AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Father’s Day 2022: वडिलांना ‘Father’s Day’ निमित्त भारी शुभेच्छा पाठवा

बाबा, पपा, डॅडी, अप्पा, अण्णा, दादा तुम्ही वडिलांना ज्या कोणत्या नावाने बोलत असाल. त्यांना शुभेच्छा तर दिल्याच पाहिजेत. फादर्स डे निमित्त वडिलांना द्या अशा भारी शुभेच्छा.

Father's Day 2022: वडिलांना 'Father's Day' निमित्त भारी शुभेच्छा पाठवा
फादर्स डे 2022
| Edited By: | Updated on: Jun 18, 2022 | 5:25 PM
Share

आई आणि वडील (Mother and Father)आपल्या घराचा आयुष्याचा खूप मोठा आधार असतात. अख्खं कुटूंब (Family) आपले पालक संभाळत असतात. आजकाल आपण त्यांना भेटवस्तू देण्यासाठी त्यांच्या प्रति आपल्या मनात असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी फादर्स डे (Father’s Day 2022) चं निमित्त शोधत असतो. म्हणा आपल्याच आईवडिलां प्रति आपल्या मनात असलेल्या भावना, प्रेम, कृतज्ञता व्यक्त करायला कोणत्या एका दिवसाची काय गरज. कधी कधी वडिलांचा धाकच इतका असतो की आपण आपल्या मनातील बऱ्याच गोष्टी मोकळे पणाने त्यांच्या समोर बोलायला घाबरत असतो. काहींना तर व्यक होताच येत नाही. पण, गरज आहे ना बाबा, आता जमान्यानुसार  काळानुसार आपल्याला वागलंच पाहिजे. बाबा, पपा, डॅडी, अप्पा, अण्णा, दादा तुम्ही वडिलांना ज्या कोणत्या नावाने बोलत असाल. त्यांना शुभेच्छा तर दिल्याच पाहिजेत.

आता काळनुसार वडिल पण व्हॉट्स ऍप सारख्या आणि इतर सोशल मीडियावर आले आहेत. मग, आपण पण त्यांना सोशल मीडियावर शुभेच्छा द्यायला नको का ? मग, वडिलांना सोशल मीडियावरून फादर्स डे च्या भारी शुभेच्छा दिल्याच पाहिजेत. (Father’s Day Wishes for Dad) चल तर बघूया वडिलांना फादार्स डे च्या शुभेच्छा देण्यासाठी कोणते हटके आणि नवे कोट्स आहेत.

  • -तुम्ही कितीही मोठे झाला तरीही असा एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही मोठा माणूस म्हणूनच पाहणार आणि तो म्हणजे वडिल

हॅपी फादर्स डे!

  • – बाप नावाच्या विद्यापीठात तुम्ही एकदा का शिस्त नावाचा अध्याय शिकला तर तुमचं आयुष्य सुखकर होतं.फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा..!
  • – तुम्ही किती ही मोठे व्हा शेवटी ‘बाप’ बाप असतो. हॅप्पी फादर्स डे डॅडी
  • – आयुष्यातील सर्वात मोठं सुख म्हणजे आई बाबा आहेत.
  • तुम्ही माझे वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे.

फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा..!

  • – जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल पण माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहात हॅप्पी फादर्स डे!
  • -प्रत्येक मुलगी तिच्या पतीची राणी असू शकते, परंतु तिच्या वडिलांची ती राजकुमारीच असते. फादर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!
  • – आईसाठी खूप लिखाण केलं जातं, पण बाबांसाठी व्यक्त होणं खूपच कठीण, आजचा दिवस आहे खास म्हणूनच तुम्हाला तुमचे महत्व सांगण्याचा घेतलाय ध्यास फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा
  • – बाबांसाठी काय स्टेटस ठेवावे माझं जे काही स्टेटस आहे ते त्यांच्यामुळेच आहे फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा!
  • – आनंदाचा प्रत्येक क्षण माझा असतो जेव्हा माझ्या बाबाचा हात माझ्या पाठीवर असतो फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा!
  • – आनंदाचा प्रत्येक क्षण माझा असतो जेव्हा माझ्या बाबाचा हात माझ्या हाती असतो फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा!
  • – भाग्यवान असतात ती लोक ज्यांच्या डोक्यावर वडिलांचा हात असतो. हॅप्पी फादर्स डे
  • – मी खूपच भाग्यशाली आहे की, तुमची साथ मला लाभली आहे. फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा बाबा..!
  • – आयुष्यात कितीही अपयशी झाल्यावरही विश्वास ठेवणारा पहिला व्यक्ती म्हणजे वडिल. फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा ..!
  • – डोळ्यात न दाखवताही जो, आभाळा एवढं प्रेम करतो,

त्याला वडील नावाचा माणूस म्हणतात.

फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा..!

  • – आपल्या भवितव्यासाठी आयुष्याशी चार हात करणाऱ्या व्यक्तीस वडिल म्हणतात

फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा ..!

  • – खिसा रिकामा असला तरीही कधी नाही म्हणाले नाही, माझ्या बाबापेक्षा श्रीमंत मी कधी काहीच पाहिलं नाही फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.