
पनीर आणि अंडी हे दोन्ही प्रोटीनचे चांगले स्रोत आहेत. दोन्हीमध्ये विविध प्रकारचे पोषक घटक आढळतात. हे घटक आपल्या आरोप्यासाठी आवश्यक आहेत. त्यामुळे लोक हे दोन्ही पदार्थ आवडीने खातात.

एका उकडलेल्या अंड्यामध्ये 8 टक्के व्हिटॅमिन ए, 6 टक्के फोलेट, 14 टक्के व्हिटॅमिन बी5, 23 टक्के व्हिटॅमिन बी12, 7 टक्के फॉस्फरस आणि 28 टक्के सेलेनियम असते. यासोबतच 78 कॅलरीज, 6 ग्रॅम प्रोटीन आणि 5 ग्रॅम फॅट असते.

अर्धा कप पनीरमध्ये 81 कॅलरीज, 14 ग्रॅम प्रोटीन, 3 ग्रॅम कार्ब्स, 1 ग्रॅम फॅट, 29% व्हिटॅमिन बी12, 20 टक्के सोडियम, 18.5 % - सेलेनियम, 21.5% फॉस्फरस आणि 6 % कॅल्शियम असते.

या दोन्ही पदार्थांची तुलना केल्यास पनीरमध्ये अंड्यांपेक्षा जास्त प्रोटीन आढळते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारे पनीरचा आहारात समावेश करु शकता.

तुम्ही अंडे उकडून, ऑम्लेट, अंडा करी किंवा अंडा भुर्जी खाऊ शकता. पनीरचा पराठा किंवा सँडविच देखील बनवू शकता. पनीरची भुर्जी देखील बनवता येते. तसेच पनीरपासून अनेक स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात.