AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दररोज सकाळी भिजवलेले चणे खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा !

चणे हे जवळपास सर्वांचाच स्वयंपाक घरात असतात. चणे खाणे हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

दररोज सकाळी भिजवलेले चणे खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा !
चणे
| Updated on: Apr 21, 2021 | 12:31 PM
Share

मुंबई : चणे हे जवळपास सर्वांचाच स्वयंपाक घरात असतात. चणे खाणे हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यामध्येही रात्री भिजवलेले चणे सकाळी उठून खाल्ले तर त्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला होतील. खरं तर चण्यामध्ये अनेक पौष्टिक पदार्थासोबतच व्हिटॅमिन आणि खनिजे असतात. चणे खाणे फक्त आपल्या आरोग्यासाठीच नाही तर वजन कमी करण्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर आहेत. (Eating soaked Chickpea is beneficial for health)

रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी  सध्याच्या कोरोनाच्या वातावरणात आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे फार आवश्यक झाले आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काळे चणे हे खूप फायदेशीर आहेत. यासाठी चणे 7 ते 8 तास पाण्यात भिजत ठेवा. हे खाल्ल्याने दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळते आणि पित्त, कफची समस्या कमी होण्यास मदत मिळते.

अशक्तपणा कमी होतो चण्यामध्ये लोहाचे प्रमाण हे अधिक असते. यामुळे, आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण होते. यामुळे तुमची उर्जा वाढते. मुले आणि गर्भवती महिला भिजवलेल्या चण्याचे सेवन करू शकतात. हे शरीरात हिमोग्लोबिन वाढविण्यात मदत करते. यामुळे, आपल्या शरीरात रक्त तयार होते.

बद्धकोष्ठतेच्या समस्येसाठी फायदेशीर चण्यात फायबरची मात्रा जास्त असते. हे पचन संबंधित समस्यांवर मात करण्यास मदत करते. यामुळे तुमची पाचक प्रणाली निरोगी राहते. त्याच वेळी, ज्या लोकांना बद्धकोष्ठता समस्या आहे. त्यांनी भिजलेल्या चण्यासोबत पाणीही प्यावे.

डोळ्यांसाठी फायदेशीर डोळ्यांसाठी चणा देखील फायदेशीर आहे, कारण त्यात कॅरोटीन घटक आहे. हा घटक प्रामुख्याने डोळ्यांच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते, ज्यामुळे डोळ्यांची निरोगी क्षमता टिकते.

लठ्ठपणा कमी होतो लठ्ठपणा कमी करण्यासाठी चणे खाणे खूप फायदेशीर आहे. कारण चण्यामध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स असते, जे भूक कमी करून वजन कमी करण्यास मदत करते. यामुळे ज्या लोकांना लठ्ठपणा कमी करायचा आहे त्यांनी आपल्या आहारात चणे घ्यावेत

केसांसाठी फायदेशीर चणामध्ये व्हिटॅमिन-ए, बी आणि व्हिटॅमिन-ई आढळतात जे केसांना निरोगी आणि मजबूत ठेवतात. त्यामुळे दररोज सकाळी चने खाल्ले पाहिजेत.

संबंधित बातम्या : 

(Eating soaked Chickpea is beneficial for health)

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?