मांसाहारी पदार्थांसोबत खा ‘हे’ 5 पदार्थ, शरीरात वाढणार नाही उष्णता

उन्हाळ्यात आपल्या खाण्याच्या सवयी बदलणे महत्वाचे असते. कारण या दिवसांमध्ये शरीराला थंडावा देणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. दुसरीकडे जर तुम्हाला मांसाहारी पदार्थ खाण्याची आवड असेल, तर ते दररोज किंवा उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला नुकसान पोहोचू शकते. म्हणून तुम्ही या पाच पदार्थांपैकी कोणत्याही एका पदार्थांचे सेवन करू शकता.

मांसाहारी पदार्थांसोबत खा हे 5 पदार्थ, शरीरात वाढणार नाही उष्णता
Non Veg
Image Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: May 25, 2025 | 12:22 PM

आपल्यापैकी अनेकांना मांसाहारी पदार्थ खूप आवडतात. त्यात चिकन, मटण, मासे, अंडी आणि सीफूडचा समावेश असतो. हे मांसाहारी पदार्थ खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषक तत्वे देखील मिळतात. यातील मांस, मासे आणि अंडी हे प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत, जे स्नायूंना बळकटी देण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करतात. असे मानले जाते की शाकाहारी अन्नापेक्षा मांसाहारी अन्नात जास्त व्हिटॅमिन बी 12 आढळते. याशिवाय आपल्याला त्यातून लोह, जस्त, व्हिटॅमिन डी आणि इतर अनेक जीवनसत्त्वे मिळतात. मासे हे ओमेगा-3 फॅटी ॲसिडचा चांगला स्रोत आहे, जे चमकदार त्वचेसाठी तसेच मेंदू आणि हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.

बरेच लोकं दररोज किंवा दोन दिवसांतून एकदा मांसाहारी पदार्थांचे सेवन करत असतात. विशेषतः फिटनेस फ्रीक असलेली लोकं नियमितपणे मांसाहारी पदार्थांचे सेवन करत असतात. कारण या लोकांना असे वाटते की मांसाहार खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात. परंतु दररोज किंवा जास्त प्रमाणात मांसाहारी पदार्थ खाणे देखील तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते, विशेषतः उन्हाळ्यात ते मर्यादित प्रमाणात खावे. चला जाणून घेऊया तज्ञांकडून याबद्दल

उन्हाळ्यात जास्त मांसाहारी खाल्ल्याने ही समस्या उद्भवू शकते

दिल्लीतील श्री बालाजी अ‍ॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटच्या मुख्य आहारतज्ज्ञ प्रिया पालीवाल सांगतात की, जर तुम्हाला मांसाहारी पदार्थ खाण्याची आवड असेल आणि उन्हाळ्यातही ते मोठ्या प्रमाणात सेवन करत असाल तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत कारण मांसाहारी पदार्थ शरीरात उष्णता वाढवू शकतात, ज्यामुळे अपचन, आम्लता आणि थकवा यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

– उन्हाळ्यात मांसाहारी पदार्थांसोबत या गोष्टी खा
पण जर तुम्ही मांसाहारासोबत काही थंड पदार्थ खाल्ले तर या समस्या टाळता येतात.

– उन्हाळ्यात, मांसाहारी पदार्थांसोबत दही नक्कीच खा कारण ते पचन सुधारण्यास आणि शरीराला थंडावा देण्यास मदत करते.

– दुसरी गोष्ट म्हणजे पुदिना, जो केवळ चव वाढवत नाही तर शरीराला थंडावा देखील देतो.

– तिसरी गोष्ट म्हणजे लिंबू, ज्यामध्ये तुम्ही मांसाहारी पदार्थांवर लिंबाच्या रसाचे काही थेंब मिक्स करून त्यांचे सेवन करू शकतात. यामुळे अन्न पचायला सोपे जाते.

– चौथी गोष्ट म्हणजे काकडी जी हायड्रेशन राखते आणि शरीरात पाण्याची कमतरता देखील होऊ देत नाही.

– पाचवी गोष्ट म्हणजे ताक किंवा जे पोटाला थंड करते आणि जड अन्नानंतर आराम देते.

मांसाहारी पदार्थांसोबत एकाच वेळी यापैकी कोणत्याही एका पदार्थांचा समावेश करून, तुम्ही उन्हाळ्यातही चव आणि आरोग्य दोन्हीची काळजी घेऊ शकता. तसेच, तळलेले आणि खूप मसालेदार मांसाहारी पदार्थ खाणे टाळा आणि शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्या.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)