उन्हाळ्याच्या हंगामात चमकदार त्वचा पाहिजे? तर ‘हा’ फेसपॅक नक्की ट्राय करून पाहा !

उन्हाळ्याचा हंगाम येताच अनेकांना त्वचेच्या विविध समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत, ज्यांची त्वचा तेलकट आहे, त्यांचा चेहरा खूप चिकट दिसू लागतो.

उन्हाळ्याच्या हंगामात चमकदार त्वचा पाहिजे? तर 'हा' फेसपॅक नक्की ट्राय करून पाहा !
फेसपॅक
Follow us
| Updated on: May 04, 2021 | 11:20 AM

मुंबई : उन्हाळ्याचा हंगाम येताच अनेकांना त्वचेच्या विविध समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत, ज्यांची त्वचा तेलकट आहे, त्यांचा चेहरा खूप चिकट दिसू लागतो. तर काहींची त्वचा उन्हाळ्यात काळपट पडते. या समस्या टाळण्यासाठी आपण काही सोप्या टिप्स अवलंबू शकता. विशेष म्हणजे कुठल्याही पार्लरमध्ये न जाता आपण घरच्या घरी त्वचेच्या या समस्या दूर करू शकतो. चला तर, या टिप्स काय आहेत, ते जाणून घेऊया…(Face pack of Curd and watermelon is beneficial for the skin)

आज आम्ही तुम्हाला खास फेसपॅक सांगणार आहोत. ज्यामुळे उन्हाळ्यात देखील तुमची त्वचा चमकदार बनेल. यासाठी तुम्हाला दही आणि कलिंगड लागणार आहे. दोन चमके दह्यामध्ये कलिंगडचा रस मिक्स करा आणि हा फेसपॅक संपूर्ण चेहऱ्याला लावा. साधारण 20 ते 25 मिनिटे हा फेसपॅक चेहऱ्यावर ठेवा आणि त्यानंतर थंड पाण्याने धुवा. हा फेसपॅक आपण आठवड्यातून साधारण तीन ते चार वेळा चेहऱ्यावर लावू शकता. हा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे.

दही आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन बी 12 सारखी पोषक घटक असतात. जर आपण सौंदर्याबद्दल बोलत असाल तर चेहऱ्यावर दही वापरल्यास सनबर्न, टॅनिंग, मुरुम, डाग आणि कोरडे त्वचा आणि सुरकुत्या दूर होतात. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर चार चमचे दह्यामध्ये एक चमचा मध मिसळा. आता हे मिश्रण फेसपॅक म्हणून लावा. सुमारे 20 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

कलिंगडमध्ये अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे बी, सी आणि डी मोठ्या प्रमाणात आढळतात. जे आपल्या त्वचेसाठी अतिशय चांगले असतात. कलिंगड फेसपॅक चेहऱ्याला लावल्याने आपली त्वचा थंड राहण्यास मदत होते. दह्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. जे सर्नबर्न आणि टॅनिंगची समस्या दूर करण्यासाठी उपयोगी ठरते. सन बर्न कमी करण्यासाठी त्वचेवर दही लावा आणि 15 मिनिटांनंतर त्वचा साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. टॅनिंग काढून टाकण्यासाठी दह्यामध्ये 3 ते 4 चमचे बेसन पीठ आणि लिंबाचा रस घाला.

संबंधित बातम्या : 

Weight Loss |  ‘वेट लॉस जर्नी’दरम्यान वारंवार वजन तपासताय? मग ‘या’ गोष्टी आधी जाणून घ्या!

Coconut Water | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ‘नारळ पाणी’, वाचा याचे फायदे…

(Face pack of Curd and watermelon is beneficial for the skin)

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.