AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोकरी गमावून बसलात…! काळजी करू नका, ‘या’ मार्गांनी भरता येईल EMI

आजच्या स्पर्धेच्या युगात काहीही सांगता येत आहे. यामध्ये अनेकांच्या नोकऱ्या देखील जातात. अशात, मोठा प्रश्न उपस्थित राहतो तो, म्हणजे, EMI कसा भरायचा? या संकटात काय करायचं? जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स..

नोकरी गमावून बसलात...! काळजी करू नका, 'या' मार्गांनी भरता येईल EMI
| Updated on: Jun 06, 2026 | 3:18 PM
Share

मध्यमवर्गीय व्यक्ती स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कायम मेहनत घेत असतो. अशात बँकेतून मिळणाऱ्या कर्जाची त्याला मोठी मदत होते. गृहकर्ज, गाडीचं कर्ज, मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज असे अनेक प्रकारचे कर्ज अनेकांच्या खांद्यावर असतात. दर महिन्याला कर्जाची एक ठराविक रक्कम पगारातून जाते. अशात नोकरी गेल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होतात. ज्यामुळे घरखर्चातर प्रश्न उपस्थित राहतोच, पण कर्जाचे हप्ते भरणं देखील कठीण जातं. अनेक लोकांना आपल्या पगारातून इतके हप्ते भरणं शक्य होत नाही. परंतु योग्य नियोजनाने, कोणताही मोठा आर्थिक भार कमी वेळात सोडवला जाऊ शकतो.

आपत्कालीन निधी असणं आहे महत्त्वाचं

कोणत्याही आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपत्कालीन निधी (Emergency Fund). आपत्कालीन निधी असल्यामुळे तुम्हाला अचानक उद्भवणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करण्यास मदत होऊ शकते. तीन ते सहा महिन्यांचा खर्च भागवण्यासाठी आपत्कालीन निधी बाजूला ठेवला पाहिजे.

समजा तुमचा एकूण मासिक ईएमआय 30 हजार रुपये आहे आणि तुम्हाला इतर खर्चांसाठ 20 हजार रुपयांची गरज आहे. अशा परिस्थितीत, तुमच्याकडे तीन महिन्यांसाठी सुमारे 1 लाख 50 हजार रुपयांचा आपत्कालीन निधी असायला हवा. आपत्कालीन निधी असल्यामुळे तुम्हाला आर्थिक तणावाशिवाय नोकरी शोधण्यास मदत होईल.

बँकेशी बोलून घ्या

नोकरी गमावल्यानंतर, तुम्ही तुमच्या बँकेशी कर्ज स्थगिती (मोरेटोरियम), कर्ज पुनर्रचना आणि व्याज कपात याबद्दल बोलू शकता. जर कर्ज स्थगिती मंजूर झाली, तर तुम्हाला काही काळासाठी ईएमआय भरावे लागणार नाहीत. पण व्याज वाढेल. कर्जाचा कालावधी वाढवल्यानेही तात्पुरता दिलासा मिळेल, पण त्याचा एकूण व्याज परतफेडीवर नकारात्मक परिणाम होईल.

तुम्ही व्याजदरात कपात करण्यासाठी अर्जही करू शकता. जेव्हा तुम्ही कर्जाचा कालावधी वाढवता, तेव्हा व्याज आणि परतफेडीची रक्कम नैसर्गिकरित्या वाढते, त्यामुळे असा निर्णय केवळ विचार करुनच घेतला पाहिजे. काही बँका आणि वित्तीय संस्था अशा सवलती देण्यास तयार नसतात. जर तुमच्याकडे आपत्कालीन निधी नसेल किंवा बँकेकडून अनुकूल मदत मिळत नसेल, तर तुम्ही तुमची मालमत्ता गहाण ठेवून पैसे उभारू शकता. सोन्यासारखी मालमत्ता जमा करून तुम्ही कमी व्याजदराने पैसे मिळवू शकता. याशिवाय, तुम्ही शेअर्स आणि म्युच्युअल फंडांसारख्या प्रतिभूती गहाण ठेवूनही कर्ज घेऊ शकता. कमी व्याजदराने कर्ज मिळवण्याच्या मार्गांचा विचार करणं नेहमीच चांगलं असतं.

गृहकर्ज घेण्यापूर्वी, प्रत्येकाच्या व्याजदरांची तुलना करणं उचित ठरतं. ज्याचा व्याजदर सर्वात कमी असेल, तो तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असेल. सुवर्ण कर्जाचे व्याजदर सामान्यतः इतर प्रकारच्या कर्जांपेक्षा कमी असतात.

Follow Us
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक.

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक

कॉकरोजांच्या निशाण्यावर धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी, थेट निमिषा प्रधान हिच्या कॉलेजपर्यंत पोहोचले आंदोलन.

कॉकरोजांच्या निशाण्यावर धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी, थेट निमिषा प्रधान हिच्या कॉलेजपर्यंत पोहोचले आंदोलन

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय.

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!.

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!

49 वर्षांपूर्वी आलेल्या या गाण्याची आजही तूफान क्रेझ, अवघ्या 9 वर्षांच्या मुलीने दिला होता आवाज.

49 वर्षांपूर्वी आलेल्या या गाण्याची आजही तूफान क्रेझ, अवघ्या 9 वर्षांच्या मुलीने दिला होता आवाज