कबुतरांना घरापासून दूर लांब कसं ठेवाल? बाल्कनी, गच्ची स्वच्छ ठेवण्यासाठी सोपे उपाय

तुमच्या घराच्या बाल्कनीत किंवा गच्चीवर कबुतर येत असतील तर हे सोपे घरगुती उपाय तुमची मदत करतील. या सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही कबुतरांना घरापासून दूर ठेवू शकता. चला तर मग जाणून घ्या कोणते आहेत हे उपाय.

कबुतरांना घरापासून दूर लांब कसं ठेवाल? बाल्कनी, गच्ची स्वच्छ ठेवण्यासाठी सोपे उपाय
pigeons
| Edited By: | Updated on: Sep 22, 2026 | 5:19 PM

घराच्या बाल्कनीमध्ये, ओपन टेरेस किंवा गच्चीवर कबुतरे दिसणे ही सामान्य गोष्ट आहे. पण जर भरपूर कबुतर यायला लागले किंवा वारंवार येत असतील तर ही एक समस्या बनते. कबुतर बाल्कनी घाण करतात आणि यामुळे घरात अनेक आजारही येऊ शकतात. कबुतरांच्या समस्येने त्रस्त लोक विविध उपाय शोधत असतात. तुम्हाला सुद्धा या समस्येपासून मुक्ती हवी असेल तर हे घरगुती उपाय तुमची मदत करू शकतात. या काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही कबुतरांना तुमच्या घरापासून दूर ठेवू शकता.

घराप्रमाणेच बाल्कनी आणि गच्ची सुद्धा नियमित स्वच्छ करणे आवश्यक आहे. तिथे अन्न पदार्थ, पाणी किंवा घाण असेल तर कबुतर वारंवार येऊ शकतात. त्यामुळे स्वच्छता राखणे आवश्यक महत्त्वाचे आहे. सकाळी घरासोबतच बाल्कनी सुद्धा झाडून घ्या. तसेच आठवड्यातून एकदा पाण्याने स्वच्छ करावे.

खाद्यपदार्थ आणि पेये उघड्यावर ठेवू नका

जर तुमच्या छतावर किंवा बाल्कनीमध्ये खाण्या-पिण्याचे पदार्थ ठेवले असतील, तर कबुतरे त्यांच्याकडे नक्कीच आकर्षित होतील. त्यामुळे, धान्य, खडे मसाले, ब्रेड आणि इतर खाद्यपदार्थ सुकण्यासाठी उघड्यावर ठेवणे टाळा.

टोकदार स्पाईक लावा

घराच्या भिंतींवर, बाल्कनीवर किंवा छताच्या कडेला टोकदार खिळे देखील लावू शकता. ज्या ठिकाणी कबुतर वारंवार बसतात, त्या ठिकाणी हे स्पाईक लावणे फायदेशीर ठरते.

चमकदार वस्तू लटकवा

जुन्या सीडी, ॲल्युमिनियम फॉइल किंवा चमकणारी पाने यांसारख्या चमकदार वस्तू कबुतरांना घाबरवण्यास मदत करतात. त्यामुळे त्यांना दूर ठेवण्यासाठी तुम्ही या वस्तू तुमच्या बाल्कनी किंवा गच्चीवर लटकवू शकता.

नकली शिकारी पक्षी ठेवा

कबुतरांना घाबरवण्यासाठी तुम्ही तुमच्या बाल्कनी किंवा गच्चीवर घुबड किंवा गरुडाचा स्टॅच्यू देखील ठेवू शकता. कबुतरे या शिकारी पक्ष्यांना घाबरतात आणि म्हणूनच अशा ठिकाणी येणे टाळतात.

तीव्र वासाच्या वस्तू ठेवा

कबुतरांना तीव्र वासाच्या गोष्टी आवडत नाहीत. त्यांना तुमच्या घरापासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही नॅप्थलीनच्या गोळ्या, काळी मिरी आणि व्हिनेगर यांसारख्या गोष्टी वापरू शकता. या गोष्टी पोटलीमध्ये बांधून लटकवू शकता, किंवा तुम्ही स्प्रेचाही वापर करू शकता.

जाळी किंवा नेट लावा

कबुतरांना दूर ठेवण्याचा हा सर्वात प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाय आहे. तुम्ही मोकळ्या जागा, बाल्कनी आणि खिडक्यांमध्ये बर्ड नेट लावू शकता. यामुळे कबुतरांचा रोजचा त्रास कायमचा दूर होईल.

पाणी साचू देऊ नका

अनेकदा घराच्या छतावरील पाण्याच्या टाकीभोवती पाणी साचते. या पाण्यामुळे कबुतर तिथे आकर्षित होतात आणि तिथे घाण करतात. त्यामुळे, घराच्या आसपास, बाल्कनीत किंवा गच्चीवर कुठेही पाणी साचणार नाही याची काळजी घ्या.

बर्ड रिपेलेंट स्प्रे वापरा

कबुतरांमुळे त्रस्त असाल तर मार्केटमध्ये मिळणारे बर्ड रिपेलेंट स्प्रे तुमची मदत करू शकतात. तुमच्या घरातील ज्या भागांमध्ये कबुतर वारंवार येतात त्या भागात हे स्प्रे करा.

पक्ष्यांना बसण्यासाठी जागा आणि रोपे कमी करा

घरात अशी झाडे आणि रोपे ठेवणे टाळा जिथे कबूतर सहजपणे येऊन बसू शकतात. त्यांना बसण्यासाठी जागा कमी असेल तर ते तुमच्या घराकडे कमी आकर्षित होतील

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us