AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Food For Healthy Heart: निरोगी हृदयासाठी रोज खा ‘ हे ‘ पदार्थ

हृदय निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायामासोबतच पौष्टिक, सकस आहार घेणेही गरजेचे आहे. अशा वेळी तुम्ही तुमच्या आहारात अनेक हेल्दी पदार्थांचा समावेश करू शकता.

Food For Healthy Heart: निरोगी हृदयासाठी रोज खा ' हे ' पदार्थ
| Updated on: Oct 11, 2022 | 10:23 AM
Share

हृदय हे शरीरातील सर्वात महत्वपूर्ण अवयवांपैकी एक आहे. दररोज व्यायाम केल्याने आणि सकस व पौष्टिक आहाराचे सेवन केल्याने हृदय (heart) निरोगी राहते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या डाएटमध्ये (diet) अनेक पदार्थांचा समावेश करू शकता. यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होईल. हृदयाचे अनियमित ठोके आणि श्वास लागणे अशा हृदयाशी संबंधित समस्यांपासून आपले संरक्षण करण्याचे काम ते करतात. अशावेळी तुम्ही तुमच्या जीवनशैलीत (lifestyle) बदल करणे गरजेचे आहे. निरोगी हृदयासाठी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करू शकतो, ते जाणून घेऊया.

चांगल्या प्रतीचे तेल – स्वयंपाकासाठी चांगल्या प्रतीचे तेल वापरावे. तुम्ही गायीचे शुद्ध देशी तूप आणि नारळाचे तेल, अन्न शिजवण्यासाठी वापरू शकता. हे तेल चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे काम करतात. तसेच जजळजळ, सूज इत्यादी समस्या दूर करतात.

ओमेगा 3 असलेले पदार्थ – हृदय निरोगी ठेवण्यासाठी ओमेगा ३ ने समृद्ध असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. ते खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात. तसेच हृदय निरोगी ठेवतात. त्यासाठी तुम्ही आहारात फ्लेक्ससीड्स, अक्रोड आणि चिया सीड्स यांचा समावेश करू शकता.

बीट – तुम्ही बीटाचा रस आणि कोशिंबीर स्वरुपात त्याचे सेवन करू शकता. त्यामध्ये आयर्न (लोह) भरपूर प्रमाणात असते. बीटाच्या सेवनाने शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होत नाही. बीटामध्ये ॲंटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे हृदयरोगाचा धोका कमी करण्याचे काम करतात.

ऑर्गॅनिक चहा – तुम्ही नियमितपणे ऑर्गॅनिक चहाचे सेवन करू शकता. यामध्ये व्हाइट टी आणि माचा टी यांचा समावेश आहे. या चहामध्ये ॲंटी-ऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. ते खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे काम करतात.

फळं – तुम्ही द्राक्षं, डाळिंब आणि बेरीज यांसारख्या फळांचा आहारात समावेश करू शकता. त्यामध्ये ॲंटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे हृदय निरोगी ठेवण्याचे कार्य करतात.

व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशिअमने समृद्ध असलेले पदार्थ – यामध्ये ॲव्होकॅडो, बदाम, शेंगदाणे आणि तीळ यांसारखे पदार्थ असतात. हे पदार्थ फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून बचाव करण्यासाठी कार्य करतात. ड्रायफ्रुट्स, बिया, हिरव्या पालेभाज्या आणि कोको यांसारख्या पदार्थांमध्ये मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असते. ते उच्च रक्तदाब नियंत्रित करण्याचे काम करतात.

पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन केने समृद्ध असलेले पदार्थ – तुम्ही तुमच्या आहारात केळी, ॲव्होकॅडो आणि भोपळा यासारख्या पोटॅशिअमयुक्त पदार्थांचा समावेश करू शकता. तसेच हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली आणि ॲव्होकॅडो इत्यादी व्हिटॅमिन के ने समृद्ध असलेले पदार्थही नियमितपणे सेवन करावेत.

Follow Us
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी