AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खडी साखरयुक्त कोमट दूध पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !

रिफाईंड साखरेपेक्षा कमी गोड असलेली खडी साखर आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असते.

खडी साखरयुक्त कोमट दूध पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !
दूध
| Updated on: May 20, 2021 | 11:39 AM
Share

मुंबई : दूध स्वतःच एक संपूर्ण अन्न मानले जाते. प्रथिने, चरबी, कॅलरीज, कॅल्शियम, व्हिटामिन डी, बी-2, बी-12, पोटॅशियम, फॉस्फरस आणि सेलेनियम यासारख्या पोषक घटकांमुळे दुधाची गुणवत्ता वाढते. रिफाईंड साखरेपेक्षा कमी गोड असलेली खडी साखर आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असते. आयुर्वेद शास्त्रातील अनेक औषधांमध्ये खडीसाखरेचा वापर केला जातो.  (Drinking rock sugar and milk is beneficial for health)

सर्दी, जुनाट खोकला, घशातली खवखव, कफविकार, तोंडातील रोगजंतू, मानसिक ताण, तोंडाची दुर्गंधी, मूळव्याधी अशा एक ना अनेक व्याधींवर खडीसाखर उपयुक्त असते. दररोज रात्री कोमट दुधात खडी साखर मिक्स करून पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दुधात प्रथिने, चरबी, कॅलरीज, कॅल्शियम, व्हिटामिन डी, बी-2, बी-12 आणि पोटॅशियम असते. तर खडी साखरमध्ये सर्दी, जुनाट खोकला, घशातली खवखव, कफविकार, तोंडातील रोगजंतूसाठी खडी साखर फायदेशीर आहे.

यामुळे दररोज रात्री कोमट दुधात खडी साखर मिक्स करून प्या. प्रत्येक कप गरम दुधात सुमारे 12 ग्रॅम नैसर्गिक साखर असते, जी आपले स्नायू आणि मेंदू मजबूत करते. त्यात 8 ग्रॅम पूर्ण प्रथिने देखील आहेत, ज्यात सर्व अमीनो आम्ल असतात. हे आपल्या स्नायूंना सामर्थ्य आणि मजबुती देतात. जर तुम्हाला अशक्तपणा आला असेल तर दूधामधून खडीसाखर घेतल्याचा नक्कीच चांगला फायदा होईल. अशक्त लोकांनी नेहमी त्यांच्याजवळ खडीसाखर ठेवावी. ज्यामुळे जेव्हा अचानक थकवा जाणवेल तेव्हा खडीसाखर तोंडात ठेवावी.

अशी बनते ‘खडी साखर’

खडीसाखर बनवण्याची पद्धत सोपी आहे. साखरेचा सुपर सॅच्युरेटेड पाक बनवून त्यात दोरा घालून गार होण्यासाठी ठेवून द्यावे. जसजसे मिश्रण गार होऊ लागते, दोऱ्याभोवती साखरेचे मोठे दगडासारखे (आकारहीन) स्फटिक तयार होऊ लागतात. ह्यालाच आपण दोऱ्याची खडीसाखर म्हणून ओळखतो. काही वेळा खडीसाखर बनवताना पाकात दूधही घातले जाते. धार्मिक विधींसाठी खडीसाखर बनवताना पाक बनवण्यासाठी नारळाचे पाणी वापरले जाते, असेही एका ठिकाणी नमूद करण्यात आले होते. हल्ली दोऱ्याचा वापर न करता बनवलेली विशिष्ट आकाराची खडीसाखरदेखील मिळते.

(टीप : वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारित असून, डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Drinking rock sugar and milk is beneficial for health)

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.