‘या’ पाच सवयी तुमच्या डोळ्यांना कमकुवत करतील, आजपासूनच सुधारा

आजकाल लहान वयातच डोळ्‌यांची दृष्टी कमकुवत होते आणि डोळ्यांशी संबंधित समस्या निर्माण होणे हे अगदी सामान्य झाले आहे. यामागे काही दैनंदिन सवयी आहेत ज्या डोळ्यांना नुकसान पोहोचवतात. या सवयी वेळेतच बदलल्या नाही तर डोळ्यांना कमकुवत बनवतील.

या पाच सवयी तुमच्या डोळ्यांना कमकुवत करतील, आजपासूनच सुधारा
Easy eye health tips better vision improve eyesight
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 13, 2025 | 12:33 PM

डोळे हे आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचे, नाजूक आणि संवेदनशील अवयवांपैकी एक आहे. म्हणून त्यांच्या काळजीकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. आजच्या वाईट जीवनशैलीमुळे लहान वयातच आपण पाहतोच की दृष्टी कमकुवत होऊ लागते. कोरडेपणा, थकवा, चिडचिड, लालसरपणा, डोळे पाणावणे यासारख्या समस्यांकडेही दुर्लक्ष केल्याने डोळ्यांच्या समस्या निर्माण होतात. पण तुम्ही जर या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली नाही, समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने दृष्टी कमकुवत होतेच, पण त्यामुळे काचबिंदू, मोतीबिंदू,रातआंधलेपणा यासारख्या डोळ्यांशी संबंधित अनेक गंभीर समस्या देखील उद्भवू शकतात. काही सोप्या टिप्सचा अवलंब करून तुम्ही तुमची दृष्टी योग्य ठेवू शकता आणि तुमचे डोळे अनेक समस्यांपासून वाचवू शकता.

डोळे निरोगी ठेवण्यासाठी, काही दिवसांनी डोळ्यांची तपासणी करणे महत्वाचे आहे. तुम्ही तुमच्या नियमित आरोग्य तपासणीमध्ये हे समाविष्ट करू शकता. यामुळे डोळ्यांची कोणतीही समस्या आधीच ओळखण्यास मदत होते आणि तुम्ही गंभीर आजार टाळू शकता. सध्या तरी, कोणत्या सवयी तुमच्या डोळ्यांना नुकसान पोहोचवू शकतात आणि त्या कशा सुधारायच्या ते जाणून घेऊया.

स्क्रीन टाइम सवयी सुधाराणे

आजकाल प्रत्येक मुलेही तासंतास मोबाईल फोन वापरत असतात, ज्यामुळे संपूर्ण शरीराचे नुकसान होते आणि त्याचा डोळ्यांवर खूप वाईट परिणाम होतो. तुम्ही तुमचा स्क्रीन टाइम कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि जर तुमच्या कामामुळे तुम्हाला लॅपटॉपवर तासनतास बसावे लागत असेल, तर दर वीस मिनिटांनी वीस सेकंदांचा ब्रेक घ्या आणि तुमच्यापासून काही अंतरावर असलेल्या एखाद्या गोष्टीकडे काळजीपूर्वक पहा आणि डोळे मिचकावा. तसेच डोळ्यांना आराम मिळावा यासाठी तुमचे तळवे डोळ्यांवर ठेवा.

चष्मा न घालता बाहेर जाणे

सूर्याचे अल्ट्राव्हायोलेट किरण केवळ त्वचेलाच नव्हे तर डोळ्यांनाही नुकसान पोहोचवतात. बहुतेक लोक चष्म्याशिवाय कडक सूर्यप्रकाशात बाहेर पडतात, ज्यामुळे तुमच्या डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. जेव्हाही तुम्ही बाहेर जाता तेव्हा सनग्लासेस घाला किंवा छत्री सोबत ठेवा जेणेकरून तुमचे डोळे थेट सूर्याच्या संपर्कात येणार नाही.

शरीराला योग्यरित्या हायड्रेट न ठेवणे

शरीराला हायड्रेट न ठेवल्याने संपूर्ण शरीराचे नुकसान होते आणि डोळ्यांमध्ये कोरडेपणा येतो. जर तुम्हाला कमी पाणी पिण्याची सवय असेल तर तुम्ही ती ताबडतोब सुधारली पाहिजे. जर तुम्ही जास्त पाणी पिऊ शकत नसाल तर ताक, लिंबू पाणी, उसाचा रस, सत्तू सरबत, सफरचंदाचा सरबत, असे आरोग्यदायी पेये प्या.

संतुलित आहार न घेणे देखील हानिकारक

लोक केवळ अनहेल्दी गोष्टी खातातच नाहीत तर ते त्यांच्या दैनंदिन आहारात पुरेसे पोषण देखील समाविष्ट करत नाहीत, ज्यामुळे शरीराचे दुहेरी नुकसान होते. डोळ्यांना झिंक, व्हिटॅमिन ए, ल्युटीन, झेक्सॅन्थिन, ओमेगा 6 फॅटी ॲसिड, कॉपर यांसारख्या पोषक तत्वांची आवश्यकता असते आणि जर तुम्ही हे सर्व घटक समृद्ध असलेले पदार्थ खाल्ले नाहीत तर डोळ्यांना त्रास होतो. म्हणून, गाजर, मासे, अंडी, अक्रोड, बदाम, संत्री, द्राक्ष, ब्लूबेरी, पपई यासारखे पदार्थ आहारात संतुलित पद्धतीने समाविष्ट करावेत.

रात्री उशिरापर्यंत जागे राहणे

आधुनिक जीवनशैली अशी आहे की लोक अनेकदा रात्री उशिरापर्यंत कोणतेही काम न करता जागे राहतात, ज्यामुळे डोळ्यांवर वाईट परिणाम होतो, याशिवाय तुम्ही अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता. म्हणून, रात्री किमान 10 वाजेपर्यंत झोपायला जावे आणि 7-8 तासांची चांगली झोप घ्यावी.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)