AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दररोज भात खाताय तर वाढू शकतो या 5 आजारांचा धोका

तुम्हाला देखील दररोज भात खाण्याची सवय असेल, तर तुम्हाला त्यापासून होणाऱ्या हानीबद्दल माहिती असणे देखील आवश्यक आहे. जास्त भात खाल्ल्याने कोणत्या आजारांचा धोका वाढतो. भात खाल्ल्याने कोणत्या समस्या उद्भवू शकतात जाणून घ्या.

दररोज भात खाताय तर वाढू शकतो या 5 आजारांचा धोका
shailesh musale
shailesh musale | Updated on: Dec 09, 2024 | 8:47 PM
Share

भारतीय खाद्यपदार्थामध्ये सामान्यत दोनच गोष्टी जवळजवळ दररोज वापरल्या जातात, ते म्हणजे गहू आणि तांदूळ. आपल्या ताटात प्रामुख्याने गरम रोट्या आणि भात असतात. काहींना रोट्या खायला आवडतात, तर काहींना भात खाण्याची सवय असते. भात खाल्ल्याशिवाय अनेकांनी जेवण केल्यासारखं वाटतच नाही. पण भात जास्त प्रमाणात खाणे चांगले नाही. तुम्ही दररोज भात खात असाल तर तुम्हाला त्याचे दुष्परिणाम माहित असणे आवश्यक आहे.

मधुमेहाचा धोका वाढू शकतो

मधुमेह असलेल्या रुग्णांना भात कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो. अनेकांना तर भात न खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. भात खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी पटकन वाढते. त्यामुळे फक्त मधुमेहाच्या रुग्णांनीच नाही तर सर्वांनीच अधिक प्रमाणात भात खाणे टाळले पाहिजे.

लठ्ठपणा वाढण्याची शक्यता

भातामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण खूप अधिक असते. अशा परिस्थितीत तुम्ही जर रोज भरपूर भात खात असाल तर त्यामुळे तुमच्या शरीरातील चरबी आणि लठ्ठपणा वाढू शकतो. भात खाल्ल्यानंतर पटकन भूक लागते. त्यामुळे देखील तुम्हाला जास्त खाण्याची सवय लागते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल किंवा वजन कमी करायचे असेल तर तुम्ही भात खाणे टाळले पाहिजे.

हृदयाशी संबंधित आजारांचा धोका

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तुम्ही जर दररोज भात खात असाल तर तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी ते धोकादायक ठरू शकते. पांढऱ्या तांदळात कोणतेही पोषक तत्व नसतात. यात फायबरचे प्रमाणही कमी असते. तुम्ही जर रोज त्याचा आहारात समावेश केला तर ट्रायग्लिसराइडची पातळी आणि खराब कोलेस्ट्रॉलची पातळी झपाट्याने वाढते. यामुळे हृदयाशी संबंधित समस्या वाढू शकतात. तुम्ही जर भात खाण्याचे शौकीन असाल तर तुम्ही तपकिरी किंवा लाल तांदूळ याचा आहारात समावेश करु शकता.

चयापचय प्रभावित होऊ शकते

अनेक अभ्यासातून असे समोर आलंय की जे रोज भात खातात त्यांना मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका वाढू शकतो. भाताने चयापचय हळूहळू मंदावतो ज्यामुळे लठ्ठपणा आणि पचनाच्या अनेक समस्या उद्भवतात. दररोज भात खाण्याऐवजी कमी प्रमाणात त्याचे सेवन करावे. नेहमीच्या पांढऱ्या तांदळाऐवजी फायबरयुक्त तपकिरी तांदूळ तुम्ही खाऊ शकता.

कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका

भात खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी वाढते हे अभ्यासातून सिद्ध झाले नसले तरी दररोज भात खाल्ल्याने शरीरात काही बदल नक्कीच होतात.  शरीरात ट्रायग्लिसराइड आणि खराब कोलेस्ट्रॉलची पातळी यामुळे वाढू शकते. जर तुम्हाला आधीच उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर तुम्ही भात खाण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Follow Us
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला....
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर....
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video.
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव....
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार.
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल.....
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल......
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ...
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार.
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.