
यूपीतील बनारसचा बनारसी पान सर्वांनाच खायला खुप आवडतो आणि हा पान आज जगभर प्रसिद्ध आहे. अशातच हा बनारसी पान बनवताना यात बडीशेपचा जास्त प्रमाणात वापर करतात, पण तुम्हाला माहिती आहे का की या दोन्ही गोष्टी एकत्र करून खाल्ल्याने केवळ तुम्हाला ताजेतवानेपणा जाणवत नाही तर त्यांचा तुमच्या आरोग्यावरही चांगला परिणाम होतो. कारण यावेळी आयुर्वेद तज्ज्ञ किरण गुप्ता यांनी सांगितले की, विड्याच्या पानांमध्ये कॅल्शियम आणि लोहाचे प्रमाण चांगले असते, तर त्यात इतर अनेक अँटीऑक्सिडंट्स देखील असतात.
अशातच हेल्थ लाईनच्या मते, बडीशेपमध्ये प्रथिने आणि फायबर व्यतिरिक्त पोटॅशियम, फॉस्फरस व कॅल्शियम देखील चांगले असते, त्यामुळे त्याचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
बडीशेप आणि विड्याचे पान हे दोन्ही असे घटक आहेत ज्याचे सेवन प्रत्येकजण जेवणानंतर करतात, जेणे तोंडात दुर्गंधी येऊ नये. तसेच विड्याचे पान हे पूजेमध्ये देखील वापरले जाते. तर आजच्या या लेखात आपण जाणून घेऊयात की विड्याचे पान आणि बडीशेप एकत्र करून खाण्याचे आरोग्याला कोणते फायदे मिळतात.
विड्याचे पान आणि बडीशेप
आहारतज्ज्ञ मेधावी गौतम सांगतात की विड्याचे पान आणि बडीशेप दोन्ही गोष्टी शरीराला आतून थंडावा देण्याचे काम करत असतात. म्हणून हे जास्त करून उन्हाळ्यात एकत्र खाणे फायदेशीर ठरते. यामुळे अपचन, गॅस, पोटफुगी इत्यादी समस्या देखील टाळता येतात, कारण हे मिश्रण तुमची पचनक्रिया सुधारते. तज्ञ म्हणतात की या दोन्ही गोष्टी एकत्र खाण्याचे इतरही अनेक फायदे आहेत.
फायदे
– विड्याच्या पानांसोबत बडीशेप खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होतेच, शिवाय तोंडात जमा होणाऱ्या बॅक्टेरियांशी लढण्यासही मदत होते. या मिश्रणाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत राहते, ज्यामुळे शरीर विषाणूजन्य समस्यांशी लढण्यास सक्षम होते. यामुळे त्वचा आणि डोळ्यांना देखील फायदा होतो.
विड्याच्या पानांचे आणि बडीशेपचे पाणी
आयुर्वेद तज्ज्ञ किरण गुप्ता यांच्या मते, जर तुम्ही विड्याची पाने उकळून त्याचे पाणी प्यायले तर ते देखील आरोग्यास फायदेशीर ठरते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की युरिक अॅसिड असलेल्या लोकांसाठी सकाळी रिकाम्या पोटी विड्याच्या पानांचे पाणी पिणे खूप फायदेशीर आहे. याशिवाय बडीशेपचे पाणी युरिक अॅसिड कमी करण्यासाठी देखील प्रभावी आहे.
या गोष्टींसह विड्याचे पान देखील फायदेशीर
विड्याच्या पानांचे सेवन ओव्याचे पानांसोबत करणे देखील खूप फायदेशीर आहे. लहान मुलांची पचनक्रिया सुधारण्यासाठी पान आणि ओव्याचे पान उकळून त्याचे पाणी दिले जाते जे आजींची जुनी रेसिपी आहे. तसेच विड्याचे पान हे लवंगासह खाल्ल्याने घसा साफ होतो. कात सुपारी आणि पानाचे सेवन शरीराला थंडावा देण्याचे काम देखील करते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)