AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात घरी बनवा 5 प्रकारचे ‘हे’ हेल्दी चाट, जाणून घ्या रेसिपी

उन्हाळ्यात जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरात उष्णता आणि पचनाशी संबंधित समस्या उद्भवते. यासाठी तुम्ही बाहेर मसालेदार अन्न खाण्याऐवजी, घरी काही हेल्दी मसालेदार चाट बनवू शकता. हे तयार करायला खूप सोपे आहे आणि या चाटच्या सेवनाने शरीराला पोषण देखील मिळते. तुम्ही हे स्नॅक्स म्हणून खाऊ शकता. चला तर मग आजच्या लेखात आपण या पाच प्रकारच्या हेल्दी चाटच्या रेसिपी जाणून घेऊयात...

उन्हाळ्यात घरी बनवा 5 प्रकारचे 'हे' हेल्दी चाट, जाणून घ्या रेसिपी
chaat recipes
| Edited By: | Updated on: May 23, 2025 | 2:42 PM
Share

उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येकजण आपल्या आरोग्याची काळजी घेत असतो. तसेच उन्हाळा सुरू झाला की आहाराकडे लक्ष देणे खूप महत्वाचे आहे. या दिवसांमध्ये तुमच्या आहारात हलक्या गोष्टींचा समावेश करावा. ज्यामुळे तुमच्या शरीराला थंडावा मिळतो आणि हायड्रेशन आणि ऊर्जा देखील टिकून राहते. पण काही लोकांना मसालेदार अन्न खावेसे वाटते. अशावेळेस बहुतेजण हे बाहेरून मसालेदार चाट खातात. पण ते रोज खाल्ल्याने गॅस, पोटफुगी आणि अ‍ॅसिडिटी सारख्या समस्या उद्भवू शकतात.

अशा परिस्थितीत तुम्ही घरी आरोग्यदायी चाट बनवू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार आरोग्यदायी पदार्थांचा वापर करू शकता. या लेखात, आम्ही तुम्हाला काही आरोग्यदायी चाट रेसिपी सांगणार आहोत, ज्या तुम्ही घरी सहज बनवू शकता.

काळे चणे चाट (Black Cheese Chaat Recipe In Marathi)

तुम्ही काळ्या चण्यांपासून चाट बनवू शकता. यासाठी तुम्हाला एका भांड्यात उकडलेले काळे चणे घ्यावे लागतील. त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची टाका. वरून लिंबाचा रस पिळून घ्या, भाजलेले जिरे आणि काळे मीठ टाका. आता हे मिश्रण चांगले मिक्स करा आणि वरून हिरवी कोथिंबीर सर्व्ह करा. काळे चणे देखील प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. तुम्ही हा चाट घरी सहज बनवू शकता.

मूग स्प्राउट्स चाट (Moong Dal Sprouts Chaat)

मोड आलेले मुग यापासून चाट बनवता येतो. मोड आलेले मूग हलके उकडवून घ्या किंवा कच्चे देखील वापरू शकता. आता त्यात बारीक चिरलेली काकडी, कांदा आणि टोमॅटो टाका. त्यात लिंबाचा रस आणि चाट मसाला मिक्स करा आणि थंड झाल्यावर सर्व्ह करा. मोड आलेले मुग हे प्रथिने आणि फायबरचा चांगला स्रोत आहेत.

फ्रूट चाट

सफरचंद, केळी, पपई, डाळिंब आणि इतर अनेक फळांपासून तुम्ही फ्रूट चाट बनवू शकता. सर्व फळांचे लहान तुकडे करा. एका भांड्यात सगळे बारिक केले फळं एकत्र करा आणि त्यावर मसाले आणि लिंबाचा रस मिक्स करा. हलके मिक्स करा आणि थंडगार सर्व्ह करा. यासोबतच फ्रूट चाट करताना फळांचे कॉम्बिनेशन लक्षात ठेवा.

कॉर्न चाट

एका भांड्यात उकडलेले कॉर्न म्हणजेच मक्याचे दाणे घ्या. त्यात चिरलेले टोमॅटो, कांदे आणि सिमला मिरची टाका. यासोबत लिंबाचा रस आणि मसाले टाकून चांगले मिक्स करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही थोडी पुदिन्याची चटणी देखील यात मिक्स करू शकता. यापासून हेल्दी चाट देखील बनवता येते. ते स्नॅक म्हणून खाणे हा एक चांगला पर्याय असेल. हा हलका आणि पोटभर नाश्ता आहे.

काकडी आणि शेंगदाण्याचा सॅलड

काकडी सोलून त्याचे लहान तुकडे करा. यात शेंगदाणे, हिरवी मिरची, लिंबाचा रस, काळे मीठ आणि कोथिंबीर टाकून मिक्स करा. काकडी शरीराला थंड ठेवण्यास मदत करते आणि शेंगदाण्यांमध्ये प्रथिने भरपूर असतात. हे चाट लो -कॅलरीज आणि उच्च-ऊर्जेचा स्रोत आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.