AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमरावती विधानपरिषदेवरुन शिवसेना आणि भाजपात रस्सीखेच, बाजोरिया यांची मुलासाठीही फिल्डींग

विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दावा केला आहे. अकोल्यातील एकनात शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार, उप नेते गोपीकिशन बाजोरिया यांनी अमरावतीत चाचपणी सुरु केली आहे.

अमरावती विधानपरिषदेवरुन शिवसेना आणि भाजपात रस्सीखेच, बाजोरिया यांची मुलासाठीही फिल्डींग
Gopikishan Bajoria
| Edited By: | Updated on: May 18, 2026 | 8:14 PM
Share

अकोला : महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या १६ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांसाठी अखेर निवडणूक जाहीर झाली आहे.विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दावा केला आहे. अकोल्यातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार, उप नेते गोपीकिशन बाजोरिया यांनी अमरावतीत चाचपणी सुरु केली आहे. गोपीकिशन बाजोरिया यांनी त्यांचा मुलगा आणि माजी आमदार विप्लव बाजोरिया यांच्यासाठी परभणी-हिंगोली मतदारसंघाची पक्षाकडे मागणी केली आहे.

विधान परिषदेच्या 16 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. यात अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे तर भाजपच्या ताब्यात असलेल्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून सलग दोनदा भाजपचे प्रवीण पोटे विजयी झाले आहेत. मात्र,आता या मतदारसंघावर थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजरी यांनी दावा ठोकला आहे. यासंदर्भात नुकतीच बाजोरिया यांनी मुंबई आणि अमरावतीत काही महत्त्वाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत.

दरम्यान, आपण अमरावतीतून लढण्यासाठी इच्छुक असल्याचे बाजोरिया यांनी Tv9 मराठीशी बोलताना स्पष्ट केले आहे. तर यासोबतच हिंगोली-परभणी विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून बाजोरिया यांनी त्यांचा मुलगा आणि येथील माजी आमदार विप्लव बाजोरिया यांच्यासाठी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. अमरावतीत आपल्याला सर्वच पक्षातील लोकांनी लढण्यासाठी आग्रह केल्याचा दावा बाजोरिया यांनी केला आहे. तर अमरावतीत काँग्रेसचे नगरसेवकही आपल्याला समर्थन देतील, असा मोठा दावा बाजरिया यांनी केला आहे.

कोण आहेत गोपीकिशन बाजोरिया?

# शिवसेनेचे विधान परिषदेचे सलग तीन टर्म्स आमदार.

# अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक स्वराज्य मतदार संघातून 2003 ते 2021 असे सलग 18 वर्ष आमदार.

# 2021 मध्ये भाजपच्या वसंत खंडेलवाला यांच्याकडून पराभव

# सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उपनेते

# विधानपरिषदेत पक्षाचे गटनेते आणि मुख्य प्रतोद म्हणून काम केले.

# मुलगा विप्लव बाजोरिया परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आमदार होता.

# विधान परिषद निवडणुकीत ‘बाजोरिया पॅटर्न’ने ते स्वतः तीन वेळा आणि मुलाला एकदा आमदार केले

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?