AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राला पुन्हा उन्हाचा तडाखा, राज्यात उष्णतेची लाट, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचं तापमान

राज्यात पुन्हा एकदा उष्णतेची लाट आल्याचं पहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यातील तापमान हे 40 अंश सेल्सिअसच्या पुढे पोहोचलं आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहान करण्यात आलं आहे.

महाराष्ट्राला पुन्हा उन्हाचा तडाखा, राज्यात उष्णतेची लाट, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचं तापमान
राज्यात उष्णतेची लाट Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 18, 2026 | 7:51 PM
Share

राज्यात पुन्हा एकदा उष्णतेची लाट आल्याचं पहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यांमधील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे पोहोचलं आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्णतेच्या लाटेचा धोका लक्षात घेता नवी मुंबई महानगरपालिकेने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. महाराष्ट्र हा उष्णतेच्या धोक्याच्या दृष्टीने संवेदनशील राज्यांपैकी एक असल्याने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA), भारतीय हवामान विभाग (IMD) तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या उपाययोजना करण्यात येणार आहेत.  महानगरपालिकेने दिलेल्या सूचनांनुसार, क्षेत्रीय काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शक्यतो दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात बाहेर जाणे टाळावे. अत्यावश्यक काम असल्यास योग्य ती खबरदारी घेऊनच कामकाज करावे. तसेच सकाळी ११ पूर्वी किंवा सायंकाळी ४ नंतर क्षेत्रीय कामे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गडचिरोली जिल्ह्यात उष्णतेचा कहर 

गडचिरोली जिल्ह्यात उष्णतेची लाट आल्याचं  पहायला मिळत आहे. जिल्ह्यात तापमानाचा पारा 43.2  अंश सेल्सिअसवर पोहचला आहे. तापमान वाढल्यामुळे बाजारपेठ तसेच रस्त्यावर शुकशुकाट पहायला मिळत आहे.  गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या तेलंगणामधील चार जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.  मंचिर्याल, आदिलाबाद, निर्मल, भोपालपल्ली या चार जिल्ह्याना उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जळगावात 43 अंश सेल्सिअस तापमान   

जळगाव जिल्ह्यासह चाळीसगाव तालुक्यात उष्णतेचा प्रचंड तडाखा जाणवत असून, आज चाळीसगावातील तापमानाने यावर्षी दुसऱ्यांदा उच्चांक गाठत तब्बल ४३ अंश सेल्सिअसपर्यंत मजल मारली आहे. सकाळपासूनच कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून, दुपारच्या वेळेत उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होत आहेत. वाढत्या तापमानाचा फटका नागरिकांसह शेतकरी, मजूर आणि वाहन चालकांनाही बसत आहे. उष्माघाताचा धोका लक्षात घेता आरोग्य विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, अत्यावश्यक कामाशिवाय दुपारच्या वेळेत बाहेर पडू नये, भरपूर पाणी प्यावे आणि लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाने देखील येत्या काही दिवसांत उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

अकोल्यात 46 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद  

अकोल्यात उष्णतेचा कहर पहायला मिळत आहे. तापमान 46 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. दुपारच्या वेळेत रस्त्यांवरील वर्दळ कमी झाली असून , नागरिक डोक्यावर रुमाल, हातात छत्री घेऊनच बाहेर पडताना दिसत आहेत. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक काम असल्यासच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

वर्ध्यात पारा 46 अंश सेल्सिअसवर 

वर्धा जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा मोठा परिणाम पहायला मिळत आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. वर्धा जिल्ह्यात सलग दोन दिवस तब्बल 46 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे रस्त्यावर शुकशुकाट पहायला मिळत आहे.   दरम्यान तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भाचं जिल्हानिहाय तापमान 

अकोला – 46.3 अंश सेल्सिअस, अमरावती – 46.4, वर्धा – 46.5, नागपूर – 44.4,  बुलढाणा – 43.6, चंद्रपूर – 43.8,  गोंदिया – 43.8, गडचिरोली – 43.6,  यवतमाळ – 45.4, आणि वाशिममध्ये  44.0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...