AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या पक्षाची किती फाटली… भाजप नेत्याने ठाकरे गटाची अक्षरश: काढली, जोरदार हल्लाबोल

BJP vs Shivsena UBT : भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यासह शिवसेना उद्धव ठाकरे पक्षावर सडकून टीका केली आहे. बन यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

तुमच्या पक्षाची किती फाटली... भाजप नेत्याने ठाकरे गटाची अक्षरश: काढली, जोरदार हल्लाबोल
Navnath Ban and RautImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 18, 2026 | 7:33 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सातत्याने भाजपवर टीका करत असतात. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी स्टॅलिन यांच्या एका विधानाचा संदर्भ देत भारतीय तरुणांचा उल्लेख मंद असा केला होता. यानंतर आता भाजपकडून संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यासह शिवसेना उद्धव ठाकरे पक्षावर सडकून टीका केली आहे. नवनाथ बन यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

तुमच्या पक्षाची किती फाटली…

नवनाथ बन यांनी संजय राऊत आणि ठाकरे गटावर सडकून टीका केली आहे. नवनाथ बन यांनी म्हटले की, संजय राऊत तुमच्या पक्षाची किती फाटली? जनतेने मताच्या माध्यमातून तुमची कशी वाट लावली ते बघा. मताच्या माध्यमातून विधानसभेत महापालिकेत पूर्ण फाडण्याच काम जनतेने केलं आहे. त्यामुळे विनाकारण न्याय व्यवस्थेवर टीका टिप्पणी करणं बंद करा. मूळ शिवसेना एकनाथ शिंदेंची आहे मूळ राष्ट्रवादी अजित दादा सुनेत्रा पवार यांची आहे. यावर जनतेने शिक्कामोर्तब केले आहे त्यावर लक्ष द्या.

तरूणाईने तुम्हाला झुरळासारखं चिरडलं आहे

पुढे बोलताना बन यांनी म्हटले की, तरुणांना मतिमंद झुरळ म्हणायचे धंदे बंद केले पाहिजे. तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला याच तरुणाईने झूरळासारखं विधानसभेला महापालिकेला चिरडलेलं आहे. येणाऱ्या काळात तरुणाईचा अपमान कराल तर ही तरुणाई झुरळासारखं वागणं करून टाकेल. झुरळाप्रमाणे तुम्हाला हिट मारून नायनाट केल्या शिवाय ही तरुणाई थांबणार नाही हे संजय राऊत यांनी लक्षात ठेवावं.

तुमच्या पक्षाची रणनीती काय?

नवनाथ बन यांनी पुढे बोलताना म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसर आवाहन केलं त्यानंतर संजय राऊत यांनी नाव ठेवायला सुरुवात केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्यटन करायला परदेशात गेले नाहीत, तर रणनीती आखायला गेले आहत. तुमच्या पक्षाची रणनीती काय? तरुणांना माथेफिरू, मंद म्हणण? पत्राचाळ घोटाळा करणं, सामनामध्ये खोटं लिहिणं तुमच्या पक्षाची रणनीती आहे. नरेंद्र मोदी यांची रणनीती देश प्रथम आणि देशाला पुढे घेऊन जाण आहे.

NEET पेपर फुटी प्रकरणी भाजपचा संबंध नाही

पुढे बोलताना नवनाथ बन यांनी सांगितले की, मोदी यांच्या रणनीतीवर शंका उपस्थित करू नका, तुमची रणनीती कशी फसली आहे ते बघा. NEET पेपर फुटी प्रकरणी भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याला बेड्या ठोकण्याचं काम यंत्रणा मार्फत केलं जात आहे. ज्या पद्धतीने पेपर फुटी झाली परीक्षा रद्द करण्यात आली त्यानंतर प्रत्येकाला अटक करण्याचं करून कारवाई करण्याचं काम सुरू आहे. यामध्ये तुमचेही काही धागेदोरे असतील तेही तपासले जातील. विनाकारण वडाची साल पिंपळाला जोडण्याचं प्रयत्न संजय राऊत यांच्या मार्फत केला जात आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...