पावसाळ्यात कपड्यांमधून येणारा कुबट वास दूर करण्याचे ‘हे’ आहेत पाच सोपे घरगुती उपाय
पावसाळ्यात दमट वातावरणात कपड्यांना अनेकदा एक विचित्र ओलसरपणा आणि बुरशीसारखा वास येतो. यामुळे आपला मुडही खराब होतो आणि कपडे घालण्याचीही इच्छा होत नाही. जर तुम्हालाही या समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. येथे आम्ही तुम्हाला असे 5 घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही कपड्यांमधून येणारा वास दूर करू शकता.

एकीकडे पावसाळा थंडावा आणि आराम देतो, तर दुसरीकडे तो अनेक समस्या निर्माण करतो. अशातच पावसाळ्यात सर्वात मोठी समस्या येते ती म्हणजे कपडे सुकवायचे कसे. या दिवसांमध्ये कपडे लवकर सुकत नाही. त्यात दमट कपडे घडी घालून ठेवले तर कपड्यांमधून कुबट वास येतो. पावसाळ्यात जास्त आर्द्रता असते, ज्यामुळे कपडे व्यवस्थित सुकत नाहीत आणि त्यात एक विचित्र वास येतो. या वासामुळे कपडे खराब होतातच पण ते घालावेसेही वाटत नाही. कारण त्यांना येणारा हा कुबट वास मात्र नकोसा वाटतो.
विशेषतः जे फ्लॅटमध्ये राहतात त्यांना ही समस्या जास्त त्रास देते कारण घरांमध्ये कमी सूर्यप्रकाश पोहोचत असतो आणि कपडे लवकर सुकत नाहीत. जर तुम्हालाही पावसाळ्यात या समस्येचा त्रास होत असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. येथे आम्ही तुम्हाला काही सोपे घरगुती उपाय सांगत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे कपडे सुगंधित आणि ताजेतवाने ठेवू शकता.
1. वॉशिंगमध्ये बेकिंग सोडा किंवा पांढरा व्हिनेगरचा वापर करा
कपडे धुताना डिटर्जंटसोबत एक चमचा बेकिंग सोडा किंवा थोडा पांढरा व्हिनेगर त्यात टाका. कारण या दोन्हीमध्ये आम्लधर्मीय गुणधर्म असतात. यामुळे कपड्यांमधील दुर्गंधी दूर होण्यास मदत होते आणि कपडे नैसर्गिकरित्या स्वच्छ आणि ताजे राहतात.
3. कपडे पूर्णपणे कोरडे होऊ द्या
बऱ्याचदा लोक घाईघाईत अर्धेवट सुकलेले कपडे कपाटात घडी घालून ठेवतात, ज्यामुळे त्यांना ओलावा आणि कुबट वास येऊ लागतो. कपडे पूर्णपणे सुकतील याची खात्री करा, जरी तुम्हाला पंखा किंवा इस्त्रीच्या मदतीने थोडा वेळ सुकवावे लागले तरीही.
3. कपाटात नॅप्थालीन किंवा सुगंधित पिशव्या ठेवा
कपाटात किंवा कपड्यांच्या ठेवण्याच्या ठिकाणी नॅप्थालीन बॉल्स किंवा हर्बल सुगंधित पिशव्या ठेवा. हे कपडे ताजे ठेवतात आणि वास येऊ देत नाहीत. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही सूकलेल्या कडुलिंबाच्या पानांचा देखील वापर करू शकता.
4. तुमचे कपडे सूर्यप्रकाशात आणायला विसरू नका
थोडासा सूर्यप्रकाश येताच कपडे थोडा वेळ बाहेर आणून सूकवा. कारण सूर्याची उष्णता बुरशी आणि बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करते, ज्यामुळे वास कमी होतो.
5. अँटी-बॅक्टेरियल फॅब्रिक स्प्रे वापरा
जर तुम्ही वारंवार कपडे धुवू शकत नसाल, तर बाजारात उपलब्ध असलेले अँटी-बॅक्टेरियल फॅब्रिक स्प्रे वापरा. हे स्प्रे कपड्यांच्या पृष्ठभागावरील वास आणि जंतू दोन्ही काढून टाकतात.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)