हिवाळ्यातही तुळशीचे रोप राहिल हिरवेगार अन् दाट, फक्त फॉलो करा या गार्डनिंग टिप्स

Gardening Tips for Tulsi: हिवाळ्यात थंडी आणि बदलत्या हवामानामुळे तुळशीच्या रोपाची पाने कोमेजू शकतात किंवा गळू शकतात. अशा वेळी रोपाची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे असते. जाणून घ्या, तुळशीचे रोप हिरवेगार आणि दाट ठेवण्यासाठी कोणत्या गार्डनिंग टिप्स उपयोगी पडतील.

हिवाळ्यातही तुळशीचे रोप राहिल हिरवेगार अन् दाट, फक्त फॉलो करा या गार्डनिंग टिप्स
हिवाळ्यातही तुळशीचे रोप राहिल हिरवेगार अन् दाट
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Nov 22, 2026 | 10:04 AM

तुळशीचे रोप धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. तसेच आयुर्वेदातही तुळशीला विशेष स्थान आहे. मात्र, उन्हाळ्यातील कडक ऊन असो किंवा हिवाळ्यातील कडाक्याची थंडी, योग्य काळजी न घेतल्यास तुळशीचे रोप सुकू लागते. विशेषतः हिवाळ्यात पुरेसा सूर्यप्रकाश न मिळणे, थंडी आणि धुके यांमुळे तुळशीची पाने काळी पडून गळू शकतात. थंडीचा परिणाम रोपाच्या वाढीवरही होतो. त्यामुळे या ऋतूत तुळशीच्या रोपाची थोडी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. काही सोप्या गार्डनिंग टिप्सच्या मदतीने तुम्ही तुळशीचे रोप हिरवेगार आणि दाट ठेवू शकता. जाणून घेऊया या टिप्स.

तुळशीच्या रोपावरील मंजिरी काढून टाका

तुळशीच्या रोपाला भरपूर मंजिरी आल्या असतील आणि काही सुकू लागल्या असतील, तर त्या काढून टाका. मंजिरी तोडताना खोडाला इजा होणार नाही याची काळजी घ्या. हिरव्या मंजिरीचा वापर चहासाठी करता येतो, तर सुकलेल्या मंजिरींमधील बिया नवीन रोपे लावण्यासाठी वापरू शकता. रोपावर जास्त मंजिरी आल्यास नवीन पाने आणि फांद्यांची वाढ मंदावू शकते.

Loading...

तुळशीचे रोप कापडाने झाकून ठेवा

हिवाळ्यातील थंडी, थंड वारे आणि दव यांमुळे तुळशीची पाने सुकू शकतात. त्यामुळे रोपाला थोडा सूर्यप्रकाश मिळेल आणि थंड वाऱ्यापासून संरक्षण मिळेल अशा ठिकाणी कुंडी ठेवा. रात्रीच्या वेळी रोपावर हलके सुती कापड झाकून ठेवल्यास थंडीपासून संरक्षण मिळू शकते.

मातीची वेळोवेळी खुरपणी करा आणि पाणी द्या

हिवाळ्यात कुंडीतील माती घट्ट झाल्यामुळे पाणी व्यवस्थित मुरत नाही. त्यामुळे वेळोवेळी मातीची हलकी खुरपणी करा आणि पाण्याचा निचरा योग्य होत आहे का, ते तपासा. साधारण दीड महिन्याच्या अंतराने थोडे खत घालू शकता. मात्र, माती कोरडी होऊ लागल्यावरच रोपाला पाणी द्या.

तुळशीच्या रोपासाठी या द्रावणांचा वापर करा

रोपाची वाढ चांगली होण्यासाठी जुन्या शेणाचे पाण्यात द्रावण तयार करून कुंडीत घालू शकता. याशिवाय थोडे एप्सम सॉल्ट पाण्यात मिसळून पानांवर फवारणी करण्याचा पर्याय आहे. कच्चे दूध आणि पाणी एकत्र करून तयार केलेले द्रावणही रोपाच्या मुळाशी घालू शकता.

सुकणारे तुळशीचे रोप असे वाचवा

तुळशीचे रोप सुकत असेल, तर खोडाची हलकी खरवड करून आतून हिरवा भाग आहे का ते तपासा. पूर्णपणे सुकलेल्या फांद्या कात्रीने कापून टाका. कापलेल्या फांद्यांच्या टोकांना वितळलेल्या मेणाने किंवा टेपने झाकून ठेवा. त्यानंतर कुंडीतील माती हलकी करून त्यात खत मिसळा आणि रोपाची नियमित काळजी घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us