चेहऱ्यावर नैसर्गिक चमक पाहिजे, मग ‘हे’ आयुर्वेदिक उपाय ट्राय करा

व्यस्त जीवनशैली, धूळ आणि प्रदूषणामुळे चेहऱ्यावर मुरुम, डाग आणि सुरकुत्या यासारख्या समस्यांमुळे बरेच लोक त्रस्त आहेत.

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक पाहिजे, मग 'हे' आयुर्वेदिक उपाय ट्राय करा
सुंदर त्वचा

मुंबई : व्यस्त जीवनशैली, धूळ आणि प्रदूषणामुळे चेहऱ्यावर मुरुम, डाग आणि सुरकुत्या यासारख्या समस्यांमुळे बरेच लोक त्रस्त आहेत. अशावेळी त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळ्या कॉस्मेटिक उत्पादनांचा वापर करण्यास सुरुवात करतात. मात्र, या उत्पादनांचा चेहऱ्यावर कुठलाच उपयोग होत नाही. काहीवेळा या उत्पादनांमुळे इतर अनेक समस्या देखील उद्भवू शकतात. (Follow These Ayurvedic tips for radiant skin)

अशावेळी थेट कॉस्मेटिक प्रॉडक्ट्सचा वापर करण्याऐवजी काही आयुर्वेदिक उपायांचा अवलंब करता येऊ शकतो. काही घरगुती नैसर्गिक उपायांनी आपण निरोगी आणि चमकणारी त्वचा मिळवू शकता. त्याशिवाय त्वचेच्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी देखील ‘या’ टिप्स आपण वापरू शकता….

-हळदीचा आपल्या ब्युटी केअर रुटीनमध्ये नियमित उपयोग केल्यास कमी वयातच चेहऱ्यावर दिसणारी वृद्धत्वाची लक्षणे रोखण्यास मदत मिळू शकते. यासाठी वाटीमध्ये दही, हळद आणि बदामाचे तेल एकत्र घ्या व मिश्रण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. 10 मिनिटे चेहऱ्याचा मसाज करा आणि 20मिनिटे हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावून ठेवा. यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा.

-डार्क सर्कलमुळे आपल्या सौंदर्यामध्ये बाधा निर्माण होते. ही समस्या दूर करण्यासाठी वाटीमध्ये दही, मध आणि हळद एकत्रित घ्या. हे मिश्रण आपल्या डोळ्यांच्या आसपासच्या त्वचेजवळ लावा. पेस्ट डोळ्यांमध्ये जाणार नाही, याची काळजी घ्यावी. नियमित हा उपाय केल्यास डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होण्यास मदत मिळेल.

-हळद, बेसन, मध आणि लिंबाचा रस एकत्र घ्या. हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर ३० मिनिटांसाठी लावा. यानंतर थंड किंवा कोमट पाण्याने आपला चेहरा धुऊन घ्या. या मिश्रणामुळे टॅनिंगची समस्या दूर होण्यास मदत मिळते.

-हळदीमध्ये अँटी-सेप्टिक, अँटी- बॅक्टेरिअल गुणधर्म आहेत. यामुळे चेहऱ्यावरील मुरुम व डागांची समस्या दूर होण्यास मदत मिळते. हळद-चंदन आणि लिंबाचा रस एका वाटीमध्ये घ्या. फेस पॅक तयार करून चेहऱ्यावर लावा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

संबंधित बातम्या : 

दिवाळीत गोड पदार्थ खाऊनही वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी टिप्स

(Follow These Ayurvedic tips for radiant skin)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI