AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कमकुवत हाडांना जीवन देतील ‘या’ 5 बिया, आताच तुमच्या आहारात करा समाविष्ट

हाडे आपल्या शरीराचे संतुलन राखण्यास मदत करतात. पण योग्य आहार आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होऊ लागतात आणि तुमचे शरीर तंदुरुस्त राहत नाही. यासाठी तुम्ही तुमचा आहारात बदल केला पाहिजे. तर आज या लेखाद्वारे आपण जाणून घेऊया की असे कोणत्या बिया आहेत जे खाल्ल्याने तुमची हाडे मजबूत होतात.

कमकुवत हाडांना जीवन देतील 'या' 5 बिया, आताच तुमच्या आहारात करा समाविष्ट
Eat these five seeds for better bone healthImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 27, 2025 | 12:43 AM
Share

आजकाल प्रत्येकजणांच्या शरीरात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होऊ लागलीत. बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी ही याची प्रमुख कारणे आहेत. शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात. पण ही समस्या तुम्हाला सतत सतावत राहिली तर शरीर इतर अनेक आरोग्य समस्यांना बळी पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत हाडांना मजबूती मिळवण्यासाठी आहारात बदल करणे गरजेचे आहे. हेल्थलाइनच्या मते, हाडांच्या चांगल्या आरोग्यासाठी शरीरात कॅल्शियमची योग्य पातळी असणे खूप महत्वाचे आहे. खरं तर, काही बिया अशा आहेत ज्या शरीराला ताकद देण्यास मदत करतात, तुम्ही या बियांचा तुमच्या आहारात समावेश केला पाहिजे.

बियांमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते जे हाडे मजबूत करण्यास मदत करते. त्यांचे दररोज सेवन केल्याने कॅल्शियमची कमतरता दूर होते आणि हाडे मजबूत होण्यासही मदत होते. चला तर मग कोणत्या बिया आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात…

चिया बियाणे

चिया बियांमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात जी तुमच्या त्वचेसाठी तसेच आरोग्यासाठी फायदेशीर असतात. चिया बियांमध्ये कॅल्शियम, लोह, फायबर, ओमेगा-३ फॅटी ॲसिड असतात जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात.

तीळ तुमची हाडे मजबूत करतील

तिळामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असते जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते. हाडे मजबूत करण्यासाठी देखील तीळ प्रभावी आहे. तुम्ही ते नियमितपणे सॅलडमध्ये टाकून किंवा तिळाचे लाडू बनवून खाऊ शकता.

अळशीच्या बिया देखील फायदेशीर

अळशीच्या बियांमध्ये कॅल्शियम आणि ओमेगा-3 फॅटी ॲसिड सारखे पोषक घटक भरपूर असतात जे हाडांची घनता मजबूत करण्यासाठी प्रभावी असतात. तुम्ही यांचे लाडू बनवून खाऊ शकता.

सूर्यफुलाच्या बिया देखील प्रभावी

हाडांच्या कमकुवतपणाच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही सूर्यफुलाच्या बिया खाऊ शकता. त्यात मॅंगनीज, कॅल्शियम, ओमेगा-3 फॅटी ॲसिडसारखे अनेक पोषक घटक असतात जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात. तुम्ही ते तुमच्या आहारात मोड आलेल्या कडधान्याच्या सॅलडमध्ये मिक्स करून किंवा स्नॅक म्हणून समाविष्ट करू शकता.

खसखस कमकुवत हाडांना जीवदान देईल

खसखस ​​हाडे मजबूत करण्यास मदत करते. यामध्ये मॅंगनीज, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम असे अनेक पोषक घटक असतात जे हाडांची कमकुवतपणा कमी करतात. तुम्ही उन्हाळ्यात खसखस सरबतात मिक्स करून पिऊ शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.