भारतातील ‘या’ चहाच्या बागांना एकदा नक्की भेट द्या, चहा प्रेमींसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही ही ठिकाणं

भारतात चहाप्रेमींची कमतरता नाही. चहाच्या या लोकप्रियतेमुळे आपल्या भारतात विविध चहाचे प्रकार तसेच फ्लेवर उपलब्ध आहेत. भारत हा विविध संस्कृती आणि परंपरांचा देश आहे आणि येथे चहाचे अनेक चवी देखील उपलब्ध आहेत. चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात...

भारतातील या चहाच्या बागांना एकदा नक्की भेट द्या, चहा प्रेमींसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही ही ठिकाणं
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Jul 21, 2025 | 3:46 PM

आपल्या भारतात वेगवेगळ्या परंपरा आणि संस्कृती पाहायला मिळते. त्यानुसार अन्नपदार्थांची चव बनवण्याची पद्धत तसेच प्रकार देखील बदलते. अशातच तुम्हाला आपल्या देशात चहाचे अनेक स्वाद देखील चाखायला मिळतात. याचे कारण म्हणजे देशाच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने चहाच्या बागांमध्ये पिकवला जाणारा चहा. चहा प्रेमींसाठी तर भारतातील हे राज्य स्वर्गापेक्षा कमी नाही. तुम्ही चहा प्रेमी आहात किंवा तुम्हाला चहाच्या बागांना भेट द्याची असेल तर या ठिकाणांना नक्की भेट द्या.

आसाम मधील बनवल्या जाणाऱ्या चहाची तुम्हाला एक वेगळीच चव चाखायला मिळेल. तसेच दार्जिलिंग येथील चहाला “शॅम्पेन ऑफ टी” असे म्हणतात. चहाच्या अशा अनोख्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी चला या चहाच्या बागांबद्दल जाणून घेऊयात.

कडक स्वाद असलेला आसामचा चहा

भारताच्या ईशान्येला असलेल्या आसाममध्ये तुम्हाला चहाची कडक चव चाखायला मिळते. संपूर्ण राज्यातून वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीमुळे आसाम चहाला ही अनोखी चव मिळाली आहे. येथे चहाचे बागा दूरवर पसरलेल्या आहेत, जे नैसर्गिक सौंदर्याचे प्रतीक वाटतात.

दार्जिलिंगचा शॅम्पेन ऑफ टी

पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील भागात गेल्यावर तुम्हाला दार्जिलिंगच्या सुंदर टेकड्या दिसतात. येथील चहाला “शॅम्पेन ऑफ टी” असे नाव मिळाले आहे. तर या ठिकाणंचा चहा त्याच्या सुगंधासाठी आणि वेगळ्या चवीसाठी ओळखला जातो. उंची आणि थंड हवामानामुळे दार्जिलिंगच्या चहाला एक वेगळीच चव मिळते.

हिरव्यागार चहाच्या बागांव्यतिरिक्त , येथील पर्यटकांना चहा उत्पादनाची संपूर्ण प्रक्रिया पाहण्याची संधी मिळते आणि तेथे तुम्ही चहाची पाने तोडण्याचा अनुभव देखील घेऊ शकतात. दार्जिलिंगच्या चहाला GI टॅग देखील देण्यात आला आहे, जो त्याच्या अद्वितीय उत्पादनाचा आणि गुणांचा पुरावा आहे.

तामिळनाडूतील निळ्या टेकड्यांमध्ये चहाचा सुगंध

भारताच्या दक्षिणेकडील तामिळनाडूतील नीलगिरी टेकड्या त्यांच्या अनोख्या चवीच्या चहासाठी प्रसिद्ध आहेत. नीलगिरी टेकड्यांमध्ये चहाच्या बागा आणि निलगिरीची झाडे आहेत जी केवळ त्या ठिकाणाचे सौंदर्य वाढवत नाहीत तर चहाला एक आनंददायी सुगंध देखील देतात. हेच कारण आहे की नीलगिरी टेकड्यांचा चहा इतर राज्यांपेक्षा खूप वेगळा आहे.

हिमाचल प्रदेशातील दोन प्रकारच्या चवींचे मिश्रण असलेला चहा

हिमाचल प्रदेशातील थंड आणि वारंवार बदलणारे हवामान चहाच्या बागेसाठी परिपूर्ण आहे. येथील चहामध्ये तुम्हाला एक अनोख्या प्रकारचा गोडवा आणि कडक स्वाद असा अद्भुत मिलाफ असलेला चहा चाखायला मिळतो. सौम्य चहासोबतच तुम्हाला येथे चहाची एक अतिशय विविधता देखील पाहायला मिळते. येथील चहाच्या बागांमध्ये अनेक प्रयोग केले जातात जे विविध प्रकारच्या चहामध्ये दिसतात. हिरवा चहा असो किंवा काळा, चहाच्या प्रत्येक घोटात तुम्हाला हिमाचल प्रदेशची विशिष्टता चाखायला मिळते.

ऑर्गेनिक चहा

सिक्कीममधील टेमी टी इस्टेट ही नामची जिल्ह्यातील पहिली व्यावसायिक चहा इस्टेट आहे आणि आता ती भारतातील सर्वोत्तम चहा इस्टेटपैकी एक मानली जाते. सिक्कीममध्ये काळा, हिरवा, पांढरा आणि उलोंग चहा तयार होतो, जो 2008 पासून ऑर्गेनिक प्रमाणित आहे. तर येथे अनेक चहा प्रेमी चहाचा आस्वाद घेण्यासाठी कारखान्याला भेट देतात आणि येथे राहण्याची ही उत्तम व्यवस्था आहे.