. पचन

ताक पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे. त्यात असलेले प्रोबायोटिक्स चांगल्या जीवाणूंच्या वाढीस प्रोत्साहन देतात, ज्यामुळे पोट स्वच्छ राहण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठता, गॅस व अपचन यांसारख्या समस्या कमी होतात. आयुर्वेदात ताकाला पचनक्रिया सुधारणारे आणि शरीराला थंडावा देणारे पेय मानले जाते.

4. त्वचा-

ताक पोटातील उष्णता कमी करते, त्यामुळे मुरुमे किंवा डागांची समस्या दूर होते.

5. हाडे-

ताक हे कॅल्शियम आणि प्रथिनांचा चांगला स्रोत आहे, ज्यामुळे ताक प्यायल्याने हाडे मजबूत होतात.

6. शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स भरून काढते-

उन्हाळ्यात घाम आल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात. तुम्ही जर नियमित ताक प्यायलात तर ताकातील पोटॅशियम, सोडियम आणि इतर खनिजे ही कमतरता भरून काढण्यास मदत करतात.

7. वजन नियंत्रित राहते-

ताकामध्ये कॅलरीज कमी असल्यामुळे ते वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत करते.

ताक कसे बनवायचे?

ताक बनवण्याची पद्धतही खूप सोपी आहे. दही चांगले फेटून त्यात पाणी, सैंधव मीठ, जिरेपूड, काळी मिरी आणि पुदिना टाकून हे सर्व मिश्रण चांगले मिक्स करा. अशा प्रकारे ताक बनवायला खूप सोपा आहे. काही लोक त्यात लिंबाचा रस किंवा मसालेही टाकतात. नाश्त्यासोबत किंवा दुपारी तहान लागल्यावर ताक पिणे खूप फायदेशीर ठरते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us